Home बातम्या भारत बेल्जियम मैत्रीसंघ : सेल्फी स्पर्धा संपन्न

भारत बेल्जियम मैत्रीसंघ : सेल्फी स्पर्धा संपन्न

0

भारत बेल्जियम मैत्रीसंघातर्फे, 10 ते 20 वयोगटातील मुलांसाठी नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑनलाईन ‘सेल्फी
स्पर्धा घेण्यात आली. भारत आणि बेल्जियम मधील एकूण 167 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक :-यश दबडे पुणे,
द्वितीय क्रमांक :- सानवी कुमारी, बेल्जियम
तृतीय क्रमांक :- रोनित व्यास, बेल्जियम यांनी मिळविला.

तर उत्तेजनार्थ पुरस्कार असे आहेत:
प्रथम क्रमांक :-प्रणिता पाटील, जळगाव-भारत
द्वितीय क्रमांक :- पियुषकुमार, बेल्जियम.

या विजेत्यांना ज्येष्ठ कलावंत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्याहस्ते ‘International Click Award-2022‘ हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

डाॅ.मधुसूदन घाणेकर यावेळी बोलताना म्हणाले की,
“मोबाईलचा जमाना सुरु झाल्यापासून सेल्फीचे नवयुग सुरु झाले. सेल्फी काढणे चांगलेच आहे. स्वतःचे स्वतःवर प्रेम असलेच पाहिजे. त्यामुळे
न्यूनगंडाचा यत्किंचितही अंतर्मनाला स्पर्श होत नाही. सेल्फीतून आपला आत्मविश्वास, आशावाद, डोळ्यासमोर असलेले उच्च आदर्शवाद, आपली जीवनविषयीची विचारप्रणाली प्रकट होते. पण सेल्फीमुळे आत्मकेंद्रित वृत्ती वाढून एकूण
आयुष्याचाच आनंद गमावला जाणार नाही याचेही भान असणे आवश्यक आहे. सेल्फीसाठी नुसती दृष्टी असून उपयोग नाही तर चांगला दृष्टिकोनही हवा. स्वतःला चांगलेच घडवा, सेल्फी आपोआपच चांगली निघेल.”

डाॅ.मधुसूदन घाणेकर

याप्रसंगी वर्ल्ड लिटरेचर संस्थेच्या निमंत्रक, प्रिती दबडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सेल्फी हा उपक्रम मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी असून त्यांच्या सेल्फीमधून पालकांनी त्यांच्यावर केलेले संस्कारही
चांगल्या पध्दतीने समजतात.

निमंत्रक, प्रिती दबडे

स्पर्धेचे संयोजन भारत बेल्जियम मैत्रीसंघाच्या कार्याध्यक्षा नयना व्यास यांनी केले. फोटो वर्ल्ड संस्थेच्या सचिव, जयश्री शेंडे-फुलबांधे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले .

– टीम एनएसटी. ☎️ +919869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version