बृहन्महाराष्ट्र साहित्य संमेलन, पणजी, गोवा येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. त्यातील विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे, “क्रुझवरचे निमंत्रितांचे कविसंमेलन“ या संमेलनात सादर झालेली ही कविता…..
कधी विचारांच्या धुक्यातून थेंब होऊन उतरणारी
कधी उद्रेकानं भावनांच्या ठिणग्या उडवणारी
व्यवहाराच्या व्याकरणात रोजच अडखळणारी
तुझ्या-माझ्या नात्याचं अवघड गणित सोडवणारी
माझी कविता …
अगतिक वेळी आधाराचा खांदा चाचपडणारी
गहिवरल्या क्षणी पाणावलेले डोळे नकळत टिपणारी
भूत-भविष्य ह्या जाळ्यातही स्वैर स्वप्नी रमणारी
माझी कविता …
आठवणींच्या भूतांचा गोंधळ शब्द-गारुडात गुरफटणारी
अंधारल्या मनांत अनामिक हुरहूरीनं व्याकुळ होणारी
मनाच्या गूढ डोहात डोकावत
निर्वाण शोधणारी…
माझी कविता
माझ्या जवळच असलेली बरी,
माझी कविता …
माझ्या जवळच असलेली बरी
माझी कविता…
— रचना : विनायक भावसार. मंडी, हिमाचल प्रदेश
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छान आहे डॉ विनय भावसार यांची कविता. त्यांचा आवाजही चांगला असून म्हटली पण अगदी लयीत🙏. अभिनंदन संपादक अलका भुजबळ मॅम यांना विनंती की येथे लिहिणारे कवि लेखक यांचा परिचय करून द्यावा. 🙏
Ok