रिमझिम रे श्रावण
सखा तू मनभावन
ओले नवे हे दर्पण
फुलांचे नव नर्तन.
बरस बरस मेघा
साथी सोबत चपला
मारी मिठी जल धारा
गंध फुलांचा ही ओला
मत्त नाचे धुंद मोर
पाण्यालाही चढे जोर
अलवार हिरवळ
तुषार ते शिरजोर.
इंद्रधनु हे रंगीत
वेळू चे नवे संगीत
जलधाराने मोहित
जडे धरेलाही प्रीत.

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर कविता