उपक्रम -आशयावरून काव्यलेखन
काव्यपंक्ती –
असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे
– कवयित्री – शांताबाई शेळके
•••••••••••••••••••••••••••••••••••••
दिसल्या न जरी आज माझ्या पाऊलखुणा
गीतातील शब्द शब्द माझ्या विना उणा..ध्रु
सुसंगती, सद्विचारी जीवनातला धडा
दीन दुबळ्यास मदत सत्कर्माचा पुण्यघडा
दिसता जन आनंदी, आनंद माझाही दुणा..ll १ll
एक हात आश्वस्त, अनाथांचा होत नाथ
करुणेची साखळी देत सगळ्यांस साथ
मनुष्य जन्म लाभला, स्मरीन त्याच्या ऋणा..ll२ll
ह्दय प्रेम पाझर, मानवतेचा आसरा
स्वप्नवत भासेल जग, मी एक कासरा
आर्त स्वर न ऐकावा, कधी कुणाचा पुन्हा… ll ३ll
अफाट या जगतातला, मी मिणमिणता दिवा
अंधारात प्रकाशाचा मार्ग होईन नवा
शब्दओंजळ माझी राहील तेंव्हा स्मरणा.. ll ४ll
– रचना : प्रीती भिसे, बेंगलोर