लहान मोठे संत महात्मे
सगळी सारखीच माणसें
कोण गरीब कोण श्रीमंत
या तोंडाला बांधले मुंगसे.
श्रीमंताला मरण्याची शंका
गरिबाला उपासमारीची भीती
नराधमांनो रोगाच्या नावाखाली
माणसांना लुटणार तर किती..?
माणसाला जनावरासारखी
मुंगसे घालायची वेळ आली
अशा परिस्थितीत माणसेच
कोळशासारखी कोळ झाली.
कितीही संकटे आले जरी
माणूस शेवटी सारे एक होऊ
भयाण वास्तव स्थितीला तोंड
द्यायला धर्म सारे एकनिष्ठ राहू.

– रचना : भागवत शिंदे पाटील.
उक्कडगांवकर.
मुंगसे कविता वास्तवतेचे प्रखर दर्शन.
भागवत पाटील यांचे खूप कौतुक..👍👍
छान