नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात… सदरात आपले स्वागत आहे. पाहू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित,
देवेंद्र भुजबळ (संपादक)
१
🌾प्रा.लेखिका वृषाली मगदूम ताई दुसऱ्या मदर तेरेसा च आहेत.
मुलाखतकार सौ.अलकाताई मुरब्बी अनुभवातून सर्वांगी प्रश्न विचारले आहेत.
— कवी, लेखक गोविंद पाटील. जळगाव
२
वृषाली मगदूम मॅडमचे कार्य निस्चितच प्रेरणादायक आहे. तो व्हिडिओ मी इतरत्र शेअर करत आहे. त्यांचा वाटसॅप नंबर मिळेल काय ?
— प्रा. डाॅ.सतीश शिरसाठ.
३
नमस्कार. माझे परळचे सख्ये मित्र असलेले शेजारी, ज्येष्ठ पत्रकार, माजी अध्यक्ष मा.कुमार कदम यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे मानाचा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. आनंद झालाय. हार्दिक अभिनंदन .
— नंदकुमार रोपळेकर. मुंबई
४
आचार्य अत्रे पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार श्री.कुमार कदम यांना आमचे मनापासून अभिनंदन कृपया कळवा.
— सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नाशिक.
५
आचार्य अत्रे यांच्या वरील लेख अप्रतिम…. 👌👌
— महावीर दुरूगकर. सोलापूर
६
अत्रे अप्रतिम!
— प्रकाश कथले. जेष्ठ पत्रकार, वर्धा
७
प्रा. मगदूम यांच्याबद्दल वाचून, त्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सर्व बघितले. प्रेरणास्पद… वंदनीय
बंडा जोशी यांच्यावर आलेले सकाळ वगैरे वृत्तपत्रातील कौतुक व लेख छान आहे. मंगेशजींचे अर्कचित्र ही उत्तम आहे .. सुंदर संकलन केले आहे
सुरेश वाडकरांना आमच्या ही शुभेछा, उदय वाईकरांना त्यांचे मैत्र लाभले छान
राधिकाताई यांचे लेख वाचताना बरीच साम्य स्थळे आढळतात.. स्वतः च्या मुलांना शिकवताना शिस्त कडक राखणे, बाबांनी जास्तच हळवे असणे..नातीच्या वेळेस मात्र शिस्तीचा बडगा गळून पडणे वगैरे…मजा वाटली.
दीपाली यांची पाऊस कविता सुरेख आहे.
पूनम सुलाने यांनी मांडलेली मते योग्य आहेत..छान वैचारिक लेख आहे, आवडला. युवा शक्तीवर देशाचे भविष्य अवलंबून आहे
सुनीलजी जो कित्ता, साहित्याचा, गिरवत आहेत .. छानच.. हलकं फुलकं
मीना यांचे अभंग आणि मीराताईंची आरती दोन्ही खूप आवडले.
— स्वाती वर्तक. मुंबई
८
नमस्कार.
ज्येष्ठ नागरिक यांच्याबाबत चांगले विचार आपण मांडले आहेत. बरेचजण ॲक्टिव आहेत. तसेही आजच्या परिस्थितीत आपल्या सोयीनुसार ते वागतात. कारण आरोग्याविषयी त्यांना जाणीव जागृती आहे. फक्त तुम्ही जो ॲक्टिवपणा दाखवायला पाहिजे तेवढा ते दाखवत नाहीत. उदा. एखादा शासकीय अधिकारी असेल तर त्याने आपल्या भागातील मुलांचे प्रबोधन केले पाहिजे, कलाकार असेल तर त्याने तरुण तरुणींना कला क्षेत्रातील संधी सांगितल्या पाहिजे. अश्या विविध क्षेत्रातील वयस्क व्यक्तींनी आपल्या जवळचे ज्ञान इतरांना दिले पाहिजे, अशी रास्त अपेक्षा आहे. आपल्या लेखातून अनेकजण प्रेरणा घेतील अशी अपेक्षा आहे. तसेच कुटुंब व्यवस्था मजबूत ठेवायची असेल तर घरातील तरुणांना वयस्क व्यक्ती बोज नाहीतर तुमच्यासाठी त्यांनी किती खस्ता खाल्ल्या आहेत, याची जाणीव त्यांना करून द्यावी लागेल. हे शाळांमधून शिकवले गेले पाहिजे, निदान बारावीनंतर हे शिकवले गेले पाहिजे कारण वयाच्या विसिनंतर मुलांना चांगला समाज आलेला असतो. असो, चांगले, छान लिहिले . त्यातून वयस्क व्यक्तींनी आणि तरुण तरुणींनी धडा घेतला पाहिजे, त्यांनी तो घ्यावा.
— शेषराव वानखेडे. गांधीनगर
९
स्वदेशीचा आपण दिलेला संदेश मौल्यवान आहे.🙏
— प्रा डॉ सतीश शिरसाठ.
१०
आता खरेच अशी वेळ आली आहे की स्वदेशी चळवळ पुनः सुरू व्हावी
इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ना तसे..
आजच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लिहिलेले सर्वच लेख आणि माहिती हेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहे असे दिसते.
छान आहेत लेख वाचनीय..
नवी विटी…. आठवणी छान गोड आहेत, बक्षीस मिळणे, मंदिरांना भेटी देणे..जीवन समृद होणे .. आवडले
कविता सर्वांनीच छान लिहिल्या आहेत.कृष्ण जन्म साजरा झाला तुमच्या पोर्टलमुळे.
— स्वाती वर्तक. मुंबई
११
“स्वदेशीचा नारा”… कितपत यशस्वी होईल याबद्दल शंका आहे. कारण उच्चभ्रू समाजाला परदेशी वस्तुंचे खूप आकर्षण आहे. देशासाठी त्याला मुरड घालणे आवश्यक आहे. भाषण छान आहे.
— ब रा देशपांडे. डोंबिवली
१२
“स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी देखील” हे अगदी खरे सर. जे बेजबाबदारपणे वागतात त्यांची कानउघाडणी करणे गरजेचेच आहे.🙏
— सुनीता नाशिककर.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक. मुंबई.
राधिका भांडारकर यांच्या “माझी जडणघडण भाग ६१” वर प्राप्त झालेले अभिप्राय…..
१
छान लिहिले आहेस ! आपण आपल्या मुलांना वाढवताना ही विविध घटना डोळ्यासमोर येतात.एक मुलगा, एक मुलगी असल्याने दोन्ही मुलांशी वागताना काही वेळा प्रश्नच पडत असत. नकळतच मुलाला वाटत असे ‘ती मुलगी म्हणून आई तिच्या बाजूने बोलते’… तर मुलीला वाटत असे तो वंशाचा दिवा त्यामुळे आई त्याचे जास्त लाड करते ! खरंतर असा प्रश्न कधीच पडला नव्हता. दोन्ही मुले लाडकीच होती आणि दोघांनाही आपापल्या परीने चांगले प्रेम दिले होते. तरीही.. तो/ती तुझे जास्त लाडके हा प्रश्न संपला नाही.
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. दुबई
२
प्रिय राधिकाताई,
सर्वात आधीतर मला माफ करा. तुम्ही पाठवलेली जडणघडण वाचून सुद्धा प्रतिक्रिया लिहायला जमलेच नाही. खोटं कशाला बोलायचं.. काही भाग वाचायला वेळसुद्धा मिळालेला नाही. पण वाचणार हे नक्की…
१४ वर्षांचा अनुभवाचा साठा म्हणजे चौदा वर्षांचा *सुखदवास* म्हणायला हरकत नाही.. तुमचं आणि विलास भाऊंचे लेकीं सोबतचे एक अतीशय संवेदनशील नाते आता हळूहळू छान उलगडत जाणार आहे ह्याची उत्सुकता आहेच.घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आठवली. बालसुलभ प्रश्न आणि त्याला सामोरे जाणारे आई वडील.. पुढचे भाग वाचण्याची उत्सुकता आहे
— मानसी म्हसकर. वडोदरा
३
खुपच छान वाटले वाचून, ज्योतिका मयुराचे ब्रुकबॉन्ड कॉलनीतले लहानपणाचे चित्र डोळ्यासमोर आले, व मन भरून आले, खुपच मजा वाटली वाचताना.👌🏻👍🏻🤣😇😀😅😂💓💞🩵❤️💜💚💙💛
— विलास भांडारकर. पुणे
४
खूपच छान.
योगेश, अभिजित सर्वच ब्रूक बॉन्ड कॉलनीच्या आठवणी तासन् तास काढत असतात.
— पूनम मानुधने. जळगाव
५
खूप छान आणि खूप मजा आली वाचताना.
आपण पुरेपुर आईपण भोगलंय. बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई।
— अंजोर चाफेकर. गोरेगाव, मुंबई
६
अप्रतीम !
मुलांना मोठे करण्याची जबाबदारी आणि त्याचसोबत ती वाढत असताना मिळणारा ! आनंद या दोन गोष्टी आजचा हा लेख वाचताना पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेला.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
७
सुरेख.
— श्रीकृष्ण भांडारकर. अमळनेर
८
तुझी शब्द मांडणी खूप पटणारी वाटते. आयुष्याची philosophy छान पद्धतीने सांगितलीस.
— जयमती दळवी. पुणे
९
पालकत्व, खास करून आईला किती कठिण आहे, हे सोप्या शब्दात छान लिहीले आहे.
— रेखा राव, मुंबई
१०
बिंबा तुझी पालकत्वाची थेरेपी, अनुभव वाचायला खूप छान वाटलं. कमी अधिक फरकाने सगळ्यांचं असंच असतं. पण तू किती छान मांडलं आहेस ग ते. १४ वर्षांचा पट खूप intresting वाटला. १४ वर्षात अख्खं रामायण घडू शकतं. पण आपल्यासाठी मुलं वाढवताना तो वनवास न वाटता हवाहवासा काळ वाटतो. कांहीतरी आनंदायी घडत असतं. मुलांचं बालपण सरता सरता त्यांच्या पंखात बळ देण्यासाठी आपण झटत असतो. असो लेख खुप छान. मला माझे ते दिवस आठवले.
— अलका वढावकर.
११
खूप छान !!
— आरती नचनानी. ठाणे
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
