Home बातम्या लालबत्ती : मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारा

लालबत्ती : मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारा

0

उपेक्षित लालबत्ती भागातील मुलांचे आयुष्य घडविण्यासाठी कटिबध्द असलेल्या गोल्डन लेटर्स बाल विकास फाउंडेशनच्या “पाटी पुस्तक” या उपक्रमाच्या यशस्वी पूर्ततेचा कार्यक्रम नुकताच ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाला.

यावेळी बोलताना फाउंडेशनच्या सल्लागार, सामाजिक जाणिवेच्या अभिनेत्री डॉ निशिगंधा वाड म्हणाल्या, आयुष्यामध्ये आपल्याला काय व्हायचं आहे हे नक्की ठरवा. आकाशातून पडलेल्या तीन थेंबांचे वर्णन करताना मुलांनी शिंपल्यातील अनमोल मोती कसे व्हावे हे पटवून देत जेव्हा तुम्ही सक्षम व स्वावलंबी व्हाल तेव्हा इतरांना मदत करायला विसरू नका असा प्रेमाचा संदेशही त्यांनी दिला.

या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलिया निवासी श्री सर्जेराव पाटील व त्यांचे कुटुंब आले होते. या सगळ्या कार्यामध्ये या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. तसेच आयडियल स्कूलच्या सेक्रेटरी मोना अरोरा मॅडम यांचेही या उपक्रमात मोलाचे योगदान आहे.

सचिव डॉ मनीषा गुरडे सदस्य शोभा ताई, उपाध्यक्ष श्री पराग गराडे यांचा देखील मोलाचा सहभाग आहे. कार्यक्रमात मुलांनी आपल्या नृत्यांनी सगळ्यांची मने जिंकून घेतली.

उपक्रम यशस्वी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार ह्या प्रसंगी करण्यात आला.

तिमिरातून तेजाकडे वाटचाल करणाऱ्या ह्या मुलांना उज्वल स्वप्न पाहण्याचे बळ देणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ.अश्विनी बापट ह्यांनी अगदी उत्तम केले.

गोल्डन लेटर्स
लालबत्ती भागातील मुलांच्या शैक्षणिक, आरोग्य व सर्वांगीण विकासाची जबाबदारी घेतलेल्या, याच विषयात पी.एचडी केलेल्या गोल्डन लेटर्स फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर गेली कित्येक वर्षे या बालकांच्या प्रगतीसाठी काम करत आहेत. आता त्यांच्या सोबत एक मोठी फळी जोडल्या जात असून सगळ्यांचे काम कौतुकास्पद आहे. या कार्याची छाप परदेशात देखील पोहोचली आहे.

फाउंडेशन चे डॉक्टर दुष्यंत खेडीकर यांनी मुलांच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने योजना आखल्या असून त्यावर काम सुरू आहे. डॉक्टर अमोल गीते यांचेही या कार्यात पूर्ण सहकार्य आहे.

भांडुप येथील आयडियल स्कूल मध्ये या मुलांना शिक्षण दिले जात आहे.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version