Friday, March 14, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात....

वाचक लिहितात….

नमस्कार, मंडळी.
न्युजस्टोरीटूडे या वेबपोर्टलवर आपण भरभरून प्रेम करीत आहात, त्याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत.
अनेक वाचक तात्काळ प्रतिसाद देतात, तर काही आपल्या प्रतिक्रिया लिहून पाठवित असतात.
वाचकांकडून प्राप्त झालेल्या निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहोत.
आपल्या काही सूचना, मार्गदर्शन असल्यास कृपया ते निश्चित कळवावे.
आपले प्रेम आहेच, ते वृद्धिंगत होवो, ही विनंती.
आपले स्नेहांकित,
टीम एनएसटी.
https://newsstorytoday.com
Mb : 9869484800.

आदरणीय श्री देवेंद्र भुजबळ सरांचा माझा संपर्क ४ जुलै २०२० या दिवसापासून झाला. त्यांचा वाढदिवस त्या दिवशी असल्याने माझ्या नित्यक्रमाप्रमाणे त्यांचा नंबर शोधून शुभेच्छा दिल्या. परंतु काही दिवसांनी त्यांचा मला फोन येईल असं वाटलं नव्हतं. त्यात त्यांनी मी वाढदिवसांना शुभेच्छा देणं या छंदाविषयीचा प्रवास, आलेले अनुभव आणि समोरच्या व्यक्तीकडून मिळालेला प्रतिसाद या विषयी सविस्तर चर्चा झाली आणि त्यास त्यांनी प्रसिद्धी दिली.
त्यावेळेस मला कळलं की सरांकडे एक असं लोकप्रिय व्यासपीठ म्हणजे “Newsstorytoday” असं आहे की राजकीय, गुन्हेगारी, वाईट साईट गोष्टी सोडुन प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणारे अथवा विविध कलाकारांना आपली कला जनतेपर्यंत पोहचविण्याचे एकमेव व्यासपीठ असुन त्यात त्या क्षेत्रातील काम करणाऱ्यांना प्रोत्साहन बरोबर आनंद देण्याचे व्यासपीठ असुन तो आनंद कितीही केलं तरी विकत घेता येत नाही आणि आत्मविश्वास वाढविण्याचेही हे एक व्यासपीठ म्हटलं तरी चुकीचे नाही.
आतापर्यंत एक वर्षात मी जवळ भरपुर क्षेत्रातील लोकांच्या कला वाचल्यात. यात येणारे विविध लेख, त्या त्या दिवसांचे महत्व, असं भरपुर काही देत असतात.
जसा माझा छंद म्हणजे, वाढदिवसांना शुभेच्छा देणं. त्यात कुठल असं क्षेत्र सोडलं नाही अस झाल नाही. तश्याच प़कारची कला देण्याच, जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम आदरणीय श्री देवेंद्र भुजबळ सरांनी केल आहे. एक क्षेत्र असतं तर लिहिल असतं. परंतु ते इतकं मोठं त्यांच कार्य आहे, ज्यांना त्यांनी प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी लिहायला गेलो तर पेपर अपुर्ण पडेल.
तरी त्यातील प्रमुख म्हणजे, अंध सुजाताची डोळस कहाणी, स्वातंत्र्य दिन विशेष, शिक्षक दिन विशेष, लोक काय म्हणतील ? या प्रश्नामुळे जगायचे राहुन जाते आणि जीवनाचा खरा आनंद शोधण्यात आयुष्य निघून जाते, जपू या मनाचे आरोग्य, प्रेरणादायी कुलगुरू, चित्रवाणी स्मरण रंजन, श्रमिक महिलांपुढील समस्या, आणि विशेष म्हणजे आजच्या धकाधकीच्या काळात विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या महिला असे भरपूर काही आहे, गरिबांसाठी मोफत वृध्दाश्रमाची माहिती त्यांनी दिली.
त्यांच्या या कार्यास खुप खुप शुभेच्छा 🙏🙏

मदन रामनाथ लाठी
न्यु सांगवी, पुणे
मुळ जळगाव निवासी.
९४०५०५४९६०
९८२३०८०००४
मेल आयडी :- madanlathi@gmail.com

आजच्या कोरोनामय जगण्यात सगळेच कसे शृंखलाबद्ध झालेले आहे. श्वासही जेथे जपून घ्यावे लागत आहेत, जिथे सारे सारे हरवून गेल्यासारखे वाटत आहे अशा कुंठीत वातावरणात एक दिलासा, एक कवडसा मिळाला तर ? तो दिलासा, तो कवडसा लाभलाय https://newsstorytoday.com या श्री देवेंद्र भुजबळ, निवृत्त संचालक (माहिती  व जनसंपर्क) यांनी सुरु केलेल्या वेब पोर्टलमुळे, बातम्या, लेख, यशकथा, संस्कृती आणि साहित्य अशा वैविध्यपूर्ण सदरांखाली सातत्याने या वेब पोर्टलवर वाचकाला दर्जेदार, निवडक व हवेहवेसे असे वाचावयास मिळत आहे.
जगभरात या पोर्टलला वाचक लाभले आहेत आणि भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मीही या पोर्टलवरील लेख, यशकथा, कविता आवर्जून वाचत असतो. प्रत्येक वेळी त्यातून काहीना काही मिळत रहाते आणि अशा वाचनातून एक अनोखे समाधान लाभत रहाते. जे जे चांगले उदात्त ते ते गुण ग्राहकतेने निवडून वाचकांना सादर करणे ही तळमळ या पोर्टलमधून निश्चितच दिसून येते. पुस्तक दिनानिमित्त माझ्या “पुस्तक माझे मित्र” या लेखाला सुद्धा या पोर्टलने असेच निवडून स्थान दिले आणि मला आपले सदस्य करुन घेतले. या पोर्टलचे शतशः आभार व खूप खूप शुभेच्छा!

विलास कुडके.

– विलास आनंदा कुडके, नाशिक.

कोरोना : स्पर्श मायेचा. 🙏🙏
गणेश जोशी यांच्या व्यंगचित्र कलेला सादर प्रणाम🙏🙏
परिवर्तन कथा खूपच बोधकारक.
वर्षाचे अभिनंदन लेखमाला चालू केल्याबद्दल👍👍
डॉ. मंजुषा यांची कविता फारच सुंदर..❤️❤️❤️कोल्हापूरची रणरागिणी वाचून अंगावर अक्षरशः काटा आला.
सलाम त्यांच्या धाडसाला🙏🙏
मुंबईकर feeling proude 🙏🙏🙏🙏
चौकटीच्या बाहेर लेख खूपच अप्रतिम, लेखिकेच्या ई बुक बद्दल खूप उत्सुकता❤️❤️❤️

मानसी लाड.

मानसी लाड, मुंबई.

नमस्कार.
सहस्त्र दल स्वरूपी
विमल ताई यांची जीवन गाथा
स्तंभित करणारी आहे.

खरेतर अर्चना ताईंना म्हणावे,
तुम्हाला विमलताई ही एकच आई नव्हती तर सहस्त्र वाती असणारी ती एक समई होती.
एकाच वेळी शंभर वाती
प्रज्वलित केल्या तर दाही दिशा
उजळून टाकणारी तेजस्वीनी
होती। त्यांना माझा मुजरा.

प्रकाश पळशीकर

— प्रकाश पळशीकर, नॉयडा.

आदरणीय श्री देवेंद्रजी नमस्कार.
आपण सुरु केलेल्या न्युजस्टोरीटूडे मधून सप्तरंगी, विविध पैलूनी कोरलेले, यश कथा, जीवन प्रवास, ललित कथा संग्रह, कविता, विविध रंजक विषय आमच्या मनात उत्सुकता निर्माण करतात. या आपल्या माध्यमातून समाज बांधवानी जागरूकतेने पाहावे, आपली लिखाणावरची निष्ठा आणि सर्वोत्कृष असेच करण्याचा ध्यास या दोन गोष्टी वर माणसाच्या जीवनाची कृतर्थता अवलंबून असतें.
आपले कठोर परिश्रम, चिकाटी, सकारात्मक दृष्टिकोन, प्रेरणा, ध्येय ठरविणे असा कृती कार्यक्रम सुरु आहे.
दृष्टी ही शिखराकडे हवीच पण त्यासाठी छोटी पायरीही हवीच, ती तुम्ही सुरु केली आहे.
तुमच्या या सप्तरंगी लिखाणाबद्दल आमच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा व शुभाशीर्वाद . आपल्याकडून असेच समाज प्रबोधन व्हावे ही प्रभू चरणी प्रार्थना…….

प्रकाश वैद्य

प्रकाश त्रंबकराव वैद्य, नाशिक.

सगळेच लेख आणि बॉम्बे हाय कविता एकदम हृदयस्पर्शी. खूप छान. एका दमात वाचून काढले. धन्यवाद अलका. रोजच्या वाचन मेजवानीची मी आतुरतेने वाट बघत असते🙏🏼🙏🏼खूप खूप धन्यवाद🙏🏼असाच तुझ्या या अप्रतिम कार्याचा वटवृक्ष व्हावा ही मनोमन इच्छा त्या करता खूप खूप शुभेच्छा🙏🏼🙏🏼❤️❤️

शुभदा रामधरणे.

शुभदा रामधरणे, मुंबई.

नमस्कार.
डॉक्टर व्यंकटेश शिवणे
कन्सल्टंट डायबेटाँलाँजिस्ट आणि मेटाबँलिक फिजिशियन यांचा लेख वाचला.
डॉक्टरांनी आपल्या लेखात रक्तदाब होण्याची कारणे स्पष्ट केली आहेत.यात मूळ कारण चिंता हे आहे. तसेच ताण तणाव मधून मधुमेह, उच्च रक्त दाब यासारखे आजार जडतात. रक्तदाब म्हणजे 140/90 पेक्षा जास्त असे संबोधले जाते. याचे काही वेगळे निकष आहेत डायबेटीस, हृदयविकार इ.वर उपचार अवलंबून असतात.
अनियंत्रित उच्च रक्तदाबाचे परिणाम ह् दय, किडनी आणि मेंदू वर दुष्परिणाम होतात. त्यासाठी
औषधासोबत काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत…
१)भरपूर व्यायाम, योग आणि प्राणायाम ४५-५० मिनिटे दररोज चालणे हे उपयुक्त ठरते.
२)सकस आहार सेवन करणे.
आहारात तेलकट पदार्थ, जंकफूड टाळणे, अतिरिक्त मिठाचा वापर कमी करणे.
३)सातत्याने आपल्या मनात चांगले विचार असलेच पाहिजेत.
४)निराशा आणि चिंता या दोन गोष्टींचा त्याग करणे.
५)प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणे मी या रोगातून बरा होणारच.
६)सकारात्मक विचार जागृत ठेवणे.
या गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजे वाटते.
आपण हा चांगला लेख प्रसिद्ध केल्याबद्दल मनःपूर्वक आभारीं आहे.
आपला
कृष्णकांत सासवडे, पिंपरी चिंचवड.

कृष्णकांत सासवडे.

नमस्कार, सुरेखा गावंडे यांचा साहित्याचा प्रवास खरेच सुरेख आहे. नोकरी करून या गृहिणीने साहित्यात मुशाफिरी केली आहे. चित्रपट गीत ही लिहिले. त्यांनी खऱ्या अर्थाने जीवन आनंदमय करण्यासाठी साहित्य प्रवास केला. खूप खूप शुभेच्छा!

मेघना साने

–  मेघना साने, ठाणे.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. प्रिय श्री काचावार, आपला प्रतिसाद हीच आमची ऊर्जा आहे. आपले प्रेम असेच राजू द्या.

  2. सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी

    सर, नमस्कार,आपण सेवानिवृत्ती नंतरही आपला लिखाणाचा छंद चालूच ठेवलात त्याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन. राजकारण विरहित,जे जे काही समाजात चांगले, आदर्शवत आहे त्या उपक्रमाला व्यासपिठ मिळवून दिलात. उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. Newsstorytoday या आपल्या वेब पोर्टल ला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपला स्नेही, सुरेश काचावार.निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments