मनुष्याच्या जन्माची कथा
आज गायिली
आई वेदनेने व्याकुळ
झाली तरी हसली “१”
जन्म झालेली मात्र
रडू लागली
दुःखाचे भोगा शिवाय
मुक्ती कुठली “२”
संसाराच्या गाड्याची ओढ
जिवाला लागली
शरीर खंगले तरी हौस
नाही फिटली “३”
यमाचे आमंत्रण येता
डोळे पांढरे झाली
पुढची व्यावहारिक हालचाल
जाग्यावर थांबली “४”
सगेसोयरे लेक नातवंडे
सभोवताली रडली
मायाजालातून मनुष्याला
मुक्ती मिळाली “५”
— रचना : अशोक घोडके. पनवेल
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अतिशय सुंदर रचना आयुष्यावर.काही ओळीत संपूर्ण आयुष्याचे वर्णन अप्रतिम 👌