ज्या काळात स्त्रियांना शिक्षण देणे समाजाला मान्य नव्हते, त्या काळात त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी अवघ्या ४ मुलींसह भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १८९६ मध्ये शिक्षण संस्था स्थापन केली.
आज या संस्थेच्या पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी, नागपूर, कामशेत, वसई या ७ प्रकल्पातील ६२ शैक्षणिक शाखांमधून जवळपास ३० हजार गरजू व होतकरू मुली शिक्षण घेत आहेत.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेल्या १३५० मुली, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या पुणे येथील, महिलाश्रम वसतिगृहात राहून पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या बिकट परिस्थितीमुळे अनेक मुलींचे वसतिगृहाचे मागील वर्षाचे शुल्क भरणे बाकी आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत त्यांना आपण मदत केली तर अनेक मुलींचे शिक्षण पुढे सुरू राहू शकेल.
मदत देण्यासाठी संपर्क क्रमांक
१) ०२०-२५४७५६५४
२) ०२०-२५३१३१८७
३) ०२०-२५३१३१९०
४) ०२०-२५३१३१९१
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था
कर्वेनगर, पुणे -४११०५२
बँकेचा तपशिल :-
बँकेचे नाव :- सिंडिकेट बँक
बँकेचा पत्ता- के. एस. रेसिडेन्सी, ग्राउंड फ्लोअर, वनदेवी मंदिरा समोर, केऊर शोरूम, वारजे रोड, पुणे, ४११०५२.
शाखा :- कर्वेनगर
खाते प्रकार:- बचत खाते
खाते क्रमांक:- ५३३९२०१००१७१२०
आयएफसी कोड :- SYNB0005339
संस्थेला दिलेली मदत आयकर कायद्याच्या कलम ८० जी नुसार कर सवलतीस पात्र आहे.
संस्थेची संपूर्ण माहिती, आपण
www.maharshikarve.org
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
सौ. प्रणाली पराग कुलकर्णी- 9970061140
– देवेंद्र भुजबळ 9869484800