मुंबई, नवी मुंबईतील समृद्धा मांडेवाल संचालित बीट्स कराओके क्लबच्या चार शाखांच्या गाण्यांचा एकत्रित कार्यक्रम, म्हैसूर असोसिएशनच्या माटुंगा सभागृहात नुकताच झाला. हा कार्यक्रम अतिशय आखीव, उत्त्कंठावर्धक आणि मनोरंजक असा झाला.
गाणी, नृत्य, फॅशन शो असा हा भरगच्च कार्यक्रम होता. या कार्यक्रमात ३० हौशी कलाकारांनी सहभाग घेतला .
संजीवनी कुमार आणि सुनीता लेपांडे यांनी “कजरा मुहोब्बतवाला” या गीतावर सादर केलेले दिलखेचक नृत्य उपस्थितांची दाद घेऊन गेले. यावेळी बीट्स कराओके क्लबला सहकार्य केल्याबद्दल न्युजस्टोरीटुडे या वेब पोर्टलचा सन्मान करण्यात आला. पोर्टलच्यावतीने हा सन्मान एनएसटी टीमच्या अलका भुजबळ यांनी स्वीकारला.
या कार्यक्रमाचे निवेदन धैर्यशील भोपळे यांनी केले. तर तांत्रिक बाजू संदीप चिंचवळकर आणि टीम यांनी सांभाळली. या कार्यक्रमास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोरोना विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
– देवेंद्र भुजबळ: 9869484800.