कोरोनामुळे सध्या आपल्या फिरण्यावर खूप बंधनं आहेत. अशा वेळी घरात बसून वेळेचं काय करायचं ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. एरव्हीही निवृत्तीनंतर काय करायचं ? हा प्रश्न असतोच. यातून मदन लाठी यांनी चांगला मार्ग शोधला आहे तो म्हणजे इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा. जाणून घेऊ या, त्यांच्याविषयी आणि त्यांच्या मुलखावेगळ्या छंदाविषयी……..
छंद म्हणजे प्रत्येकाने आपआपल्या आवडी प्रमाणे जोपासलेली कला, मग ती कोणतीही असु शकते. छंदाला चौकटीत बांधता येणार नाही. छंद म्हणजे हा अशा प्रकारचा आनंद आहे की, तो विकत घेता येत नाही.
आजच्या युगात परमेश्वराने प्रत्येकास कोणत्या न कोणत्या प्रकारची कला दिलेली आहे. फक्त त्या कलेस अंतर्मनातुन बाहेर आणल्यास त्याचा आनंद वेगळाच असतो. त्या आनंदाची कल्पना करता येत नाही. मग तो छंद कुठलाही असो गाण्याचा, खेळण्याचा, वाचनाचा असे विविध छंद होत.
एक मुलखावेगळा छंद जोपासला आहे तो मदन लाठी यांनी. मूळ जळगावचे असणाऱ्या पण आता पुण्यात राहणाऱ्या लाठी यांनी गेल्या सहा सात वर्षांपासून हा छंद जोपासला आहे.

हा छंद म्हणजे, रोज ज्यांचा वाढदिवस असेल अश्यांना त्यात आदरणीय राष्ट्रपती, आदरणीय पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री, सचिव, उद्योगपती, विविध खेळाडू, सेलेब्रिटीज, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, खाजगी, सामाजिक व विविध राजकीय नेते, सेलिब्रिटीज आदिंचा समावेश आहे.
ज्यांचा वाढदिवस असतो किंवा कुणाचे प्रमोशन झाले आहे आणि ज्यांची माहिती त्यांच्याकडे असते अशा आदरणीयांना ते विविध तंत्राद्वारे किंवा माध्यमांद्वारे संपर्क साधण्याचा किंवा शुभेच्छा पोहोचविण्याचा प़यत्न करतात. ही विविध माध्यमं म्हणजे ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सएप, एसएमएस, टेलीफोनद्वारे आणि शक्य असल्यास प्रत्यक्ष भेट होय.
या छंदाचा त्यांना छान प्रतिसाद मिळतो. या मान्यवरांकडुन त्यांना शुभेच्छा पोहोचल्याची पत्रेही येतात. त्यात प्रामुख्याने प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग, राष्ट़पतींचे सचिव, केंद्रीय गृहमंत्री, आरोग्यमंत्री, सांस्कृतीक मंत्री, उपराष्ट्रपती, राज्यपाल, काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रालयातील विविध सचिव (आजी आणि माजी), पोलिस आयुक्त (आजी आणि माजी ), उद्योगपती, सिने सृष्टीतील, विविध पक्षांचे राजकीय नेत्यांचा, समाजातील वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

या प्रतिसादाने लाठी यांचा आनंद गगनात मावत नाही. त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि आयुष्याचा प्रवास सुखकर होण्यास मदत होते, असे ते म्हणतात.
याशिवाय कुणा शासकीय अधिकाऱ्यांचे प्रमोशन झाल्यास त्यांनाही तें शुभेच्छा पाठवितात. या व्यतिरिक्त कुणा मोठ्या माणसाकडे निधन झाले असले तर त्यांना ते शोक संदेश पाठवितात. या छंदामध्ये ते कुठल्याही राजकीय पक्षाचा विचार न करता एकच लक्ष्य ठेवतात, ते म्हणजे इतरांना आनंद, समाधान देण्याचे. यासाठी लाठी यांना रोज ३ तास तरी लागतात. खूप परिश्रम घ्यावे लागतात. पण त्यामुळे जो आनंद मिळतो त्याचे ते वर्णन करु शकत नाही.
परमेश्वराने जितके दिवस दिले आहे ते सर्व या छंदामध्ये त्यांना घालवायचे आहे.
याशिवाय लाठी नियमित रक्तदाता असुन दर ४/५ महिन्यानंतर रक्तदान करुन ते देशाची सेवा करतात, आणि रक्तदानामुळे जीवनदान देण्याचा प्रयत्न करतात.
या संदर्भात माजी केन्द्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी, त्यांचे दोन वर्षापुर्वी ईमेल द्वारे १४ जुन या रक्तदाना दिवशी अभिनंदन केले असुन रक्तदान नियमित सुरू ठेवावे असे सांगितले.
लाठी यांनी आणि त्यांच्या पत्नीने नेत्रदानाचा संकल्प केला आहे. त्यामुळे कुणास तरी दृष्टी मिळेल. या बाबतीत जनजागृती व्हावी, यासाठी राष्ट्रव्यापी प्रचार करण्याचा त्यांचा मानस आहे.
कोरोना काळात ही घरात गप्प न बसता, श्री लाठी इतरांना होईल ती मदत सतत करीत आले आहेत. श्रीयुत लाठी यांचा आज २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांनी शरणपूर वृद्धाश्रमास आर्थिक मदत केली आहे.
श्री मदन लाठी यांना वाढदिवसाच्या व त्यांच्या भावी उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.
Great initiative of blood donation and eye donationa and best wishes for Madan’s birthday and long and healthy life. Regards
Nice Job Madan ji