केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या “भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा-२०२४” मध्ये उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेत निःशुल्क ऑनलाईन अभिरूप मुलाखतींचे ८ व १६ एप्रिल २०२५ रोजी यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.

ह्या अभिरूप मुलाखतीत पॅनल सदस्य म्हणून डॉ. सुनिल लिमये, से.नि. (भारतीय वन सेवा) – महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव संरक्षक आणि मा. सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्रिय सक्षम समितीचे सदस्य, श्रीम. पियुषा जगताप, उप वन संरक्षक, चंद्रपूर, श्री. धनंजय मगर, उप वन संरक्षक, देवगड, ओडीशा, श्री. सुमेध सुरवडे (भारतीय वन सेवा) परिविक्षाधीन अधिकारी, श्री. प्रविण चव्हाण, अभ्यासक्रम संचालक, युनिक अकॅडेमी, श्री. गणेश शेट्टी, (विषय तज्ज्ञ), श्री. भूषण देशमुख (विषय तज्ज्ञ) व प्रा.डॉ. भावना पाटोळे, संचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई आदि उपस्थित होते.
सदर मुलाखतीच्या पहिला व दुसऱ्या टप्प्यात १० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. तसेच राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेमार्फत वनसेवेकरिता ऑनलाईन मार्गदर्शन सत्रही आयोजित करण्यात आले होते.

भारतीय वनसेवेकडे मराठी मुलांचा कल आता वाढलेला आहे. सन २०२४ साली भारतीय वनसेवेत महाराष्ट्रातील विद्यार्थी हे अग्रक्रमाने असल्याचे दिसून येतात. विशेष म्हणजे सन २०२४ साली उत्तीर्ण झालेल्या १४७ विद्यार्थ्यांमध्ये दुसऱ्या व चौथ्या क्रमांकावर मराठी मुली आहेत. हा जो मराठी टक्का वाढतो आहे, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. देशपातळीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मराठी टक्का वाढविण्याकरिता सदर मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संचालक डॉ. भावना पाटोळे यांनी सांगितले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800