Wednesday, January 22, 2025
Homeलेखमाझे गुरु, माझे आधारस्तंभ

माझे गुरु, माझे आधारस्तंभ

श्री देवेंद्र भुजबळ सरांचा आणि माझा संपर्क मागच्या वर्षांपासूनच आला. त्यांना मी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आणि आमची ओळख झाली. त्यांनी माझ्या कलेचा अभ्यास करून साधारणतः आठ दिवसांनी मला फोन केला.

वास्तविक नाते नसतानासुद्धा जी माणसं आवर्जून फोन करतात ते महत्त्वाचं आणि मोलाचं असतं. तसेच त्यांनी केले. आणि माझ्या आगळ्यावेगळ्या छंदाचा, आयुष्याचा प्रवास कसा झाला, काय अडचणी आल्या, कसा प्रतिसाद मिळाला याविषयी आढावा घेऊन त्यांनी तो जनतेपर्यंत पोहोचवला. हे त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे इतरांनाही आपली कला दाखवण्याची प्रेरणा मिळते.

इतरांच्यात असलेली कला व त्या कलेत आलेला अनुभव किंवा त्या कलेचा प्रवास याचे वर्णन माझ्या सारख्या कडून घेऊन ती जनतेपर्यंत अथवा वाचकांपर्यंत पोचवण्याचं मोलाचं कार्य महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती व जनसंपर्क संचालक आदरणीय श्री देवेंद्र भुजबळ यांनी करून एक नवीन व्यासपीठ उभे
करून केले आहे. ते व्यासपीठ म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील
https://newsstorytoday.com/
न्युज स्टोरी टुडे हे वेब पोर्टल होय.

या पोर्टल मार्फत ते देशविदेशचे विविध प्रकारचे लोकोपयोगी विचार, कल्पना, अनुभव, उपक्रम जनतेपर्यंत पोचवतात. दुसऱ्यांच्या आतील कला जगाला दाखवण्याचा आणि समाजाच्या विकासासाठी सर्वोतोपरी योगदान देण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

श्री देवेंद्र भुजबळ यांच्या आयुष्याचा प्रवास बघितला तर फारच खडतर आहे. माझ्यापेक्षाही खरं तर. परंतु ते न डगमगता आणि विशेष म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन नसतानाही, परिस्थितीला सामोरे जाऊन, आलेल्या परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले यशस्वी जीवन करून दाखवले आहे. ते लहान असतानाच त्यांच्या परिवाराचे छत्र परमेश्वराने हिरावून घेतले. त्यामुळे पडेल ते काम करत ते शिकले. मोठे अधिकारी झाले.त्यांच्या आयुष्याचा प्रवास आजच्या पिढीला आदर्श आणि प्रेरणादायक ठरेल यात तिळमात्र शंका नाही.

लोकांचे मनोधैर्य कायम राहण्यासाठी, वाढण्यासाठी त्यांनी स्वतः विविध माध्यमातून प्रयत्न केले तसेच इतरांनाही लेखनासाठी प्रेरित केले.

आयुष्यात प्रत्येक जण शिक्षणात यशस्वी होतोच असं नाही. २० टक्के लोकं शिक्षणात यशस्वी होतात. प्रत्येकाजवळ परमेश्वराने कला दिलेली आहे. फक्त त्याचे आपण आत्म परीक्षण करत नाही. ते आत्म परीक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे मोलाचे कार्य देवेंद्र भुजबळ सर करीत असतात. त्यामुळे आपल्याला आपले आयुष्य आनंदाने आणि सुखाने जगता येते .

“कुठलेही अपयश हे कायमस्वरुपी नसते. आपल्या जिद्दीच्या जोरावर आपण अपयश आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो, त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींनी निराश न होता, नाउमेद न होता, आजूबाजूंच्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, आपण आपले ध्येय निश्चित करून वाटचाल केली पाहिजे. आणि त्यातच आपल्या जीवनाचे व यशस्वीतेचे सार आहे.” असे ते नेहमी म्हणतात.

श्री भुजबळ यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना गुरुौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

मदन लाठी

– लेखन : मदन लाठी, न्यू सांगवी पुणे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments