मी भारतीय तिरंगा ध्वज बोलतोय
परवा मला ७५ वर्षे पूर्ण होणार
माझं वर्षभरात कोणावरही नसे दडपण
सरकारने अमृत महोत्सव साजरा केले
मोठ्या संघर्षात झाली माझी निवड व लोकार्पण
हे मी अभिमानाने सांगतोय
मी भारतीय तिरंगा ध्वज बोलतोय
हे मी अभिमानाने सांगतोय !! धृ !! 🇮🇳
क्रांतिकारी श्री पिंगली वैकया
यांनी मला जन्म दिला
आणि डॉ बाबासाहेबांनी
अशोक चक्राला सन्मान दिला
२२ जुलै १९४७ रोजी
भारताला अधिकृत राष्ट्रीय ध्वज दिला
आणि माझे २२ दिवसांनी थाटामाटात,
रुबाबात ध्वजारोहण झाले
जगाच्या राष्ट्र ध्वजांत
मी उठून दिसतोय
हे मी अभिमानाने सांगतोय !! १ !! 🇮🇳
मी असे तिरंगा अर्थात
केशरी- पांढरा- हिरवा
१५ ऑगस्ट १९४७ ला
सर्वांनी लाविला माझ्या नावाचा टिळा
माझा देशभक्त मला कवटाळून प्राण सोडतोय
हे मी गर्वाने सांगतोय !! २ !!🇮🇳
ब्रिटिशांच्या विरोधात
मला हातात घेऊन ताठ मानेने उभा केला
त्यांच्या लाठ्या खाल्ल्या-गोळ्या घेतल्या देशभक्तांनी
पण नाही कोणी मला सोडून गेला
माझ्यासाठी भगतसिंग-राजगुरू आणि सुखदेव तर फासावर हसत हसत गेले
हे मी अभिमानाने सांगतोय !! ३ !!🇮🇳
देशासाठी तेव्हा पण आणि आता पण
निस्वार्थीपणे मनापासून लढाई करीतो सैनिक
घराच्या संसाराचा व सुखाचा त्याग करून
तिन्ही ॠतूत रायफल धरे दिवस रात्र सैनिक माहिती मिळताच शत्रूचा खात्मा जवान करतोय
हे मी गर्वाने सांगतोय !! ४ !!🇮🇳
देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केले सर्वांनी,
रक्ताचे पाणी
त्याचं महत्त्व आताच्या पिढीने जाणून घ्या
नाही गात सहज कोणी देशभक्तीची गाणी
त्यात बलिदान व संघर्षाचा इतिहास दिसतोय
हे मी अभिमानाने सांगतोय !! ५ !!🇮🇳
७५ वर्षात आले गेले संकटे, वादळ-वारा-पूर
पण मी मात्र ताठ उभा आहे लाल किल्लावर
सैनिकांच्या श्वासावर नी मानवता धर्मावर
मी इमानदारीत खादी कपड्यात, माझी लांबी रुंदी ३-२ !! ६ !!
जसं माझ्यासाठी तुम्ही एक होऊन लढता ना
तसं भ्रष्टाचार-अत्याचार विरोधात,
नव्या जोमाच्या पिढीला शिक्षणाने घडवता ना
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये आपले पदकं वाढताना दिसतोय
आपल्या शास्त्रज्ञांनी इस्रोने बेबी राॅकेट मला भेट दिली
हे मी स्वाभिमानाने सांगतोय !! ७!!🇮🇳
वाढवावी देशवासीयांनी बौद्धिक इम्युनिटी
सकस आहार- नियमित योगा- सकारात्मक विचाराने निरोगी शरीर राहतेय
हे मी अभिमानाने सांगतोय !! ८!!🇮🇳
आजपासून तीन दिवस, मी ऐटित सर्व भारतीय घरावर आणि कार्यालयावर दिसे
तसेच परवा मी विदेशातही रुबाबात दिसे !!९!!🇮🇳
भारतीय घराघरावर डौलात दिसे अभिमान
उत्सवात व उत्साहात दाखवू देशाचा स्वाभिमान!!१०!! 🇮🇳

– रचना : विलास देवळेकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Very nice poem
सुरेख कविता.