काट्या वरुन चालताना
जाणिव झाली गारव्याची
अवचित येता लहरी वारा
आठवण आली घराची
चालता चालता थकले
पाण्याविना तहानले
देईल का कोणी पाणी
देवासमोर हात जोडले
वाट ही खडतर झाली
माझे घर ही राहीले दूर
चालणे हाच होता पर्याय
होते मनी भीतीचे काहूर
काळरात्र संपणार आता
उषःकाल उमेदीने येईल
कशाला करु चिंता आता
भीतीचं जळमट दूर होईल

– रचना : परवीन कौसर, बेंगलोर.
सुरेख कविता आहे👌🏻