धाडसी पत्रकार तथा कोविड योध्दा श्री मंगेश चिवटे यांना दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना जेष्ठ पत्रकार श्री योगेश वसंतराव त्रिवेदी यांच्यासह मिळणार आहे. या पुरस्कारासह पत्रकारितेतील विविध पुरस्कार महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेमार्फत देण्यात येतात. संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र बेडकिहाळ यांनी जाहीर केले आहेत.
अल्प परिचय :-
शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे व खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १७ नोव्हेंबर २०१७ रोजी म्हणजेच स्व.वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली. गेल्या ३ वर्षात या कक्षाच्या माध्यमातून शेकडो महाआरोग्य शिबीरे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. कोरोनाचं संकट असो की पूरग्रस्त केरळ राज्य असो की सांगली – कोल्हापूर जिथे जिथे आपत्ती आली तिथे या कक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय पथक मदत कार्यासाठी हजर राहीलं . पत्रकार मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतुन सुरू झालेल्या या कक्षामुळे महाराष्ट्रभर आरोग्य सेवकांचं एक जाळं उभं राहतय.
पत्रकारिता कारकीर्द :-
इलेक्ट्रॉनिक मीडियात मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न मंगेश चिवटे यांनी केला. सुरुवातीला २००८ साली स्टार माझा वहिनीसाठी मंत्रालय प्रतिनिधी, त्यानंतर जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी साठी दिल्ली येथे ब्यूरो चीफ, साम टी व्ही साठी मुख्य राजकीय वार्ताहर आणि त्यानंतर आय बी एन लोकमत मध्ये उप वृत्तसंपादक असा त्यांचा पत्रकारितेमधील प्रवास राहिला आहे. मंगेश चिवटे यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दित अनेक दिग्गजांची मुलाखती घेतल्या आहेत. मुंबईवर २६/११ रोजी झालेला दहशतवादी हल्ला स्टार माझाकडून कव्हर करण्याची संधी त्यांना मिळाली होती. त्यावेळी तत्कालीन एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांची सीएसटी स्टेशनच्या आत प्रवेश करतानाची थरारक दृश्य त्यांनी टिपली होती. भारताला पहिले ओलम्पिक मेडल मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू स्व. खाशाबा जाधव, यांस मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळावा, त्यांच्या जन्मगावी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभारावे तसेच त्यांच्या जयंतीदिनी राज्यात क्रीडा दिन साजरा करण्यात यावा यासंदर्भात आयबीएन लोकमतवर केलेल्या विशेष बातमीची विधानसभेत चर्चा झाली होती.
– देवेंद्र भुजबळ.9869484800.