नाशिक जिल्हा परिषदेच्या महादेवपूर येथील शाळेत भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने रांगोळी, वेशभूषा, चित्रकला निबंध स्पर्धांमध्ये विजेते विद्यार्थी घोषित करण्यात आले. त्यांना गावचे सरपंच श्री विलासराजे सांडखोरे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, यांचे हस्ते सन्मान, गुलाबपुष्प व बक्षीसे देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भारत देश महान, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तींना सलामी देण्यात आली.
श्री दौलत डावरे यांनी अंकलिपी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन दात्रुत्व भावना जागृत केली.
ह्याप्रसंगी माजी सैनिक, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक व्रुंद, विद्यार्थी वर्ग, गावातील ज्येष्ठ नागरिक, स्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभातफेरीने तर हर घर तिरंगा मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.

– लेखन : कविता बिरारी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
लाखमोलाचं हे देणं बातमी तून मिळतं
लाखो लोक यावर न्यूजचं वाचन करतात अभिमान वाटतोय न्यूज स्टोरी टुडेसाठी धन्यवाद मनःपूर्वक देवेंद्र सर