Home बातम्या रमेश पाटील : मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी निवड

रमेश पाटील : मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी निवड

0

शरीर सौष्ठव स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील दिघोडे गावचे सुपुत्र रमेश पाटील यांनी आतापर्यंत विविध शरीर सौष्ठव स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त करूनअनेक गोल्ड मेडल पटकाविली आहेत.

रमेश पाटील यांना आतापर्यंत महाराष्ट्र श्री- गोल्ड मेडल, द्रोणागिरी श्री -टायटल, चैम्पियन ऑफ चॅम्पियन, वेलर क्लासिक क्रमांक 5 अशी अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

नुकतीच रमेश पाटील यांची मिस्टर इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकमेव अशी निवड झाली आहे. रमेश पाटील हे स्टॉम फिटनेस कोप्रोली येथे व्यायामाचे, फिटनेसचे ट्रेनिंग घेत आहेत.

रमेश पाटील यांना आर्यन पाटील, आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर तथा कोच सिद्धेश शिंदे,निशिकांत घरत, अशीष पाटील,अनिकेत पाटील यांचे नेहमी मार्गदर्शन लाभत असते. रमेश पाटील यांना घडविण्यासाठी तसेच स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय कोच सिद्धेश शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

रमेश पाटील यांच्या या निवडीबद्दल रायगड जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर,माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच अनेक जणांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

विठ्ठल ममताबादे.

– लेखन : विठ्ठल ममताबादे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version