Friday, May 9, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात....

वाचक लिहितात….

नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांची दूरदर्शन च्या सह्याद्री वाहिनीवर *हॅलो सखी* कार्यक्रमात १० एप्रिल २०२५ रोजी मुलाखत प्रसारित झाली, ही आपणा सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.विशेष म्हणजे ही मुलाखत आवडल्याचे असंख्य वाचकांनी कळविले असून ही मुलाखत समाज माध्यमांमध्ये अजूनही फिरत आहे. तसेच त्याच दिवशी सायंकाळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते माझाही त्याच दिवशी सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा अभ्यासक म्हणून  रविंद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या बद्दल मलाही अभिनंदन पर अनेक संदेश आले. या दोन्ही बद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपला लोभ असाच कायम असू द्या.
आता पाहू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)

दूरदर्शन च्या सह्याद्री वाहिनीवर ‘हॅलो सखी’ कार्यक्रमात सौ अलका भुजबळ यांच्या प्रसारित झालेल्या कार्यक्रमावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…….

अलका, खूब खूब  कौतूक, अभिनंदन आणि नमस्कार। 
मनात जिद्द असेल तर कोणी ही हरवू शकत  नाही।
— डॉ गोविंद गुंठे.
निवृत्त दूरदर्शन संचालक. नवी दिल्ली

अलकाताईंची मुलाखत, अप्रतिम झाली.
प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी आणि दिशा दर्शक अशी आहे.
अलकाताईं विषयीचा आदर आणखी वाढला.
सर्वगुणसंपन्न, ऑल राउंडर अलकाताईंना मानाचा मुजरा. तेजःपुंज तारा, कुरुळ्या केसांची सुंदर स्त्री आणि दूर्गा देवी ही सारी रुपे सार्थ करणाऱ्या अलका ताईंचा संदेश “आनंद वाटा “हा अतिशय आवडला.
एका बहुआयामी व्यक्तिमत्वाशी आपला कोणत्यातरी निमित्ताने संबंध आहे याचा सार्थ अभिमान वाटला. “सख्यांनो, आत्मविश्वासाने जगा”
हा संदेश तर प्रत्येक महिलेला वाटाड्या ठरणार आहे. साऱ्यांसाठी मनापासून धन्यवाद.
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐🌹 .
— आशा दळवी. दुधेबावी, जिल्हा सातारा

आमच्या सौ.अलकाताईचा सन्मान करण्यात आला तर तुम्हाला देखील मिळायला च हवा. तुम्ही मागे राहून कसे चालेल ? तुम्हाला सुध्दा आमच्या कडून मनापासून अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा.
— अशोक भाई भीमाशंकर बोरकर.
अहमदाबाद, गुजरात.

हॅलो सखी .. आत्मविश्वासाने कसे जगावे याचा अत्यंत स्तुत्य पाठ. अभिनंदन @अलका
अभ्यासक म्हणून सन्मान होणे गौरवास्पद देवेंद्रजी !
— प्रियंवदा गंभीर. पुणे

प्रिय,अलका ताई,
सप्रेम नमस्कार
तुमची मुलाखत मी वाचली आणि पाहिली देखील. खरंच  तुमचं खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. आत्मविश्वासाने घेतलेल्या कुठलाही योग्य निर्णय तुमचं आयुष्यला कलाटणी देत,  हे खरंच. मी सध्या “निर्णय” याच विषयावर लेख लिहत होते… माझ्या या लेखला तुमच्या मुलाखतीतून दुजोरा मिळाला.  कॅन्सरसारख्या आजारावर मात करताना कुठेतरी तुमच्यातील sports women ची नक्कीच मदत झाली.आयुष्यात “कॉमा” देत पुढे जायचं, गोष्टी घडतच असतात “किती साधेपणाने आयुष्यच कोडं सोडवलं.  आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या या सर्व प्रवासात तुम्हांला घरुन उत्तम पाठिंबा मिळाला.
ताई, तुमच्याविषयी अधिक जाणून घेतल्यावर तुमच्याशी भेटायची इच्छा प्रबळ झाली आहे. तशी तर मी खूप बडबडी आहे. अजून बरंच लिहून बोलावस वाटतं.. पण आता इथेच पत्र थांबाविते. पुढील वाटचालीसाठी तुम्हांला उत्तम आरोग्य लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना”
🙏पोर्टलवरची एक सखी.
— आश्लेषा. सातारा

मा.सौ.अलकाताई देवेंद्रजी भुजबळ … ताई  !…खूपच छान आणि तितकीच समर्पक अशी मुलाखत  …
सौ.अलकाताई भुजबळ  खर्‍या अर्थाने  महिला सक्षमीकरणा करिता आणि नारी शक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी दहा अंगाने  काम करणार्‍या आणि आपल्या… अलका… ह्या नावाला..साजेसं काम करणार्‍या… अर्थात… तेजपुंज तारका…नवदुर्गा म्हटलं तर वावगं ठरणार नाही !…आपल्या सोबत सखी – सोबतींना घेऊन चालणारी … खर्‍या अर्थाने…बहुआयामी सखी !!… आपल्या जीवनातील एक एक पैलू उलगडताणा… डॉ.मृण्मयी भजक…यांच्या सोबत अगदी मनमोकळ्यापणाने आणि तितक्याच दिलखुलासपणे संवाद साधलात !… मा.सौ.अलकाताई खूपच छान  !!…
— अनिल घरत. चिरनेर

सर, अलका मॅडम ची जीवन प्रवास खरंच खूप अभिमानास्पद आहे. मुलाखती मध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे त्यांनी. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.🌹🌹🌹
— सौ शीतल आहेर. खोपोली

सह्याद्री वरील अलका ताईंचा सखी सह्याद्री सर्व संवाद ऐकला. खुप छान व त्यांनी महीलांना दिलेला संदेश अतिशय उत्तम आहे 💐
— योजना पाटील. कल्याण

आदरणीय, उपसंपादक सौ.अलकाताईंची मुलाखत विशेष, सह्याद्री पर्वताची उंची सारखे लेखन, जीवनातील आजारपणावर, संकटावर केलेली मात आणि काही नवीन करु इच्छिणाऱ्या भगिनींना उतम मार्गदर्शन प्रेरणा ऐकली. दोघा उभयतांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा
— गोविंद पाटील सर. जळगाव
१०
फार छान मुलाखत होती, अभिनंदन ❤️❤️🌹
— देवेंद्र लाखोळे. नवी मुंबई
११
पूर्ण कार्यक्रम बघितला. खूप आवडला.
सौ अलका ताईंची उत्तुंग भरारी ऐकून मनस्वी आनंद झाला.
हार्दिक अभिनंदन.
— स्वाती वर्तक. मुंबई
१२
फारच छान, आजचा सह्याद्री टीव्ही वाहिनी वरील मॅडमचा कार्यक्रम फारच सुरेख झाला. अभिमानास्पद👍
— व्हि जी मुखेकर, नवी मुंबई

१३. Alka, this is really a proud moment for all your old chaddi buddies 🌹👌👍🙋🏻‍♀️
— माया नायर

१४. My bachpan ki saheli , Alka Bhujbal👆her interview (upto 55 mnts), she is an interesting personality, whoever can watch, pl do watch in parts… and you may drop a 👍 and comment. 😊

Alka, it was a superb interview. U deserve a 👏👏👏🥰, and the way you reply, soft spoken and with so much grace, it is too good. Proud of you meri saheli Alka😁😁
— वत्सला कृष्णन. नवी मुंबई

१५. Alka interview superb Proud of you dear my Mtnl saheli
— सुसन
१६. अलका तुझी मुलखात खुपच छान आणि प्रेरणादायी होती. अभिनंदन
— रश्मी मोहिते.
१७. अल्का ताई आपली मुलाखत सर्व महिलांसाठी व इतरांसाठी सुद्धा खूपच प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे.
— चंदरत्ना
१८. Alkatai छानच झाला program. Very well presented and executed. U looked stunning 👌🏻Many more to see.😍🎊👌🏻🌹
— प्रीती भडाळे.
१९. सुंदर झाली मुलाखत 👌👌👌👍👍👏👏💐
— मंदा शेटे

२०. अलका खुपच छान झाली मुलाखत
My Heartly congratulation to you
I AM VERY PROUD OF YOU 💐💐
— रतन शेटे.
२१. खूप खूप अभिनंदन अलका मुलाखत अप्रतिम झाली 💐💐
— वर्षा पानसरे.
२२. अतिशय उत्तम मुलाकात झाली आहे, सर्व मुद्दे व्यवस्थीत कव्हर झाले आहेत!👌👍✌️🌹😍🩷
— पुष्पा गांगण.

अन्य प्रतिक्रिया….

जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधत…न्यूज स्टोरी टुडे च्या निर्मात्या मा.सौ.अलकाताई भुजबळ यांनी…” आपलं आरोग्य आपल्या हाती” या  लेखाच्या माध्यामातून आपल्या जीवनात आलेल्या एका भयानक अश्या प्रसंगाचे स्वअनुभव सांगताना  …त्या भयानक प्रसंगाला सामोरे जातांना त्यांच्यातला तो आत्मविश्वास… आणि…त्या आजारपणाच्या वेळी त्यांना आपले पती  श्री.देवेंद्रजी भुजबळ आणि…मुलगी देवश्री यांनी धिराने हाताळलेली ती परिस्थिती डॉ.डावर, डॉ.मोहन मेनन यांनी दिलेला मोठा आधार  त्यामुळे त्यांच्यात आलेली विश्वासाची भावना त्यामुळेच येवढ्या भयानक आजारपणाला सामोरे जात त्याच्यावर मात करत यशस्वी होता आलं !…
हे सर्व होत असतानाच… अलका ताईंनी स्वानुभवातून लिहिलेले कॉमा हे पुस्तक… आणि… नंतर… त्यावर तयार केलेला लघुपट  महाराष्ट्र राज्याचे  तत्कालीन राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते मुंबईत राजभवन येथे प्रसारीत होणे  हे सर्व मात्र मा. सौ.अलकाताई आणि त्यांच्या परिवाराचे मनोबल वाढवणारे असेच होते. आणि म्हणुनच आरोग्य म्हणजे फक्त शारिरीक आरोग्य नव्हे तर  मानसिक, शारीरिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक,व्यावसायिक, आर्थिक असं ते विविधांगी असतं आणि आपल्याला ते जिवनभर लाभलचं पाहिजेच …हे सांगणार्‍या… मा.सौ. अलकाताईंच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे…आणि म्हणूनच मा.सौ.अलकाताई भुजबळ खरचं कौतुकास पात्र आहेत !…
— अनिल ज. घरत. पिरकोन, रायगड.

💐💐 वेग वेगळ्या माध्यमातून आपण करत असलेल्या समाज कार्यासाठी रोटरी इंटरनॅशनल संस्थे कडून” व्यावसायिक नैपुण्य पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.आपले मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन.💐💐
— मधुकर राऊळ. नवी मुंबई

✍️सन्मानीय भुजबळसाहेब आपले मन:पूर्वक अभिनंदन💐
— रणवीर राजपूत.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे

अलकाजींचे कॉमा पुस्तक वाचले होते. त्यावर परीक्षणही एका मासिकात लिहिले होते आज हा लेख वाचताना पुनर्वाचनाचा आनंद मिळाला आणि त्यांच्या व तुमच्या साऱ्यांच्या जिद्दीला, मनशक्तीला सलाम!

प्रा. डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या लिखाणाची मी चाहती आहे. त्यांच्या लेखांवर आम्हां उ. प्र.स. (उभ्याने प्रवास करणाऱ्या सख्या… त्याही ट्रेनच्या दरवाजात) ची चर्चा होई. आज त्यांचा लेखन प्रवास वाचून खूप छान वाटले. त्यांनी लेखात लिहिलेल्या सर्व संपादकांबद्दल थोडीफार माहिती होती. पण बरेच दिवसांनी  त्यांच्याबद्दल ऐकले, तेही भावून गेले. शेवटी डॉ नी म्हटले आहे की लिहीत राहणार.. हो तुम्ही लिहीत रहाच आणि आम्ही आवडीने वाचत राहणार !
— नीला बर्वे, सिंगापूर

आदरणीय सरजी नमस्कार.
आपला हा सोहळा पाहून मनस्वी आनंद झाला. ते शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. आपल्या कार्याला सलाम. आपल्या सारख्या महान विचारांच्या लोकांमुळे जग चालते. सामाजिक  बांधिलकी आपण जपत आहात ते आजच्या जगात ऐवढे सोपे नाही. आपल्या हातून असेच भरपूर समाजसेवा घडो. हीच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐🙏🙏🙏🙏
— सौ. सीता विशाल राजपूत. आंबाजोगाई

मनाला स्पर्शून जाणारा अलकाताईंचा लेख…. तुमचा व तुमच्या कन्येचा वाटा ही अनमोल आहे  सर ….. सर्वांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏
— संगीता कासार, मुख्याध्यापिका, लातूर.

मा.श्री.पांढरीपांडे सर,
आपण अतिशय मार्मिक विश्लेषण  केले .आणि खरोखर हे वास्तव नाकारता येत नाही. आपण आपण जसे निर्भीडपणे बोलू मांडू शकता ते आता आमच्या सारख्या असंख्य नोकरधारी गुलामाना श्यक्य होत नाही. काही मांडायला गेलोच तर आमचेच व्यवसाय बंधू आडवे येतात आणि नको तेव्हढे पाठीचा कणा वाकून स्वतःस समर्पित करतात. तेंव्हा आपलीच आपल्याला लाज यायला लागते. नको तेव्हढी लाचारी जगण्यात आल्यामुळे असे हल्ली वर्तमान पत्रात सुद्धा वाचायला मिळत नाही. आपण एक कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून खरोखर शोभून दिसतात. आणि एका प्रामाणिक शिक्षकांकडून समाजाची हीच तर अपेक्षा आहे. समाजाला शुद्ध आणि स्वच्छ करण्याची जबादारी शिक्षकानी घेण्याची वेळ आलेली आहे नसता पुन्हा संधी मिळणार नाही असेच म्हणावे लागेल.
— प्रा अनिल कुऱ्हे. श्रीरामपूर
           
माझी जडणघडण भाग  ४३ अभिप्राय…..

माझे ही जडावलेले  श्वास स्थिर झाले.   हे फार आवडलं.
— वंदना जोशी. पुणे

किती छान लिहिले आहेस तू तुमच्या मैत्री विषयी!
— संध्या जंगले. मुंबई

अगदी मोजक्या शब्दात अंजूचं व्यक्तिमत्व डोळयासमोर उभे केलेस. काॅलेजमधली तुमचे मैत्री मी पाहिली होती. दिवस तुझे हे फुलायाचे, झोपाळयावाचून झुलायाचे.
परंतु काॅलेज संपल्यावरही तुमची मैत्री आणखी गडद झाली.अंजूच्या आयुष्यातली वादळं तिने झेलली, तू साक्षीदार आहेस. मैत्रीचा झरा तू वाहता ठेवलास.
तुमच्या मैत्रीला प्रणाम.
— अंजोर चाफेकर. मुंबई

“आत्या” छान व्यक्तिचित्रण
‘कुटिरोद्यग, दुर्बीण  फारच नेमके शब्दरचना.👌👌
— छाया मठकर. पुणे

खूप उत्सुकतेने तुझा अंजू हा लेख वाचला. तिच्याबरोबर जुळलेले तुझे मैत्रिचे बंध रेशमाचे म्हणूं अतूट धाग्याचे म्हणूं की इहलोक आणि परलोक हा भेद नष्ट करणारे म्हणूं हे समजत नाही ग बिंबा. ह्या हृदयीचे त्या ह्रदयीला पोहोचणारी मैत्रीची स्पंदनं जाणवली मला वाचतांना. मी न बघितलेली जीवनाचा आनंद लुटणारी तुझी अंजू स्पर्शून गेली. ही तुझ्या लेखन शैलीची ताकद तर आहेच पण  अंजूच्या व्यक्तीमत्वाची देखील आहे. अंजूला अभिवादन.
— अलका वढावकर. ठाणे

बिंबा, तुझं लिखाण म्हणजे उंचावरून, खाच -खळग्यातून,  कधी शांतपणे, कधी तरी दिशा बदलत तर कधीतरी सरळसोट खाली येणारा अखंड वाहणारा भावनांचा स्रोत असतो. अंजूची आणि तुझी मैत्री म्हणजे एक निरागस, निस्वार्थी वयात जुळलेलं निखळ नातं. म्हणून तुझ्या लिखाणाला नाटकीपणाचा स्पर्शही नाही .शांत आणि संथ वाहणा-या नदीसारखा तिच्या सहवासातला आनंद आणि खपली पडली तरी जखमेचा व्रण जाणवावा तशी तिच्या  नसण्यातली खंत वाचकांनाही जाणवते हीच तुझ्या लिखाणाची मोजपट्टी आहे.
— साधना नाचणे. ठाणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
शितल अहेर on रेघोट्या…
शितल अहेर on हास्य दिन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on समस्यांना कॉमा करा आणि पुढे जा…– अलका भुजबळ
सौ.मृदुलाराजे on कामगार चळवळीचा इतिहास