मराठी साहित्य मंडळ या संस्थेच्या वतीने राज्यातील विविध शहरांमध्ये राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित केली जातात.
यापूर्वी उदगीर, उस्मानाबाद, सातारा, कराड, ठाणे, मुंबई, जव्हार, पालघर येथील काव्य संमेलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता कारण प्रस्थापित कवी समवेत नवोदित कविनाही कविता सादर करण्याची संधी मिळत असते.
या वर्षी हे राज्यस्तरीय काव्य सम्मेलन वर्धा येथे रविवार, दिनांक २७ नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित केले आहे, वर्धा शहरात होणाऱ्या ९६ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हे राज्यस्तरीय काव्य सम्मेलन मुख्य आयोजिका मराठी साहित्य मंडळाच्या वर्धा शहर अध्यक्षा कवयित्री लता हेडाऊ यांनी आयोजित केले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कविता संग्रहांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामधील विशेष योगदान असणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण आणि विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला l आमदार डॉ .पंकजभाऊ भोयर, वर्ध्याचे नगराध्यक्ष मा. अतुल तराळे, अग्निहोत्री कॉलेजचे सचिव सचिन शंकरप्रसाद अग्निहोत्री , महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित (बाबूजी) शंकरप्रसाद अग्निहोत्री, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक अर्चनाताई वानखेडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
तरी इच्छुकांनी आपले प्रस्ताव संस्थेच्या कार्यालयात ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोहोचतील अशा रितीने पाठवावेत.
नियम व अटी खालीलप्रमाणे:-
1) फक्त कविता संग्रहच पाठवावेत. इतर कोणतेही साहित्य पाठवू नयेत
2) कविता संग्रहासोबत एक पानी परिचय पत्र पाठवावे (घरचा संपूर्ण पत्ता, वाटसप नंबर चा स्पष्ट उल्लेख असावा)
3) पुस्तकांच्या दोन प्रती पाठवाव्यात.
4) कविता संग्रहाला प्रकाशन वर्षांची कोणतीही अट नाही. मात्र तो प्रथम आवृत्तीचा असावा.
5) प्रस्ताव पोस्टाने पाठवू नयेत, कारण दिरंगाई होण्याचा संभव असतो किंवा प्रस्ताव वेळेत मिळतच नाहीत.
6) प्रस्ताव कुरीअरने पाठवावेत.
7) समाज भूषण व विद्या भूषण पुरस्कारासाठी इच्छुकांनी आपले थोडक्यात परिचय पत्र पाठवावे (घरचा संपूर्ण पत्ता, वाटसप नंबर व थोडक्यात कार्याचा अहवाल यांचा स्पष्ट उल्लेख असावा)
8) निवड समितीचा निर्णय अंतिम राहील
9) प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता :-
मराठी साहित्य मंडळ,
नीलकंठ बिल्डिंग, पहिला मजला,
गाडगीळ ज्वेलर्स समोर, राम मारुती रोड,
नौपाडा ठाणे (पश्चिम) – 400 601.
राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य, समाज, आणि विद्याभूषण पुरस्कारासाठी इच्छुकांनी आपले प्रस्ताव त्वरित पाठवावेत असे आवाहन मराठी साहित्य मंडळाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव वर्षा थोरात यांनी केले आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800