खोवले खोबरे,
वेलची पुड
किसला गुळ,
भाजली खसखस
बाप्पाच्या आवडीचे मोदक
करा सारे पटपट ||
घेतली उकड
लाटली पारी
भरले सारनं
वरती भारी
समोरासमोरची
धरा टोके
बंद करा
मोदकाचे डोके ||
तळहातावर फिरवा गरकण
होतील मोदक
अगदी भरकन
सुरेख पाकळ्या
निघती सरकन
गॅसवर पाणी
ठेवा पटकन ||
चाळणी घ्या
तेल लावा
ओळीत निट
मोदक ठेवा
अलवार वरती
झाकण ठेवा
पातेल्यावर छान
उकड काढा
गरमा गरम मोदकावर
साजूक तुपाची
पडता धार
घमघमाट जाई
घरभर
बाप्पांबरोबर
खुश सारे घरदार !!!

— रचना : आशा दळवी. फलटण
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800