नमस्कार, मंडळी.
“पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा”…..हा निसर्गाचा रुद्रावतार आपण गेले काही दिवस महाराष्ट्रात पहात आहोत. याचे पडसाद आपल्या पोर्टलवरही उमटले. आपले सर्व पूरग्रस्त बंधू, भगिनी यातून लवकर सावरतील, अशी आशा करू या. आपल्या कडून त्यांना होईल ती मदतही करू या.
गेल्या आठवड्यात सौ गौरी जोशी-कंसारा यांच्या रस ग्रहणावर काही छान प्रतिक्रिया प्राप्त झाल्यात.
तसेच आम्ही लाखखिंडकर…या निवृत्त सहसचिव श्री राजाराम जाधव यांच्या लेखावरही हृदयस्पर्शी प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. डॉ प्रशंसा राऊत दळवी यांच्या “स्त्रियांचं आरोग्य” सदरही वाचकांना उपयुक्त वाटत आहे. त्या व इतर प्रतिक्रिया पुढे देत आहे. ऑगस्ट महिन्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
आपला,
देवेंद्र भुजबळ
संपादक
नमस्कार
अत्यावश्यक माहिती खासकरून स्त्रियां साठी, तुमच्या लेखातून वाचायला मिळाली. कदाचित
स्त्रियांवरील दडपण दूर होईल, रोग तीव्रता वाढण्याअगोदर तुम्हा सारख्या डॉक्टरांना भेटतील. धन्यवाद
– सौ. वर्षा महेंद्र भाबल.
Nice article… Very well explained how to take care of your mind and maintain physical health. Thank you
– Mrs. Aakansha Gokhale
खूप सविस्तर, समर्पक, अभ्यासपूर्ण आणि सखोल परीक्षण, विवेचन आणि रसग्रहण केलेले आहे गौरी ताईंनी. इतकी सुंदर उदाहरणे व सुंदर शब्दसौंदर्य वापरून ताईंनी आदरणीय बापट सरांचे समग्र व्यक्तिमत्त्व उभे केले. खऱ्या अर्थाने आज ताईंमुळे खरे बापट सरांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू मला कळले. तेव्हा थोर आहेतच पण आज खरी ओळख झाली.खूप खूप धन्यवाद, ताईसाहेब आणि आदरणीय भुजबळ सर, इतका सुंदर लेख प्रकाशित केल्याबद्दल.
– प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे, अकोला
कोकण मार्गदर्शक सूचना हा अतिशय चांगला उपक्रम ! मी हे अनेकांना फॉरवर्ड केले आहे !
– प्रा प्रतिभा सराफ
कारगील दिनाच्या निमित्ताने भारताच्या कारगील युध्दात शहीद झालेल्या सर्व शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या परिवाराला मानाचा मुजरा.
– राजाराम जाधव
कोकणात झालेली अतिवृष्टी आणि आलेला महापूर यामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले. अपार वित्त हानी तसेच जीवितहानी झाली. कोकणाचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. चीड येणारी गोष्ट म्हणजे मदतकार्य करताना राजकारणी लोकांची लुडबुड, राजकारणी नेत्यांचे पाहणी दौरे व त्यातील राजकारण.
निसर्गाच्या पुढे कोणाचे काही चालत नाही. अतिवृष्टीमुळे मृत पावलेल्या सर्व अबाल वृध्द नागरिकांना भावपुर्ण श्रद्धांजली.
डॉ. राणी खेडीकर यांच्या या महान कार्याला सलाम.🌹🙏
– मोहन आरोटे 🙏
हरिगाव आम्ही सुद्धा अनुभवलेले असून, लेखात दर्शविलेल्या हरीगावच्या भव्यतेबाबत विस्मरणात चाललेल्या हरीगाव ला उजाळा मिळाला आहे,.
कुणालाही हेवा वाटेल असे हे गाव आज अखेरच्या घटका मोजत आहे !
– मोहन बापूराव गायधने
आम्ही हरिगावकर…
It’s really awesome. You took me to my grandpa’s memories. My grandfather Mr. Madhavrao Jadhav used to tell these views and sweet experiences in Harigaon that you ve mentioned. My dad and aunt always speak about it a lot. I stayed in cities only but when they used to speak about Harigaon it was like a fairytales for me. I wish I could experience the same happy days there.
– Archana Ramdasi
आम्ही हरिगावकर
Really nice …………Haregone var kya bolave te divas kadhich vapas yenar nahi evdhich khanta..
– Shraddha Hiwale
अत्यंत जबाबदारीची कामं निष्ठेने आणि नेटाने पार पाडणारे हे समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत. मिलिंद ठेकेदार सरांच्या कामाकडे पाहताना हे लक्षात येतं की Consumers Protection Act मधील सर्व गोष्टींची योग्य पूर्तता करुन कामगारांचे व ग्राहकांचे हित केंद्रस्थानी ठेवले व उद्यमशीलतेचा आदर्श समोर ठेवला. मेघनाताई व हेमंत साने सरांनी समर्पकरीत्या आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यांचे आभार!
– सुजाता राऊत
कहाणी एका उद्योजकाची
Great Leader and his team. I know him from 2001 and JBS is growing and caring organisation. All the best.
– P M Yadav.
खूप छान लेख एक कर्मचारी सुद्धा उद्योजक होऊ शकतो हे तरुणांना स्फूर्ती दायक आहे..
– दीपक म कांबळी
वाचनीय अनुभव…. प्रत्यक्ष वारीतच आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं वाटलं
– विकास मधुसूदन भावे
श्रद्धा,
सुंदर लिहिले आहेस. बालपणीच्या आठवणी लिहिताना तुझ्या मनात काय आले असेल याची जाणीव झाली.
अशीच लिहीत जा.
– जयंत करंबेळकर
श्री राजाराम जाधव यांच्या
” आम्ही लाखखिंडकर”…वर प्राप्त प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत…
आदरणीय पापा,
तुमच्या लिखाणाबद्दल, वाचनाबद्दल लिहावं, सांगांव तेव्हढ कमीच आहे. लाख ते मुंबई मार्गे नागपूर असा तुमचा जो थक्क करणारा प्रवास आहे, आणि त्यातही वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा वेळोवेळी विविध स्तरावर आपण नेहमीच दाखवत आला आहात. या आपल्या संपूर्ण प्रवासात ज्या गुरुजन वर्गाचा आपणास सहवास लाभला त्याचा आपण योग्यरीतीने स्वतःचे जीवन घडविण्यास नक्कीच सदुपयोग करून घेतला. जीवनात आपण वेगवेगळ्या स्तरातून जाताना खूप मित्र मिळवलेत आणि त्यांची मैत्री टिकऊन ठेवली. विद्यार्थीदशे पासून ते आज वय वर्ष ६३ आणि अजून पुढेही आपण आपल्या कार्यातून विशेषतः दिनचर्येतून जो उस्फुर्तपणा दिसून येतो त्यातून आमच्यासारख्या तरुण पिढीला बरेच काही शिकण्यासारखे आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्याने दिलेले अनुभव तुमचं दांडग वाचन तसेच तुम्ही स्वतः संगोपन केलेले तुमचे साहित्यिक लेखन आणि त्यातून निर्माण झालेलं व्यासंग हे वाखनन्या जोगी आहे. त्यातून पुढच्या पिढीला नवचैतन्य मिळून आयुष्यात शुण्यातूनही जग/विश्व निर्माण करण्याची प्रबळ इच्छाशक्ती निर्माण होईल. तुमच्या या अफाट बुद्धिमत्तेला आणि तुमच्या इच्छाशक्तीला सलाम. आपणास आपल्या पुढच्या लिखाणासाठी आणि येणाऱ्या पुस्तकांसाठी शुभेच्छा… 💐💐
– प्रतिक राजाराम जाधव
आदरनिय मामाजीस, आपला खडतर जीवनप्रवास अवगत होताच. पण आज त्याला उजाळा मिळाल्याने आम्हाला आमच्या लहानपणी राजाराम मामा गावी येणार म्हटल्यावर आता आपली काही गय नाही..ते यासाठी की मागिल वर्षात मिळालेले गुण ?? सध्या कितपत अभ्यास झालाय ?? यावर्षी काय करणार ?? या सर्व प्रश्नांची उत्तरे देतांना आपली खूप आदरयुक्त भिती वाटायची..
पण आज कळतेय ते चांगल्यासाठीच होते..कदाचित् आपणास आमचे भविष्य घडविण्यासाठीचे पूर्वज्ञान असावे. आपल्या खडतररूपी जिवनवेली नियमित आनंद फुलत राहो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏आपलाच..
– संतोष चव्हाण, मुख्याध्यापक, चिखली, बुलढाणा
Your hard work, enthusiasm, achievement, and guidance always motivates me towards the aspirations and goals….
I frequently heard about your struggle from my father…. Though he has done a lots of struggle in his life..
And I grateful and thanks to god that, I got such a good people to guide and support at every moment….
Everyone in our entire family should take motivation, guidance and aspirations from you to be a successful human being in his domain….
Hats off…. Salute…. 🙏
– Profe. Sachin Chahan
Walchand Engineering College, Sangali.
दादासाहेब…आपला जीवन प्रवास म्हणजे गावातील तरुण पिढीला प्रेरणादायी ठरावा असाच आहे…आपली जिद्द, मेहनत आणि गुरुजनांचे आशीर्वाद हेच तुमच्या जीवनाचे स्त्रोत ठरलेत…
लाखमधील सर्वांसाठीच आपण आदरणीय आहात…तुम्हाला दिर्घ आयुष्य आणि चांगले आरोग्य लाभो व तुमचा जीवनरुपी ‘अमृतवेल’ सतत वृद्धिंगत होत राहो हिच सदिच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना सुद्धा….💐
– प्रा. डॉ. विवेक चौधरी. नांदगाव खंडेश्वर, अमरावती.
आदरणीय काकासाहेब
नमस्कार, आपण आपल्या गावचे व आमचे आदर्श आहात, सलाम आपल्या कर्तुत्वाला🌹🌹🙏🙏*
– ॲड. मनोहर राजगुरे, लाख खिंड – दारव्हा
खरच काकाजी,
आपण महान आहात.
आपण एवढ्या कष्टामधून एवढं मोठ यश, कीर्ती संपादन केली, तरी सुद्धा गावाशी असलेली आपली नाळ कायम ठेवून आपली माणसं जपली खरंच आपला आम्हास अभिमान आहे. 🙏🙏🌹🌹
– प्रा. डॉ. ठकसेन राजगुरे, कारंजा, लाड
आदरणीय
राजारामजी जाधव साहेब,
आपण अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये दिवस काढत शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले त्यासाठी तुमच्याजवळ असणारी जिद्द चिकाटी खरंच शब्दात मांडणे हे माझ्यासाठी अशक्य . दादासाहेब ,आपण आम्हा लाखवासीयासाठी प्रेरणा आहात हे आजच्या पिढीसाठी तुमच्या रूपाने हे एक जिवंत उदाहरण आहेत . असो तुम्हास उर्वरित आयुष्यासाठी माऊली मुंगसाजी चरणी अनंत कोटी प्रार्थना तुमचा पुढील काळ आनंदमय जावो हीच प्रार्थना
आपलाच सदैव
– सुभाष लांडगे. सहा. शिक्षक जि.प, लाख खिंड
💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏