नमस्कार ! आपण आज 15 तारखेच्या सफर साठी निघूयात. दुसर्या दिवशी लेकाची दुपारी दोन वाजता त्याच्या guide/प्रोजेक्ट supervisor बरोबर स्टॉकहोम मध्ये KTH Royal इन्स्टिटय़ुट ऑफ़ technology ( Kungliga Tekniska högskolan) कॅम्पस मध्ये त्याच्या dept बिल्डिंग मध्ये मीटिंग ठरलेली होती. त्यामुळे त्या दिवशी आरामात उठून, आवरून नाश्ता करून 12 वाजता घरातून बाहेर पडलो.
स्टॉकहोम Centrum हून दुसरी मेट्रो घेऊन KTH जवळच्या Stockholms östra स्टेशन वर 1.30 ला पोहोचलो. भूक लागली म्हणुन स्टेशन बाहेर स्ट्रॉबेरी विकत घेतली. ह्या सीजन मध्ये तिथे सर्व berries फार छान मिळतात.
KTH ह्या विद्यापीठाची जगातील रँक सध्या 79th म्हणजे पहिल्या 100 मध्ये आहे. विद्यापीठ परिसर देखील चढ उताराचा आहे. इथल्या इमारती फार सुरेख बांधलेल्या आहेत. शिवाय आजूबाजूला इमारतीवर वेली चढवलेल्या आहेत. ठिकठिकाणी फुलांची रोपे लावून सुशोभीकरण केलेले आहे. रस्त्याच्या कडेला झाडांच्या खाली बेंचेस/कट्टे बनवले आहेत. शिवाय शांततेचा decorum तर मेंटेन केलाच जातो. मुलांना अभ्यासासाठी फार प्रसन्न व पोषक वातावरण मला वाटले.
ह्या विद्यापीठातील काही इमारती जनरल पब्लिक साठी पण दिवसाच्या ठराविक वेळी खुल्या असतात आहे. जसे की वाचनालय किंवा University हॉल, आर्ट्स, literature आणि म्युझिक department, administration अश्या ठराविक इमारती. जिथे hardcore संशोधन चालते तिथे मात्र access card फक्त त्या विद्यार्थी आणि शिक्षकांनाच दिले जाते.
ह्या University ला स्विडीश रॉयल फॅमिली कडून वेळोवेळी निधी प्रदान केला जातो. त्यामुळे आताचे crowned राजा व प्रिन्सेस इथे अधून मधून वेगवेगळ्या डिपार्टमेंट ला भेट देतात व काय व कसे काम चालू आहे हे जाणून घेतात. चिराग ला पण त्याच्या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स च्या दुसर्या वर्षाला इथे स्कॉलरशिप मिळाली होती.
आम्ही चिराग च्या access card ने त्याच्या sustainable energy engineering department च्या building मध्ये गेलो. तिथल्या डायनिंग एरिया मधे आम्हाला बसवून तो मीटिंग साठी गेला. तोपर्यंत आम्ही फ्रेश होऊन स्ट्रॉबेरी खाल्ली 😁. त्याची मीटिंग संपल्यावर त्याचे सर आम्हाला भेटायला आले. खरे तर त्यांची लगेचच एका जापनीज रिसर्चर बरोबर मीटिंग शेड्यूल होती. पण तरीही त्यांनी येवून आमच्या बरोबर थोड्या गप्पा मारल्या. आम्ही पण त्यांना एक token of appreciation म्हणून मोराची metal frame आणि लाडू व आंबा बर्फी चा बॉक्स असे दिले. त्यांनी आमच्या समोरच गिफ्ट unpack करून बघितले. त्यांना ते फार आवडले. आम्ही त्यांना सांगितले की मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि तो royalty, peace, harmony, wealth दर्शवतो. तेवढ्यात ते जापनीज रिसर्चर आले. त्यांनी आमची त्यांच्या बरोबर पण ओळख करून दिली. शिवाय चिराग ने रिसर्च करताना जो experimental सेट अप लॅबोरेटरी मध्ये केलाय तेही बघायला सांगितले. ते म्हणाले, तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला ते सेट अप dismantle करण्या आधी बघायला मिळतय. कारण त्यांना ती जागा आता दुसर्या रिसर्च फेलो ला द्यायची आहे आणि म्हणाले की, thank you for giving us a dedicated person like Chirag for our research work. हे ऐकल्यावर मनाला फार छान वाटल. तिथेच नाचावे असे वाटत होते 💃 पण कंट्रोल प्रियु कंट्रोल अस मनातच म्हटलं 😅 (हे तुम्ही welcome movie च्या नाना पाटेकर च्या कंट्रोल उदय भाई सारखे बिनधास्त म्हणा 😂) त्यांना बाय म्हणून लॅब बघायला गेलो.

चिराग ची लॅब, तिथले त्याचे व बाकीचे experimental set up बघितले. बाहेर आल्यावर अजून थोडे कॅम्पस हिंडलो. अजून फोटो काढले 😁. तिथून बाहेर पडताना बघितले, दुसर्या दिवशी किती जणांचा रिसर्च defence शेड्यूल आहे. तो पण अश्या साठी लावतात की ज्या लोकांना त्या विषयात रुची आहे ते त्या दिवशी त्या वेळेवर concerned डिपार्टमेंट ला जावून attend करू शकतात व external supervisor /guide/ supervisor यांनी केलेल्या क्रॉस questioning नंतर प्रश्न पण विचारू शकतात. हे ऑनलाईन पण attend करता येते. सर्व बघता बघता 3.15 झाले. मात्र सडकून भूक लागली होती 😆
चिराग ला म्हटल आधी जेवायला चल. ईश्वरी ला कोरियन ramen noodles खायचे होते. म्हणून आम्ही ट्राम ने Kungliga Dramatiska Teatern (The Royal Dramatic Theatre) जवळ उतरून आतील बाजूस असलेल्या एका कोरियन restuarant मध्ये गेलो. हा परिसर पण खूप छान आहे. काही मोठ्या कंपन्या आणि बँक चे ऑफिस ह्या परिसरात आहेत. कोरियन नूडल्स chopsticks ने कसे खायचे ह्याची ईश्वरी नी घरी प्रॅक्टिस केल्यामुळे restuarant मध्ये ती अगदी प्रो सारखी खात होती. 😄 चिराग तिला उगीचच बडे लोग म्हणून चिडवत होता 😅. तिनी मला पण beginner नी कसे खायचे ते chopsticks paper napkin ने join करून शिकवले. ते थोड्या वेळ प्रयत्न करून जमलं नाही म्हणून गुपचूप जमेल तसे ओरपले 😁 कारण भुकेने patience संपला होता 😅.
मग परत चालत मेन रोड वर येवुन ड्रामा थिएटर समोरच्या छोट्या गार्डन मध्ये गप्पा मारत थोडा वेळ बसलो. आजूबाजूला बघण्यासारख खूप आहे. समोरच lake malaren चा एक waterfront आहे. तिथून ferries सुटतात. शिवाय जमिनीवर बस व पाण्यात बोट प्रमाणे चालणारी बस पण बघितली. तिथल्या waterfront थोड्या वेळ बघून आम्ही Kungsträdgården (king’s garden) मध्ये गेलो. इथे फार छान परीसर आहे. मध्ये पाणी, कारंजी व कडेला बसायला झाडाखाली बेंचेस आहेत. इथल्या चेरी ब्लॉसम चा सीजन एप्रिल ते मे पहिला आठवडा असा आहे. त्यावेळेस हा परिसर खूपच छान दिसतो. इतर वेळी सुद्धा लोक इथे येऊन बसतात. जवळच ice cream शॉप व restuarant आहे. खूप लोक इथे ice-cream चा आनंद लुटतात. एकदम उत्सवासारखे वातावरण असते.
तिथून आम्ही चालत स्टॉकहोम Centrum च्या दिशेने निघालो. साधारण 15 मिनट लागतात. Centrum च्या जवळील एका कॅफे मध्ये चिराग च्या मित्र मैत्रिणी ना 6.30 ला भेटायचे ठरले होते. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत ते सगळे आले होते.

सर्वां बरोबर गप्पा मारत केक / कॉफी घेतली. सगळ्यांशी छान ओळख झाली. त्याचे सर्व भारतीय मित्र पण मेहनती आहेत. परिस्थिती ची जाणीव असणारे आहेत हे बघून मनाला समाधान वाटले. गप्पा मारता मारता 8 कधी वाजले समजले नाही. उन्हाळ्यात तिथे सूर्यास्त रात्री 10/11 ला होतो. अगदी रात्री बारा पर्यंत उजेड असतो. आणि पहाटे 3.30 /4 ला उजाडते पण. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दिवस लहान व्हायला लागतो.
8 वाजले आणि दुसर्या दिवशी (16 तारखेला) आम्हाला Tallinn (Estonia ची राजधानी) ला क्रुज नी जायचे असल्याने आम्ही तिथून वेळेत निघायचे ठरवले. सर्वांना भेटायला आल्या बद्दल धन्यवाद दिले व बाय करून Centrum हून Södertälje centrum ची ट्रेन घेतली. त्यासाठी चा प्लॅटफॉर्म जमिनी पासून खाली 10 ते 12 मजले आहे. स्टॉकहोम Centrum वर सर्व ठिकाणाहून (मेट्रो /लोकल / long distance ट्रेन) कनेक्शन असल्याने खूप levels/मजले आहेत. शिवाय आपल्या कडे मुंबईत जसे मेट्रो ची ब्लू लाइन /रेड लाइन /ग्रीन लाइन आहे तशी स्टॉकहोम मध्ये रेड, ब्लू, yellow आणि ग्रीन अश्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अश्या चारही दिशांनी येणार्या वेगवेगळ्या lines आहेत.
ह्यात अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. इथे लोक बस /ट्राम, लोकल ट्रेन /मेट्रो / ferries ह्यातून त्यांच्या लहान बाळांना घेऊन त्यांच्या stroller सकट प्रवास करतात. बस मध्ये तर stroller साठी जागा राखीव असतात. शिवाय pet animals जसे की कुत्र ह्यांना हि घेऊन आरामात प्रवास करतात. त्याची तिथे परवानगी आहे. सायकल / इलेक्ट्रिक स्कूटर (आपण लहानपणी चालवायचो ना तीन चाकी तशी पण दोन चाकी आणि motorised) पण पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये त्या सकट प्रवास करतात. म्हणजे पाहिजे त्या स्टेशन वर उतरून बाहेर पडल्यावर लगेच सायकल /स्कूटर वापरून इच्छित स्थळी जायला सोप होत. अगदी सुपर मार्केट मध्ये पण हे घेऊन येतात.
घरी गेल्यावर कूकर ला वरण भात लावून खाऊन झोपलो. दुसर्या दिवशी सकाळी आवरून नाश्ता करून Tallinn व Helsinki च्या 5/6 दिवसाच्या ट्रिप साठी प्रत्येकाने स्वतः ची छोटी बॅग भरली.
Tallinn (Estonia) व Helsinki (Finland) ह्या ठिकाणची क्रुज ट्रिप हे चिराग नी त्याच्या बजेट प्रमाणे आम्हाला दिलेल एक छान surprise गिफ्ट होत. क्रुज बूकिंग चा व तिथे राहण्याचा Airbnb बूकिंग खर्च सर्व त्यानी केल होत. आम्हाला Stockholm पोर्ट वर दुपारी 4 वाजता पोहोचायच होत.
घरातून दुपारी 2 ला निघालो. स्टेशन वर veg wrap train मध्ये खायला parcel करून घेतल. ट्रेन वेळे वर निघाली मात्र मध्ये एका ठिकाणी सिग्नल जास्त वेळ लागला (बोरिवली कांदिवली मध्ये लागतो तसा 😆) त्यामुळे स्टॉकहोम Centrum ला पोहोचायला जरा उशीर झाला. 3.15 झाले. स्टेशन बाहेर येईपर्यंत 3.30 झाले. मग पोर्ट वर पोहोचायला उशीर झाला म्हणून टॅक्सी केली आणि तिथे वेळे वर पोहोचून ऑनलाईन चेक इन केल व क्रुज च्या दिशेने निघालो. ह्या सर्व ठिकाणी भरपूर चालाव पण लागत.
शिप मध्ये प्रवेश करण्या आधी इमिग्रेशन करावं लागत. पासपोर्ट पण चेक करतात. कारण दुसर्या देशात जातोय म्हणून. सर्व सोपस्कार पार पाडून क्रुज मध्ये प्रवेश केला.
इथून पुढे क्रुज चा प्रवास व अनुभव व Tallinn ची भटकंती हे पुढील भागात सविस्तर लिहिन.
आशा करते इथ पर्यंत चा प्रवास तुम्ही एन्जॉय केला असेल 😊🙏

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800