मित्रांनो माझी सफर थोड़ी वेगळी आहे. कारण ही सफर अशी आहे, जास्त लोक म्हणतात ती म्हातारपणी केली पाहिजे.
तरुणपणी कुठे कुठे फिरायला जायला पाहिजे, फूल एनजॉय केले पाहिजे.
पण माझी सफर आहे सगळ्यांपेक्षा वेगळी. ती म्हणजे पंढरीची वारी.
मी रात्री निघालो सीएसटी स्टेशन गाठलं आणि ट्रैन पकडली. सिद्धेश्वर एक्सप्रेस होती. सोलापूरसाठी
ट्रेन मध्ये मी बसलो. अफाट गर्दी असल्यामुळे थोड़ी जागा मिळाली. पण मज्जा आली.
मग ट्रेनमध्ये आजु बाजुच्या माणसांसोबत गप्पा मारत मारत कधी सकाळ झाली आणि सोलापूर स्टेशन कधी आलं ते मला कळलंच नाही.
मग मी सोलापूर स्टेशनला उतरुन बाहेर आलो आणि अक्कलकोट नाक्याची बस पकडली. बसमध्ये बसून मावस बहिणीच्या घरी गेलो. तिच्या घरी जाऊंन मी अंघोळ वगेरे केली. आणि मी निघालो वारीला.
भाऊजीने मला एस टी स्टँडवर सोडले. मी पंढरपुरच्या
एस.टी मध्ये बसलो आणि आता माझी पंढरपुरची वारीची सफर सुरु झाली.
सोलापूर टू पंढरपुर हे एक ते दीड तासाचं अंतर आहे.
बस माझी पंढरपुरात पोहचली पण ती ४ किलो मीटर अंतरावर येऊन थांबली. कारण या पंढरीच्या वाऱी मध्ये १ लाखांच्यावर माऊली या वाऱी मध्ये सामील झाले.
माझी बस अर्धा तास तिथेच थांबली होती. पुढे जायचा मार्ग नव्हता. मग मी विचार केला की सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन हे सगळे माऊली पायी चालत आले आणि मी फक्त चार किलो मीटर नाही चालु शकत ?
तसाच मी बस मधून उतरलो आणि या सगळ्या माऊली सोबत मी चालत निघालो जगाच्या माऊलीला भेटायाला. चालता चालता भरपूर अनुभव आले आणि ही अफाट गर्दी पाहुन माझा उर भरुन आला आणि तेव्हाच कळाल की, पंढरीची वारी काय असते !
वारकरी हे सगळे विठ्ठलाचरणी अर्पण झाले होते
आणि विठूच्या गजरात तल्लीन होऊन, एकमेकांना सोबत घेऊन कसे जातात याचा अनुभव आला. त्यांचा भोळाभाव बघून, मला ही तस वाटलं की मी ही भोळा होऊन नाचू, गाऊ, आंनदाने. त्यांच्या चेहऱ्यावर विठ्ठल रुखमींनी भेटीची आस दिसत होती, सर्व जीवन देवाला कस द्यावे हा अनुभव आला
या सर्व माऊलीच्या सोबतीने, आणि यामुळेच वारी खूप आनंद देऊन जाते हे खरोखरचं अनुभवलं. त्यांचे ते साधे कपडे, साधे राहणे मीठ भाकरी खाऊन वारी करणे हे सगळं बघून डोळ्यांत पाणी आले. मला ही अस जगणं होईल का ?, मनोमनी विचारत बसलो हे सगळं अनुभव घेऊन.
मी आधी चंद्रभागे मध्ये गेलो आणि हात पाय तोडं धूवुंन मी देवळाची पायरी चढ़लो. आणि दर्शन घेण्यासाठी गेलो तर पायरी पासून ते कळसा पर्यन्त माऊलींच्या रांगाच रांगा होत्या. मी विचार केला की मला दर्शन मिळणार नाही, पण कस तरी मंदिराच्या दारा पर्यंत गेलो आणि कळसाचं बाहेरुन दर्शन झालं आणि माझी एक इच्छा पूर्ण झाली.
परत मी सोलापूरसाठी एस टी पकडली. परतीचा प्रवास केला. त्या दिवशी बहिणीच्या घरी राहिलो आणि दुसऱ्या दिवशी परत मुंबईला येण्यासाठी निघालो.
ही होती माझी अविस्मरणिय सफर….
।। नाम विट्ठलाचे मुखी घ्यावे
आयुष्य हे नेहमी आनंदात घालवावे ।।
जय हरी विट्ठल श्री हरी विट्ठल

– लेखन : प्रमोद सूर्यवंशी
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800