Friday, November 22, 2024
Homeपर्यटनमाझं परदेश भ्रमण : 2

माझं परदेश भ्रमण : 2

मागच्या भागात तुम्हाला दुबई पर्यंत पोहोचण्या आधी ची सर्व गडबड गोंधळ, फजिती होता होता झालेली कामे ह्याच्या गमती जमती सांगितल्या.

आता दुबई मध्ये दुसर्‍या दिवशी आम्ही दुबई फ्रेम (हे नवीन आकर्षण आहे), दुबई मॉल व बुर्ज खलिफा चा 124/125 फ्लोअर वर जायचे ठरवले. त्या प्रमाणे आदल्या दिवशी संध्याकाळी दुबई फ्रेम व बुर्ज खलिफा च्या At the Top च online बूकिंग करून ठेवल होत.
आम्हाला सकाळी 11.30 च दुबई फ्रेम च व संध्याकाळी 7 च बुर्ज खलिफा च्या At the Top चे tickets सहज मिळाले.

आम्ही ठरवले होते, जेवढ सहज जे बघता येईल ते बघायचं. कारण आमचा प्लॅन तसा खूप आयत्या वेळी ठरला होता. खर तर दुबई सायन्स museum, miracle गार्डन आणि फेरारी वर्ल्ड पण बघण्या सारख आहे (नवीन आकर्षणां मध्ये) पण 3 दिवसात सर्व शक्य नव्हत. दुबई सायन्स museum च 13/14 तारखेची ticket उपलब्ध होती पण आमची 13 तारखेला सकाळी लवकरच स्टॉकहोम ची फ्लाइट होती. बाकी IBN Batuta मॉल, Ski दुबई, palm jumeira, हॉटेल Atlantis, burj al arab, marine area हे आधी बघितले होते.

11.30 च्या आधी आरामात आवरून नाश्ता करून दुबई फ्रेम ला जायला निघालो. खर तर मागच्या वेळी मूल लहान असताना आम्ही सगळी कडे मेट्रो व चालत हिंडलो होतो. पण ह्या वेळी मात्र टॅक्सी केली. पुढे Europe मध्ये पण फिरायच म्हणुन उगीच जास्त दगदग नको असा विचार केला.

टॅक्सी ड्रायव्हर जास्त करुन भारतीय, पाकिस्तानी आणि बांगला देशी आहेत. त्यामुळे हिंदी, बंगाली मध्ये बोलणं होत. त्यांना समजणार नाही अस एकमेकांमध्ये बोलायच असेल तर मग मात्र आम्ही शुद्ध मराठी चा उपयोग करायचो 😁.

आम्ही ticket च्या वेळे प्रमाणे दुबई फ्रेम जवळ पोहोचलो. दुबई फ्रेम हि एक उंच इमारत आरश्या च्या फ्रेम प्रमाणे बनवली आहे. आत मध्ये गेल्यावर सुरवातीला तिथल्या आधी च्या घरांच्या बाबत, पूर्वीच राहणीमान, वापरातील भांडी व इतर साधने ह्यांची माहितीपर चलचित्रे व काही मॉडेल जसे संग्रहालयात असतात तसे ठेवले आहेत. सध्या दुबई museum नूतनीकरणासाठी बंद असल्याने तिथल्या बर्‍याच गोष्टी इकडे आणून ठेवल्या आहेत. तसेच इथे व्यापार कसा व्हायचा त्याची पण माहिती आहे.

पुढे आपण लिफ्ट मधून वर जाऊ शकतो. वर गेल्यावर तिथे खाली कडेला रेग्युलर floor tiles आहेत आणि मध्ये फक्त काच आहे जी आपण उभे राहिले की पारदर्शक होते. आणि इमारती खालील बगीचा चा नजारा दिसतो. हा एक वेगळाच थरारक अनुभव आहे. सुरवातीला खूप वेळ भीतीने काचेवर पाय ठेवायला हिम्मत च झाली नाही. 😂प्रशांत आणि ईश्वरी मला हसत होते. ईश्वरी मला म्हणाली पण मी हात पकडते, तू ये मम्मा. मी तर एकदम स्तब्ध उभी राहिली.
शेवटी तिथून निघायच्या आधी प्रशांत चा हात धरून (देवाचे नाव घेऊन 😃🙏) हिम्मत करून काचे वर उभी राहिली. आणि ईश्वरी नी हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात कैद केला 🤣. त्या आधी बरेच फोटो काढले होते. पण हि आठवण कायम राहील. पोटात एकदम गोळा येतो खाली बघितल की! 😅

त्यानंतर दुसर्‍या लिफ्ट न खाली आलो. तिथे भविष्यातील दळणवळण संदर्भात एक 3D फिल्म दाखवतात. मग souvenir शॉप व त्यांनी काढलेले फोटो विकत घ्यायचा ऑप्शन आहे.

तिथून बाहेर पडलो आणि तिथल्या बगीच्या मध्ये थोडा वेळ निवांत बसलो. माझ्या फ्री सिम कार्ड ची मुदत संपली होती. पण प्रशांत नी त्याच सिम कार्ड renew केल. म्हणून त्याच्या फोन वरुन मैत्रिणी ला फोन करून तो नंबर देवून ठेवला. कारण आमच त्या दिवशी रात्री भेटायच ठरल होत. संपर्का साठी लोकल नंबर असेल तर बर पडत. दुबई मध्ये what’sapp कॉल किंवा FB messenger कॉल चालत नाहीत. रेग्युलर चाट करता येत पण कॉल नाही. त्यामुळे आदल्या दिवशी रात्री लेकाने गूगल मीट वरुन video कॉल केला होता. जुगाड तर केला पाहिजे ना 😅

तिथून पुढे टॅक्सी ने दुबई मॉल मध्ये गेलो. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती म्हणून डायरेक्ट तिथे फूड कोर्ट वर गेलो. तिथल फूड कोर्ट पण खूप मोठ आहे. जगभरातील वेगवेगळ्या cuisine चे प्रकार उपलब्ध आहेत. अगदी आपले भारतीय चाट प्रकार सुद्धा. आम्ही मेक्सिकन tacos व ज्यूस घेतला.

खाऊन झाल्यावर मॉल मध्ये भरपूर भटकंती केली. तिथे एक ice skate rink पण आहे. त्याच्या बाजूला स्टेडियम सारख्या खुर्ची पण आहेत. तिथे थोडा वेळ बसून मस्त ice skating करणार्‍या मुलांना बघितल.

मॉल मध्ये खूप सारे अत्तराची दुकाने आहेत. जगभरातील महागड्या perfume चे ब्रॅण्ड्स आहेत. आणि प्रत्येक दुकाना बाहेर त्यांचे प्रतिनिधी फ्री सॅम्पल (छोट्या चौकोनी envelope मध्ये) देतात. असे मी आणि ईश्वरी नी मिळून खूप सॅम्पल गोळा केले 😜😂

तिथे एक वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबाची रोप विकणार दुकान आहे. किमती विचारून फक्त बघून घेतले. मात्र फोटो काढायला विसरलो नाही 😁. त्यानंतर तिथल्या Apple store मध्ये जाऊन वेळ घालवला. त्या store च्या गॅलरी मध्ये निवांत बसून (बाहेर खूप ऊन होत) तिथून मस्त संगीत कारंज्याची मज्जा अनुभवली. तोपर्यंत संध्याकाळचे 5 वाजले. मग परत फूड कोर्ट ला जाऊन कॉफी घेतली. प्रशांत ला फोन चार्जिंग करायच होत. हा तिथे कॉल साठी चालणारा एकुलता एक फोन असल्याने चार्ज करन आवश्यक होत 😁 जे तिथे उपलब्ध होत. त्यांचा फोन चार्ज होई पर्यन्त मी आणि ईश्वरी परत एकदा थोडी भटकंती करून फ्रेश होऊन आलो. कारण नंतर आम्हाला बुर्ज खलिफा वर भरपूर वेळ घालवायचा होता.

6.15 ला आम्ही फूड कोर्ट मधून बुर्ज खलिफा कडे जायला निघालो. आमच 7 वाजता च timing होत. मॉल मधून च तिकडे जायला रस्ता आहे. मात्र भरपूर चालाव लागत. 6.40 ला वर नेणाऱ्या लिफ्ट जवळ पोहोचलो. हि लिफ्ट एक मिनिट च्या आत 125 th मजल्यावर पोहोचवते. त्यामुळे कानाला दडा बसू शकतो. म्हणुन एकतर आवंढा गिळायचा किंवा गोळी चघळायची.

125 th मजल्यावरच्या deck varun आम्ही दुबई चा नजारा अनुभवला व डोळ्यात साठवून ठेवला. त्याच वेळी जरा अंधार होत आला होता म्हणुन मुद्दाम थांबून दुबई मॉल समोर चालू होणाऱ्या संगीत कारंजे पण वरुन परत एकदा बघितले 😃 भरपूर फोटो काढले. ते mandatory असत 😅 एक तास तिथे घालवल्यावर मग खाली परत जायला निघालो. खाली आल्यावर परत एकदा दुबई मॉल चे संगीत कारंजे तिथल्या समोरच्या बाकांवर बसुन अनुभवले. तेवढ्यात दिपाली आणि निशीत चा फोन आला की ते दोघेही फ्री झालेत. Berjuman ला भेटायच ठरल.

दुबई मॉल मधून Berjuman ला जाण्यासाठी टॅक्सी घेऊया म्हणुन उभे राहिलो त्यासाठी पण भली मोठी रांग लागली होती. पण पटपट पुढे सरकत होती. अल करामा जवळ ट्रॅफिक जाम लागल. टॅक्सी वाला सांगत होता की इथे रोज ट्रॅफिक जाम होत.

दिपाली, निशीत ला Berjuman च्या food court मध्ये भेटलो. जवळ जवळ 7/8 वर्षानी भेटलो. मस्त गप्पा मारत निशीत नी ऑर्डर केलेल्या चाट, भेळ, डोसा इत्यादी पदार्थां वर ताव मारला 😃 मग त्यांच म्हणणं पडल की घरी तर यायला पाहिजे. त्यांच घर बघायला जायच ठरवल. तिथे गेल्यावर त्यांच्या मोठ्या मुलाच्या (पुष्कर) हातचा मस्त मसाला चहा घेतला. गप्पा तर चालूच होत्या 😁. पुष्कर BITS च्या दुबई कॅम्पस मध्ये फायनल year ला आहे आणि धाकटा सिद्धू डेहराडून ला एका शाळेत 11th मध्ये शिकतोय. त्याला भारतीय रक्षा सेवेत रुजू व्हायची इच्छा असल्याने त्याला डेहराडून ला admission घेतली आहे. मला दिपाली च्या संस्कारांचा खूप अभिमान वाटला. ती स्वतः दुबई मध्ये स्वाध्याय परिवाराचे काम करते. तिच्या पायाचे मध्ये खूप मोठ ऑपरेशन झाले. तरीही ती स्वस्थ न बसता काही ना काही करत आहे. अजून हि शिकतेय आणि परीक्षा देतेय. निशीतही खूप कष्टातून पुढे आलाय. दोघेही खूप डाऊन to earth आहेत. दोघांना एकमेकां बरोबर असेच नेहमी आनंदी रहा अश्या शुभेच्छा देऊन तिथून निघालो. पुष्कर स्वतः आम्हाला हॉटेल पर्यंत सोडवायला आला.

आम्हाला सकाळी हॉटेल मध्ये कोपरगाव चा एक मराठी मुलगा भेटला. तो तिथे गेली 9/10 वर्षे काम करतोय. त्याच्या बरोबर पण थोडा वेळ गप्पा मारल्या. आणि आवरून आम्ही दुबई थीम पार्क मध्ये गेलो. तिथे जायला टॅक्सी ने साधारणतः 45 ते 50 मिनिट लागतात. उन खूप असल्याने आम्ही Hollywood theme park मध्ये indoor activities prefer केल्या.

तिथे आत मध्ये कार्टून फिल्म आणि त्या फिल्म related 4D fun activitiy, वेगवेगळ्या rides अस छान मनसोक्त अनुभवल. कार्टून कॅरॅक्टर बरोबर फोटो पण काढले. तिथे 4/5 तास घालवल्यावर हॉटेल ला संध्याकाळी 7 पर्यंत परत आलो. अपार्टमेंट हॉटेल असल्याने रूम मध्ये वॉशिंग मशीन होत. त्यात धुणी करून 😁 बॅग पॅक करून लवकर जेवण करून झोपलो कारण दुसर्‍या दिवशी सकाळी 5.30 ला airport वर स्टॉकहोम च्या फ्लाइट साठी पोहोचण आवश्यक होते.

दुसर्‍या दिवशी वेळे वर airport वर पोहोचलो security check आणि immigration साठी मार्गदर्शन करायला खास airport स्टाफ आहे. जे हिंदी मध्ये बोलतात. 😃Emirate नी फार छान बिझनेस मॉडेल उभारल आहे. इंडियन सब कॉन्टिनेन्ट च्या प्रवाशांना हिंदी मध्ये मार्गदर्शन आणि आफ्रिकन देशातून आलेल्या प्रवाशांना त्या भाषेत मार्गदर्शन. किती विचार करून त्यांचा Business प्रमोट केलाय. Security check वेळी मी मेटल डिटेक्टर door मधून पास होताना आवाज आला. मला लक्षात आलं नाही की अस का होतय. कारण घड्याळ तर मी काढून स्कॅन ट्रे मध्ये ठेवल होत कुठलही इलेक्ट्रॉनिक उपकरण माझ्याकडे नव्हत. तिथल्या अरबी माणसानी मला खूण करून सुचवल की मी मेटल hairband घातलाय. 😅 तो काढून स्कॅन ट्रे मध्ये टाकला आणि मग आवाज थांबला 😄. तो माणूस ही हसून thumbs up केल. मी जिथे जाते तिथे लोक मला smile देतातच. हे ईश्वरी आणि प्रशांत मला म्हणाले. 😃 म्हंटलं मग माझा aura च तसा आहे. मी हसतमुख असते त्यामुळे साहजिकच समोरचा निर्विकार माणूस हि हसतो आणि ते मी पुण्याच काम समजते 😄

मग नाश्ता करून boarding गेट जवळ जाऊन थांबलो. पुढे arlanada airport ला पोहोचे पर्यंत 7 तास फ्लाइट मध्ये बसायच होत. एवढा वेळ काय करायच म्हणुन फ्लाइट मध्ये बसल्या बसल्या bollywood movies चे ऑप्शन काय आहेत बघितल. त्यात YRF च्या movies चा वेगळा सेक्शन आहे 😁 सुई धागा आणि जयेशभाई जोरदार बघून झाले 😄

Arlanada ला लॅण्ड झाल्यावर इमिग्रेशन मध्ये जरा वेळ गेला. फार मोठ airport नाहिये. शिवाय स्टाफ पण लिमिटेड आहे. त्यामुळे वेळ लागला. त्या पेक्षा आपल्या मुंबई airport वर फास्ट काम होत हे जाणवलं. शिवाय मुंबई airport हा जगातील जास्त ट्रॅफिक हॅन्डल करणार्‍या airports पैकी एक आहे तरीही फास्ट काम होत. हे मात्र नमूद केलच पाहिजे.

प्रशांत आधी येवून गेले होते म्हणुन ते सांगतील तस फॉलो करत आम्ही बाहेर पडलो. सामान जास्त असल्याने Arlanada Express ऐवजी टॅक्सी घ्यायची ठरवली. खर तर Arlanada Express हि 18 min मध्ये airport ते स्टॉकहोम सेंट्रल नेते. पण तिथून आम्हाला पुढे Södertälje centrum पर्यंत दुसरी ट्रेन व तिथून परत बस घेऊन जायचा फार कंटाळा आला होता. सकाळी लवकर उठल्या मुळे डोळ्यावर झोप ही खूप होती. लेकाच्या घरी पोहोचेपर्यंत टॅक्सी मध्ये झोपू असा विचार केला खरा पण बाहेरचा नजारा पाहून झोप उडाली आणि निसर्ग सौंदर्य बघत प्रवास केला. आम्हाला टॅक्सी ने पोहोचायला 1 ते 1.30 तास लागला. लोकल टाइम प्रमाणे (3.5 तास इंडियन स्टॅन्डर्ड टाइम च्या पाठीमागे) 5.30/5.45 ला त्याच्या घरी पोहोचलो.

त्याला बघून खूप छान वाटल. फ्रेश होऊन गप्पा मारत संध्याकाळचा स्वैपाक बनवला आणि जेवण करून झोपलो. सारख्या प्रवासा मुळे खूप दमलो होतो. पडल्या पडल्या झोप लागली. 😊

आता पुढच्या भागात स्टॉकहोम मध्ये काय काय बघितलं व अजून कोणत्या देशात गेलो त्या विषयावर सविस्तर लिहिन.

आपल्याला वाचायला आवडेल अशी अपेक्षा करते 😊🙏
क्रमशः

सुप्रिया सगरे

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

    • धन्यवाद दिपा. तुझ्या कविता पण तू इथे प्रकाशित करू शकतेस

  1. सुप्रिया ताई खूप सुंदर प्रवास वर्णन.. पूर्ण प्रवास झाला तुमच्या सोबत दुबई चा.. ओघवती भाषा..keep writing ❤️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments