देश विदेशात आपल्या एकपात्री प्रयोगाने लोकप्रिय असलेल्या कलाकार मेघना साने यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाने एम. फिल. पदवी प्रदान केली आहे. एम. फिल.चा त्यांचा विषय १९८० नंतरचा ‘हायकू’: एक काव्यप्रकारस्वरूप आणि चिकित्सा* हा होता. हायकू विषयात संशोधन करून एम.फिल.झालेल्या मेघना साने या महाराष्ट्रातील पहिल्या विद्यार्थिनी आहेत. डॉ. अलका मटकर या त्यांच्या मार्गदर्शक होत्या.
मेघना साने या स्वतः हायकूकार आहेत. १९९९ मध्ये आपल्या ‘रेशीमधारा’ काव्यसंग्रहात हायकूचा समावेश होता. त्या संग्रहाची प्रस्तावना शिरीष पै यांनी लिहिली होती. त्यावेळी हायकूचे तत्व कवयित्री शिरीष पै यांनी समजावून दिले होते असे त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. हायकू या विषयावरील शिबिरे घेऊन ‘हायकू’ या काव्य प्रकाराचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचा व त्याच बरोबर पीएचडी करण्याचा त्यांचा मानस आहे.
– देवेंद्र भुजबळ.986948480.