ना कळे हे असे कसे झाले
नेहमी माझेच का हसे झाले
मी तसा फारसा हिशेबी नाही
जायचे जाणार होते, बरे झाले
माणसांचा माणसांना त्रास होतो
दोन खोल्यांच्या घरी ते कैद झाले
द्वेष मत्सर भाव झाले राक्षसी
खून हिंसेचे सभोती मार्ग झाले
थांबला संवाद आता दोघातला
सारखे त्यांच्यात आता वाद झाले
भावनांचा बर्फ झाला तर्क सारे गोठले
माणसाने माणसाचे हसे केले !!

— रचना : विजय पांढरीपांडे. हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
