१. 🌸 रक्षा बंधन 🌸
मऊ रेशमी धाग्यांनी
बांधलंय साऱ्या जगाला |
म्हणूनच द्रोपदीची आर्त हाक
ऐकू येते फक्त कृष्णाला ||
बहिण _भावाचे नाते |
जसे माणिक नी मोती |
तुच जडविलीस देवा
कृष्ण _द्रोपदीचे नाते ||
जगी सर्वश्रेष्ठ अशी याची महती ||
प्रसंगी भावासाठी बहिण |
गगनाचिही घार होती |
जीवाची पर्वा न करिती ||
म्हणूनच आधुनिक युगातही |
पाळल्या जाताहेत |
रक्षाबंधनाच्या ह्या रिती ||
कितिही झाली जरी
दुनियेची प्रगती |
युगाच्या अंतापर्यंत |
अशीचं राहील
बहिण भावाची ही प्रीती !!!
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌸🌸🌸🌸
– रचना : आशा दळवी. दुधेबावी, फलटण. सातारा
२. रेशीम धागा
रेशमाचा धागा नव्हे नुसता दोरा
माझा भाऊराया माझा एकमेव साहारा
रेशमाच्या राखीला
शोभे रेशमाचा गोंडा
भाऊरायाच्या जीवनी सदा राहु दे
देवा सुखाचाच लोंढा
रेशमाच्या धाग्याला बांधली निरगाठ
भाऊराया जन्मभर राहु दे
अशीच निरगांठ
रेशमाच्या धाग्याला कशी म्हणू धागा
भाऊराया तुझी काळजात जागा
सदा सुख समृध्दी लाभो भाऊराया
हिच सदिच्छा माझ्या भाऊराया
– रचना : सुरेखा तिवाटणे.
३. रक्षाबंधन
जगामध्ये वेगळे असते,
नाते बहीण, भावाचे.
कधी रुसवे कधी फुगवे,
प्रेमा आणि मायेचे.
बंध हे अतूट आहे,
कधीही न पुसणारे.
आला किती दुरावा तरी,
दुःखात जवळ असणारे .
बंध हे रेशमाचे,
जपावे मनोभावे.
मायेच्या सागरात,
भरभरून प्रेम द्यावे.
बंधुभावाच्या नात्याला,
नसतो कोणता किनारा.
दुःखाच्या सागरात,
बहिण भावाला एकमेकांचा सहारा.
बहिणीच्या रक्षणासाठी,
भाऊ अर्ध्या रात्री येतो.
मायेच्या कुंपणाची साक्ष,
नभी चंद्रमा देतो.
सण रक्षाबंधनाचा,
बहिण आणि भावाचा.
मायारूपी राखी बांधून,
सण साजरा करू अतूट नात्यांचा.
– रचना : सौ भारती वसंत वाघमारे. मंचर, पुणे
४. चारोळी : रक्षाबंधन
बांध तु ताई मनगटावर राखी
सण हा रक्षाबंधनाचा आला
उभा राहीन सदैव ताई पाठीशी
सण हा स्नेह आनंदाचा आला
– रचना : पंकज रा. काटकर. काटी, उस्मानाबाद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
रक्षाबंधनाच्या सुंदर कविता.
🌹सुंदर कविता सर्व 🌹