नमस्कार मंडळी.
आज मकर संक्रांत आहे. एकमेकातील हेवेदावे विसरून,”तिळगुळ घ्या गोडगोड बोला”…असे म्हणत आपण हा सण साजरा करतो आणि एक मोठा मानसशास्त्रीय फायदा होतो, तो म्हणजे आपले मन पुन्हा स्वच्छ होते. तर तिळगुळ घ्या गोडगोड बोला…
आता पाहू या, या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…
आपला
देवेंद्र भुजबळ. (संपादक)
नव्या वर्षासाठी, नवे विषय, नव्या लेखमाला सुचवा, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पुणे येथील जर्मन भाषेच्या प्राध्यापक, जर्मन साहित्य, संस्कृती, समाज,जीवन याच्या अभ्यासक प्रा आशी नाईक यांची सुचविलेली “जर्मन विश्व” ही लेखमाला आपण गेल्या बुधवार पासून प्रसिद्ध करीत आहोत. या लेख मालेला मिळालेला प्रतिसाद पुढील प्रमाणे आहे.
१
प्रा.आशी नाईक यांनी लेख मालेसाठी सुचविलेला “जर्मन विश्व” हा विषय आणि त्या अनुषंगाने त्यांचा लेख दोन्ही आवडले .पुढील भागात, बाख, मिझर्ट ,मॅक्सम्युलर, वगैरेबद्दल अधिकची माहिती देणार का ?
— स्वाती वर्तक. मुंबई
२
वा आशी, खूप छान प्रकल्प. तुझ्या या नवीन उपक्रमासाठी खूप शुभेच्छा.
पहिला लेख वाचला. तुझी लेखन शैली आवडली, सोपे, सुटसुटीत लिहिले आहेस. त्यामुळे ज्यांना त्या विषयी काहीही माहीत नाही असे लोकही आवडीने वाचणार हे नक्की 👍
— स्वाती पाठक. पुणे
३
Congratulations on this new venture! Looking forward to reading many more articles by you. Wishing you great success, sending my best wishes and love!
— वृहानिका गादिया. पुणे
४
वाह खूप छान..
माझे मित्रपरिवार मधे पण वरील लिंक पाठवत आहे..
Great..
— रमाकांत सांडभोर. पुणे
५
ह्या लेखा बद्दल सांगायचं तर, विषयाचीओळख करुन देण्यासाठी योग्य पद्धतीनंच हा लेख लिहिला आहेस, तू सखी !
— शशिकला सरदेशमुख. पुणे
६
khup chan lekh ahe.
Abhishek German bhasha shikat ahe v Aditi German exam SAP det ahe mhanun mala te khup javalacha vatale.
— सुमेधा खर्शिकर. पुणे
७
वाह छानच !! अभिनंदन !!! आम्हाला मस्त मेजवानी मिळणार. मनापासून आवडले.
— ईश्र्वरलाल भावसार. पुणे
८
वाह खूप खूप अभिनंदन!
— वर्षा मुळ्ये. पुणे
९
लेख छान आहे. मला आवडला.👍🏻
तुला ऑल द बेस्ट
दर आठवड्याला आला की मी वाचत जाइन.
— सौ.माधवी आंबिकर. पुणे
१०
बेस्ट👌👌👌
— वरदलक्ष्मी. गोवा
११
All the best for ur new venture, & I feel proud that some one from my family is interested in such thing. Surely I will read & give u feedback. Thank u
— Sneha Indapurkar, Bhagynagar.
“उत्कृष्ट महापालिका अधिकारी: विजय लोखंडे…”
या मी (देवेंद्र भुजबळ) लिहिलेल्या यश कथेवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
१
खूप छान निरीक्षण आणि ते इतक्या अचूकपणे लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
माझे पप्पा (विजय लोखंडे ) आणि त्यांचे सारख्या प्रत्येक धडपडणाऱ्या , नागरिकांचे अडचणी सोडविणाऱ्या , कष्टाळू आणि कामाचे प्रती निष्ठा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचे कौतुक होण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते
— गायत्री लोखंडे. फॅशन डिझायनर
२
विभागीय कार्यालय क्रमांक 02 चे कर्तव्यनिष्ठ, अनुभवी, प्रत्येक कामामध्ये अत्यंत सचोटीने संपूर्णतः स्वतःला झोकून देऊन काम पूर्णत्वास घेऊन जाणारे, आम्हा सर्वांना येणाऱ्या प्रत्येक अडी अडचणीच्या प्रसंगी त्या मध्ये पाठीशी खंबीरपणे उभे राहून मार्गदर्शन करून त्यावर मार्ग काढून त्या अडचणी सर करणारे असे अत्यंत प्रेमळ व सर्वांचे लाडके अधिकारी श्री.लोखंडे साहेब यांना खूप खूप शुभेच्छा 🫡🥳💐
— भाऊसाहेब गेजगे इलेक्ट्रिकल इंजिनिअर मनपा
३
पुढील वाटचालीसाठी अभिनंदन सरजी
— अजय परांडेकर. इंजीनियर
४
साहेब आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त मिळाला पण आमच्या मनामध्ये तुम्ही खरेच उत्कृष्ट आहात अभिमान वाटला सर🙏💪
— शिवा पाटणकर :
५
Congratulations sirji
— विश्वभर मामड्याल. आर्किटेक्ट 💐
६
अभिनंदन व शुभेच्छा.
— नागनाथ माळवदकर. तहसीलदार सोलापूर
७
अभिनंदन
— विनोद कुलकर्णी. कर आकारणी प्रमुख
८
खुप सुंदर, आमच्या मित्राचा आम्हाला अभिमान आहे, तुम्ही असेच सेवाभावी कार्य करणेसाठी ईश्वर आपणास उदंड आयुष्य व आरोग्य द्यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
— प्रभाकर इंडीकर इंजिनिअर
९
खूप छान !!
नानांच्या उत्कृष्ट कार्यशैलीवर तुझा असाच दैनंदिन कामकाजाचा कायम असा ठसा उमटत राहु दे….अशीच दिवसे दिवस आपली प्रगती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे..सोलपुर महागरपालिका मधील अतिशय कठीण राजकारण वातावरणात आपण प्रामाणिक पणे उत्कृष्ट नियोजन पद्धतीने आपला विभाग सांभाळून नवीन कार्यपद्धती आत्मसात करून घेतली. अधिकारी व नागरिक यांच्या सुविधेचा विचार करून त्यानां चांगले वातावरण करून दिले..
— अभिजित लोखंडे.
१०
🌻🌻💐💐*
— दुधनी साहेब इंजिनिअर महावितरण
११
फारच छान . विजु मला तुझा अभिमान आहे. एक अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि कर्तव्य दक्ष अभियंता या महापालिका मध्ये आहेत ही बाब म न पा ची मान उंचाविणारी आहे. 🙏
— संदीप कारंजे.
अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगरपालिका
१२
अभिनंदन लोखंडेजी 🌹
— संभाजी कांबळे. सहा.संचालक नगर रचना
१३
रविराज परकिपल्ली :
प्रेमपूर्वक आणि अभिमानाने सर तुमाला हार्दिक अभिनंदन.
सर कल्पनाही करता येणार नाही इतका तुमच्या यशाबद्दल मला खूप खूप आनंद झाला आहे सर…
सर तुमच्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन..!
— रविराज परकिपल्ली :
१४
तुमच्या कारकिर्दीत आम्हाला तुमचे समवेत काम करणेस संधी मिळाली, तुमचा सहवास मिळाला ..हा एक वेगळा अनुभव होता. त्या करीता आम्ही ईश्वराचे आभारी आहोत.
— नरेंद्र चव्हाण इलेक्ट्रिकल इंजिनिअर :
१५
अभिनंदन लोखंडे साहेब,
उत्तम मनाला आनंद देणारी बातमी आहे…..
अधिकारी निस्पृह वृत्तीने काम करत असताना दखलपात्र होणे हे एक आत्मिक आनंदाचा स्थायी भाव दर्शविणारे समर्पणच आहे.
— महेश क्षीरसागर सहा अभियंता तथा विभागीय अधिकारी ८
१६
A Multi -dimensional personality super cop Thalipati Vijay Sir 👍
— अविनाश वाघमारे उपअभियंता मनपा :
१७
झोन सांभाळून कवित्व जपणारा अभियंता .👍
— प्रकाश दिवाणजी सहा अभियंता रस्ते :
सागर वाघमारे इंजिनिअर अँड कन्सल्टंट :
१८
Sir tumhi great ahat
Tumhi nehmi saglyansathi madtisathi pudhe asta
Tumhi tumche office as khelay ki saglya carporation cha employee sathi 1 adarsha office banavla ahe.
Even all licen engg and contractor
— सागर वाघमारे इंजिनिअर. सोलापूर
१९
Nice to read the article on Vijay 👏👏
— संदीप माहेश्वरी इंजिनिअर :
२०
Great👏👏👏 Vijay, Your hard work and dedication don’t go unnoticed , Congratulations 💐💐
— दीपक काटकर इंजिनियर.
२१
उत्कृष्ट महापालिका अधिकारी श्री विजय लोखंडे यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— मुबारक शेख डी सी सी बँक अधिकारी.
२२
उत्तम बातमी आहे,अधिकारी निस्पृह वृत्तीने काम करत असताना दखलपात्र होणे हे एक आत्मिक आनंदाचा स्थायी भाव दर्शविणारे
समर्पणच आहे..
— महेश क्षीरसागर सहा अभियंता तथा विभागीय अधिकारी ८ :
२३
श्री विजय लोखंडे यांचे अभिनंदन 💐💐💐💐 त्यांच्या पदाचा, अनुभवाचा, कौशल्यचा फायदा चैतन्य नगर सोसायटी च्या विकासासाठी मिळावा या अपेक्षेसाह अभिनंदन 💐💐
— खमितकर रवींद्र बँक ऑफ महाराष्ट्र अधिकारी :
२४
🙏श्री.विजय लोखंडे आपली उत्कृष्ट महापालिकेतील अधिकारी निवडीबद्दल खुप खुप अभिनंदन अशिच उत्तरोत्तर आपली प्रगती होवो. ही शुभेच्छा.
— श्री.व सौ.काटीकर. 🌹
२५
तुम्हाला तुमच्या कामाला हार्दीक शुभेच्छा हे आपण मैदानावर होता श्री.विजयजी लोखंडे सर कवी आहेत, कथाकार व लेखन करतात ते अष्टपैलू आहेत..
सर्वांनी त्याचे कडून शिकुन आपल्या परीने कामाशी निगडीत कामं करायला हवे त्यांचे आशीर्वाद आपल्या ला सर्वांना लाभो ही शुभेच्छा
लोखंडे सर तुम्ही टिम लिडर तरं आहात संपूर्णपणे मैदानावर आपण आपल्या परीने प्रयत्न कामं केलात या पानावरून पुनर्निर्देशित करून उद्या पासुन असंच मार्गदर्शन व आशीर्वाद कायम असु द्या .
— सुहास (दादा) क्षीरसागर. सोलापूर
२६
Congratulations Sir
you Deserve it, Good Luck for the Future
— राजेश मंगळवेढेकर.
२७
तुमच्या कार्यपद्धतीची हुबेहूब लेखणी, मांडणी या लेखात केली आहे.
तुमचे कार्य कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.
— हर्षवर्धन अंबुरे. इंजिनियर
२८
अभिनंदन साहेब आपलं चांगलं काम असंच चालू राहू दे आपलं कार्याचे न्यूज मीडिया मधून कळालं असंच कार्य पुढे चालू राहू दे आमच्याकडून शुभेच्छा💐
— जवळेकर स्वामी. सोलापूर
२९
Lokhande sir’s journey showcases exceptional leadership and relentless determination. Their success serves as a constant source of inspiration for all of us. I feel lucky to be guided by someone with such vision and dedication. Excited to be part of the team and achieve more together!
— अनिकेत कावळे. कनिष्ठ अभियंता मनपा
३०
साहेब त्रिवार अभिनंदन, असाच विजयाचा पताका फडकत राहो, साहेब आपण इतके मोठे अधिकारी असून सुद्धा तुम्ही मला दादा या नावाने संबोधता यामध्ये आपला मनाचा मोठेपणा दिसून येतो, ज्युनिअर इंजिनियर पदापासून आपल्याला परिचय आहे, मला आपल्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची सुद्धा संधी मिळालेली आहे, आपणास घडवण्यास आपले सर्व कुटुंब आपल्याशी पाठीशी असल्यामुळेच हे सर्व करू शकता, पुढील कार्य सुद्धा आपल्या हातून कौतुकास्पद व्हावे, ही ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर चरणी प्रार्थना.
— वैजनाथ (दादा) स्वामी मनपा सोलापूर.
माझी जडणघडण ३१ वरील अभिप्राय….
१
राधिकाताई आपल्या माणसांना, मैत्रिणींना ‘आज काय झालं’ सांगावं तितक्याच सहजतेने सगळ्या घटनाक्रमात वाचकांना गुंतवून ठेवतात. पप्पांच्या मानसिकतेचं, बंगला सास-याकडून ‘भेट’ मिळणार म्हणून हुरळून न जाणं आणि ‘देणारा’ आणि ‘घेणारा’ यांच्या नात्यातील भावबंध जपण्याइतकी संवेनशीलता असणं तरीही त्या प्रस्तावाबद्दल त्यांचं अलिप्त असणं, जिजीच्या कष्टांचा आणि आजोबांच्या उमदेपणाचा आवर्जून उल्लेख करणं सगळंच सुसंस्कृतपणाचं दर्शन घडवणारं ! ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली त्या कुटुंबातल्या एका सभासदाकडून रोज तमाशा सहन करूनदेखिल पप्पांनी समंजसपणे, मनाचा तोल ढळू न देता परिस्थिती सांभाळली. असे प्रसंग येतात आणि जातात आभाळात जमलेल्या कृष्ण मेघांप्रमाणे ! तरीही कडू औषध प्यायल्यावर बराच काळ कडवटपणा टिकतो अशा अतिशय चपखल उपमेतून परिणामकारक शेवट केला आहे.
— साधना नाचणे. ठाणे
२
जीवनात काही धडे मिळतात . त्यातून आपण काही शिकावयाचे असते. कोहिलू वाचताना याची जाणीव झाली .लेख वाचनीय आहे….
— अरुण पुराणिक. पुणे
३
आपल्या आयुष्यात अनेक माणसं येऊन जातात.. आपल्या जडणघडण मध्ये ते परोक्ष किंवा अपरोक्ष भाग घेत असतात .. हे एक अगदीच वेगळ्या पात्राची कलाटणी तुम्ही आमच्यासमोर मांडली.. त्याची आठवण तुम्ही काढली..
काही काही माणसं अगदी पाच दहा मिनिटांसाठी आपल्या आयुष्यात येऊन जातात ..परंतु अनेक वर्ष ती आपल्या मनात घर करून जातात.. त्यातीलच हे एक मिस्टर कोहिलू..
मोठ्या घरात रहायला जायचा आनंद आणि कोहिलूच्या भावाचं हे वर्तन नक्कीच तुमच्या कायमच्या आठवणीत राहणारच त्यात काही शंका नाही ..खूप सुंदर लेखन
— मानसी म्हसकर. वडोदरा
४
कोयलो प्रकरण फारच त्रासदायक होतं.आम्हालापण आठवतं.मी आणि उषा अगदी बापुडवाण्या होऊन जायचो.खूप छान लेखन.
— आरती नचनानी. ठाणे
५
छोट्या गोष्टीत आनंद शोधावा म्हणतात तसे बिंबा (राधिका) छोट्या छोट्या प्रसंगातून तुला लिखाण स्फुरते.
कोयलोच्या बाबतीत पप्पांची भूमिका येशू ख्रिस्तासारखी होती. देवा याला क्षमा कर. त्याला समजत नाही तो काय करतोय ते.
खूप छान बिंबा, तुझी लिखाणाची शैलीच इतकी सुरेख आहे की साध्या साडीला पण तू भरजरी पदर लावू शकतेस.
— अंजोर चाफेकर. मुंबई
६
फारच छान…
खरेदी प्लॅाटची.
— सुमती पवार. नाशिक
इतर मजकुराविषयी प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
१
मस्तच.. एकदम भारी..वर्णन उतरविले आपण लयबद्ध लेखणीतून..एडीटोरीयल अरेस्टचे.. या अनोख्या नवीन शब्दाची भर पडली शब्दकोषात..
मनस्वी अभिनंदन व शुभेच्छा..
— रवींद्र घोगे. सिन्नर
२
सन्मा. श्री भुजबळ साहेब,
नमस्कार,
“सत्तरीतील सेल्फी” हे दूरदर्शनचे निवृत्त संचालक तथा लेखक श्री चंद्रकांत बर्वे जी यांच्या सकस लेखणीतून त्यांच्या अधिकारी म्हणून केलेल्या कार्यकाळात भेटलेल्या अनेक मान्यवरांच्या संदर्भात लिहिलेल्या पुस्तकात खरे आणि खोटे जे जसे भेटले त्याचा वास्तवदर्शी चित्रण ज्या पद्धतीने केले. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन !!
एवढेच नाही, तर सदर पुस्तकाचे लिखाण ते प्रकाशन सोहळा संपन्न होईपर्यंत आपली कशी “एडिटोरीयल अरेस्ट” वा होऊन हे पुस्तक प्रकाशनाचे सोपस्कार पार पाडण्यासाठी किती वेळ खर्च करावा लागला याची इत्यंभूत उचापती कराव्या लागल्या आणि शेवटी अर्धांगिनीच्या अर्थात मालकीणीच्या सज्जड प्रेमळ आदेशानुसार टॅक्सी पकडून घरी परतले, हा मजेदार किस्सा चांगला रंगवून सांगितला आहे. हाच आपल्या मनाचा मोठेपणा वाटतो.
आपण “सत्तरीतील सेल्फी” मधून मांडलेल्या लेखाजोख्याला आमचा सलाम !!
— राजाराम जाधव
३
हरीभाऊ विश्वनाथ यांच्या शतक पूर्तिसाठी हार्दीक शुभेच्छा.👏👏💐💐
१०० वर्ष वाद्य बनवणे आणि विक्री करणे सोपे काम नाही. 💐💐
— गणेश जोशी. व्यंग चित्रकार, ठाणे
४
नमस्कार सर,
एडिटोरीयल अरेस्ट सुंदर. माझी जडणघडण भाग ३१ छान.
पत्रकार-महावीर जोंधळे यांचे विचार लक्षात ठेवण्याजोगे.
सर, आपला श्री. विजय लोखंडे,महानगरपालिका अधिकारी यांच्यावरील लेख खूपच छान. श्री. विजय लोखंडे यांच्यावर त्यांच्या वडिलांमुळे झालेले मनापासून समाजकार्य करण्याचे संस्कार; त्यांनी आपल्या अंगी भिनविले एवढेच नाहीतर तर ते अंमलात आणले याचे अगदी तपशीलवार वर्णन आपण केले आहे. लेख वाचून श्री. विजय लोखंडे यांचे व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभे राहते.
विंग कमांडर शशिकांत ओक यांचे किस्से खूप छान.
माधुरी ताम्हणे यांचाही लेख सुंदर.
खूप छान वाटते पोर्टल वाचायला. 🙏
— श्रध्दा जोशी. डोंबिवली
५
प्रा डॉ विजय पांढरीपांडे यांनी लिहिलेला लेख हा निश्चितच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. दोनतीन वेळा वाचल्या शिवाय हा उपहासात्मक लेख कळणे कठीण आहे.
— प्रकाश पळशीकर. पुणे
७
दोन्हीही अंक वाचलेत,छान आहेत.
हवा हवाई, कलेला कुंपण नसते, माध्यम पन्नाशी, वारली चित्रकला, अंदमानची सफर खूप आवडले.
धन्यवाद विशेषतः.. बोधनकर!
त्यांचा ईमेल आय डी मिळू शकेल ?
— स्वाती वर्तक. मुंबई
८
फारच छान.. रेषे मधली भाषा उत्तम…सर्वच न्युज महत्वाच्या🙏🏼😊🌹
— चित्रकार विजयराज बोधनकर. ठाणे
— टीम एन एस टी ☎️ 9869484800