हा भारत माझा देश
येथे वेगवेगळे जाती,
धर्म, भाषा आणि वेष
हा भारत माझा देश !!धृ!!
दगड-फुलांच्या, डोंगर, शेतीच्या
भक्तीभाव, शाहिरी, संस्कृती
शूरवीर आणि ऋषीमुनींच्या
स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी
साजरी करती सारे प्रदेश !!१!!
हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई
आपली सर्वांची एकच आई
या भारतमातेस वंदन करुनी
दया, क्षमा, शांती अंगी बाळगूनी
मागे सारु क्रोध, लोभ, द्वेष !!२!!
पंजाब, महाराष्ट्र, गुजराथ, बंगाल
अंजठा, एलोरा, ताजमहाल
गीता, ग्रंथ, कुराण, बायबल
गंगा, यमुना, विंध्य, हिमाचल
देती सारे एकीचा संदेश !!३!!
जय जवान जय किसान
या देशाचे हे ब्रीद महान
विसरुनी आता थोर लहान
तिरंगाचा ठेवूनी मान
करु देवू नका शत्रूस प्रवेश !!४!!

– कवयित्री : सुरेखा गावंडे. कल्याण-पूर्व
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
…आपला भारत देश महान….
सार्थ आहे सर्वाना अभिमान…
तिरंगाला देऊ सर्वोच्च मान…
पर्यावरणाचे असू दे सर्वाना भान.
हिरवाई वाढवते भारताची शान…
आपला भारत महान…
आपला भारत महान…
🌹मेरा भारत महान 🌹
खूप सुंदर.
धन्यवाद अलकाताई, सुरेखा ताई🌹
🙏🙏👍👍
छान.