Tuesday, July 1, 2025
Homeसाहित्यमेघ मल्हार

मेघ मल्हार

अष्टाक्षरी

कवयित्री कल्पना मापूसकर यांचं न्यूज स्टोरी टुडे परिवारात मनःपूर्वक स्वागत आहे.
आज आपल्या पोर्टल वर त्यांची पहिली रचना प्रसिद्ध करीत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

मंद फुंकर वाऱ्याची
जड गर्भित ढगाला
शुभ्र सरीतून येते
मग जाग पावसाला

घडा चौघडा ढगांचा
सौदामिनी रोषणाई
शालू नेसते हिरवा
दर्‍या, खोर्‍या, वनराई

सांग वेचाव्या कश्या मी
काच रुपी हिम गारा
वितळून क्षणार्धात
देह पाणी पाणी सारा

वर्षा वाटेकडे डोळे
नभाकडे चोच मान
तृप्त करी चातकाची
मेघ मल्हार तहान

राग मेघमल्हार तू
बहु ताकदीचे कोडे
आळविता तुला कुणी
पाणी पाणी चहूकडे

थिरकती धुंद पाय
मोर फुलवि पिसारा
माती गंधा पुढे फिका
पुष्प अत्तर फवारा

— रचना : कल्पना मापूसकर. मीरा रोड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खूप सुंदर अष्टाक्षरी काव्य रचना. कल्पनाताई, तुमचे ह्या पोर्टल वर मनःपूर्वक स्वागत. 🙏💐

  2. पावसाबद्दल खूप सुंदर रचना केली मॅडम आपण, सुरेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील