कोरोनामुळे हल्लीच्या काळात सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील We Embrace ह्या एनजीओने गेल्या वर्षी सहा एपिसोड आणि ह्या वर्षी दोन एपिसोड असे दिव्यांगांसाठी ऑनलाइन टॅलेंट शो घेतले होते ज्यात जगभरातील दिव्यांग मुले सहभागी झाली होती.
त्यातच जन्मापासून अतितीव्र कर्णबधिर असलेली पनवेलची रश्मी पाटील, हिने प्रत्येक भागात आपली कला सादर केली.मग कधी ज्वेलरी मेकिंग, कधी कोळी नृत्य, कधी भरतनाट्यम्, कधी मेकअप आर्टिस्ट, अशी ही रश्मी एक मल्टी-टॅलेंटेड मुलगी आहे.

नुकताच We Embrace चा टॅलेंट शो त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सादर करण्यात आला, ज्यात रश्मी पाटील हिने भरतनाट्यम् सादर केले होते. यासाठी तिची सगळ्यांनी वाहवा केली.
रश्मी ही वयाच्या सहाव्या वर्षापासून भरतनाट्यम् शिकतेय. आजवर तिने चाळीसच्यावर स्टेज शोज् केले आहेत. गेल्या वर्षी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने घेतलेल्या नृत्य स्पर्धेत ती भारतात पहिली आली होती.
अडचणींचा बाऊ न करता, त्यांच्यावर मात करून रश्मी जे यश मिळवीत आहे, ते केवळ दिव्यांग मुला मुलींनाच प्रेरणादायी नाही आपणा सर्वांनाच प्रेरणादायी आहे.
तिच्या यशात कुटुंबियांचा फार मोठा वाटा आहे.

We Embrace ची facebook link https://www.facebook.com/weembracefamilies/
रश्मीच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
– लेखन : अलका भुजबळ 9869484800.
🌹रश्मीच्या उतुंग यशासाठी तिचे अभिनंदन 🌹तसेच पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा 🌹
Hearty and dear Rashmi…God bless you abundantly. Truly inspiring.Very proud of you and your family.❤💐💐
रश्मीची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद.
Hats off Rashmi 👍
Wow!! Amazing Rashmi! Truly Rockstar!!👏🏽👏🏽👌🏽
रश्मी व जतिन बहीण भावाला अगदी लहान पणं पासून ओळखते, दोघांचे ही कौतुक कराल तेवढे शब्द अपुरे पडतात. आई अर्चना व मी शिक्षिका असल्या मुळे नेहमी आमच्या दोघींचे कोणती परीक्षा, सध्याची प्रगती, अजून काय करावे लागेल, मुलांना प्रेरणादायक याच गोष्टी वर चर्चा असते. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा खुप छान, So My best wishes are always with you Rashmi
Mrs Mangala Shankar Birajdar
जतिन व रश्मी च अगदी लहान पणा पासून प्रगती जवळून पाहत आले आहे, अर्चना म्हणजे आई पहिली गुरू मार्गदर्शिका आमच्या दोघींचे गप्पा म्हणजे मुलानं साठी अजून काय करु शकतो कोणती talent examination असेच खरंच खुप कौतुक करावे तेवढे कमीच माझ्या जवळ आणखीन काय बोलू शब्द उरले नाही, so, All the best for future my best wishes are always with you.
Khup chaan mahiti
Thank you so much Alka Tai.🙏🙏
Thank you 🙏