Wednesday, October 15, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
नवरात्री उत्सव काल पासून सुरू झाला आहे. नवरात्री उत्सवाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने आपण देवीच्या विविध रूपांची माहिती, महती सांगणारी सौ स्नेहा मुसरीफ यांची लेखमाला प्रसिद्ध करीत आहोत. यामुळे आपण हा नवरात्री उत्सव अधिक डोळसपणे साजरा करू शकू, असा विश्वास आहे. आता पाहू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…

श्री सुनील चिटणीस लिखित, “झेप”असे सदरावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

“अमेरिकेत झेपावलेली पुनिता”

आजोबा, आई, पुनीता या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. कौतुक करण्यास शब्दच नाहीत. तुमचे संस्कार पराकोटीचे फलद्रूप झाले. Every man has mission in his life. हे पुनिताचे मिशनच आहे,त्यात तिला लोकोत्तर यशासाठी शुभेच्छा. तुम्ही उभयता फारच पुण्यवान आहात. तुम्हाला कितीही नमस्कार केले तरी अपुरेच आहेत.
— शेषाद्री सोनईकर.

पुनीताचे खूप खूप अभिनंदन ! खरोखर अत्यंत कौतुकास्पद आहे. आईचा वारसा थेट अमेरिकेपर्यंत नेला, नुसता नेला नव्हे, तर त्याला अत्यंत मोलाचे संस्कृतिक देखणेपण दिले. खूप अभिमान वाटला माझ्या भाचीचा, वाचून!
तिच्या ह्या कार्याला खूपखूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. 🌹💐🌹
— सौ. माधवी फडके.

Wah wa kitti great news pathavlis ? Aaiechya pavlawar paul theun 100 paval pudhe hm. Khupch koutuk vatal. Vachun khup khup aanand vatala g Tai. Puneetala maza msg sang. US madhe he kam kartey abhimanachi gosht aahe. Khup aanand vatala. Tila khup shubechha n uttam shubhashirvad. Bhadsavale familycha hi manapasun abhinandan. Ekdam Bdhiya. 🍫💐🙏🙏
— Sujata Dhapre.

“अमेरिकेत झेपावलेली पुनीता !” हा लेख वाचला. खूप खूप आनंद झाला, समाधान वाटले. आमची पुनीता सातासमुद्रापार काहीही दिशा माहित नसताना मास्टर्स करण्यासाठी अमेरिकेत जाते, ऑस्टीन सारख्या शहरात स्थाईक होते, स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत तेथील मराठी भाषिकांसाठी मराठी शाळा सुरु करून जिद्दीने आई, आजोबांचा वारसा जोपासत अत्यंत निष्ठेने, परिश्रमपूर्वक न थांबता १२ वर्षे, विद्यादानाचे कार्य करते, ही कल्पना मनाला भावते. खूप आनंद, अभिमान वाटतो ग !
यापुढेही असाच तुझ्या यशाचा झुला उत्तरोतर उंच जावो, आम्हाला तुझ्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळो. ही त्या विधात्याकडे प्रार्थना 🙏🏽
तुझी सौ संध्या मावशी
काही उणीवा राहिल्या असल्यास समजून घे.
— संध्या मळेकर.

वा ! खूप सुंदर उपक्रम. पुनीता चे खरंच खूप कौतुक आहे. स्वतःची नोकरी, घर सांभाळून अमेरिकेत मराठी संस्कृती रुजविण्यासाठी तीन शाळा सुरू करून आज ३०० विद्यार्थी तिथे शिकत आहेत ही गोष्ट अभिमानास्पद आहे.
खूप सुंदर माहिती दिली आहे.
खरंच पुनीताचे खूप खूप अभिनंदन व तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.👍🏻💐
चित्रा मुळे.

लेख वाचला. खूपच छान लिहिला आहे. अगदी समाधान वाटले. खूप अभिमान वाटतो. तिच्यात अगदी प्रती तुम्हीच दिसत अहात. तुम्हीही अगोदर शाळेत होतात. तेव्हा असेच सारे असायचे. तूम्ही आम्हा ला डावखोलला कळवत होतात. ती आठवण झाली. खरेच ही एक देवाची देणगीच आहे. तुमचे लहानपणापासून केलेले मार्गदर्शन. अगदी तिघा मुलांनाही अमृतासहीत समाजात वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तुमचेही खूप अभिनंदन व खूप कौतुक आहे.
— श्वेता मुकादम.

“बाल क्रिकेटपटू काव्या”वर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत..

काव्याने इतक्या लहान वयात इतकी उत्तुंग कामगिरी करणं खूप कौतुकास्पद आहे. छान परिचय करून दिलात.
— अजीत महाडकर. ठाणे

लेख छान झाला आहे. काव्याची प्रगती पाहून मला खात्री वाटते की ती लवकरच भारतीय संघात स्थान मिळवेल. तिला खूप खूप शुभेच्छा.
– प्रविण चिटणीस. मुंबई

उभरत्या कळीच्या यशाचा उत्तम वेध…💐💐💐👌🏻
— सुनील कुळकर्णी. तळा, रायगड

कुमारी काव्याचे खूप कौतुक आणि तिच्या पुढच्या खेळासाठी खूप शुभेच्छा 💐
सर, खूप सुंदर लेखन केले आहे तुम्ही. तुमचेही अभिनंदन
— ज्योती हलगेकर. कोपरखैरणे. नवी मुंबई

हार्दिक अभिनंदन काव्या ! तिच्या पालकांचेही मनःपूर्वक अभिनंदन
आणि काव्याला पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा 👍💐
— मृदुला राजे. झारखंड

क्या बात है 👏👌👍
अभिनंदन काव्या बरोबर तुमचेही 🙏👍🌹
— किशोर देसाई. अमेरिका

लहान वयात काव्याने मिळविलेले यश अलौकिक आहे.कु.काव्याचे अभिनंदन.
— पी एम काटकर सर. सातारा

टीव्ही आणि डिजिटल पत्रकार श्री मनोज भोयर यांच्यावर मी (देवेंद्र भुजबळ) यांनी लिहिलेल्या प्रेरणादायी जीवन कहाणी वर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत

तुमच्या व्यक्तिमत्वाचे व भावनिक उंचीचे दर्शन घडवणारा लेख. अनेक पैलू कळले. त्यामागे असणारे वैचारिक व वैधानिक अधिष्ठान ही कळले.बरं झालं लेख पाठवला.एका तिसऱ्या माणसाने लिहिलं वा बोललं की माणूस म्हणून आपली ओळख अजून बारकाईने आणि परखडपणे कळते.
— सना पंडित. कवयित्री आणि लेखिका नागपूर.

छान लिहिलंय मनोज.. साहेबांनी ..अभिनंदन
— डॉ.राजेंद्र मुंढे, ज्येष्ठ साहित्यिक, वर्धा.

मनोज, नमस्कार .
तुझ्या विषयी वाचलं. आनंद झाला.आजच्या दिवसाची छान- सुंदर सुरुवात झाली. तुला खूप खूप स्नेह.
स्नेहांकित
— प्रेमानंद गज्वी. ज्येष्ठ नाटककार

Manoj ji
Proud of you.
You are a gem of person.
Excellent & great article of your life journey & your love towards parents. You are our role model since college life. Your performance is consistent.
Congratulations & best luck for future.
— Samir Shende. Enterprenure, Vardha
५.
लेख वाचला. खूप छान.
— राजकुमार तिरभाने. ज्येष्ठ विज्ञान शिक्षक
६.
Excellent 👌
— Nilesh Zode, Chemical Engineer


पुन्हा अभिनंदन !!
— मनोहर राऊत. माजी अधिकारी, यवतमाळ
८.
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा
अभिनंदन सर.
— प्रदिप म्हैसने. अकोला
९.
जरी माहिती तुझ्यापर्यंतच राहिली असती आम्हाला तसेच इतराना माहिती मिळाली नसती. तुझी व बाबांची वाटचाल अनेकाना सुद्धा प्रेरणा घेण्यासारखी आहे.अनेकदा स्वरचित केलेल्या कविता, लेख मला आवर्जून पाठवतात.
बाबाची माझी भेट झाली की मनोज तुझी आवर्जून आठवण काढतात. ऑक्सिजन पार्क च्या सर्व कार्यक्रमास बाबा आवर्जून उपस्थित राहतात.
पुत्र व्हावा (ऐसा गुंडा) मनोज सारखा.बाबा सोबतच आम्हाला सुद्धा मनोज सारखा पत्रकार, आमचा मित्र आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
तुला खूप खूप शुभेच्छा. मनोज.
— मुरलीधर बेलखोडे. संस्थापक, पर्यावरणवादी निसर्ग सेवा समिती
१०.
भाऊ, 🪷
भुजबळ सरांचा अप्रतिम लेख, पूर्ण वाचला. वर्धेकर आणि पत्रकारितेतील आमचे मार्गदर्शक म्हणुन आम्हाला आपला खुप अभिमान आहे. विशेष म्हणजे सुरवातीच्या काळात आपल्या वर्धेतील प्रवासाचे आम्ही साक्षीदार आहोत. भुजबळ सरांनी आपला जो प्रवास शब्दात मांडला, त्यापासून मी आणि माझ्यासारखे अनेकजण अनभिज्ञ असू शकतात. म्हणुन आपण हा लेख शेअर केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. पत्रकारितेत उंच भरारी घेतांना आपले पाय कायम जमिनीवर आहेत, हे अतिशय महत्त्वाचे.
भाऊ पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार 🎊
— राजू येसनकर. जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ
११.
नशीबवान पुत्र, ज्याला जन्मदात्यांची सेवा करण्याचं सौभाग्य मिळतं.
— मतीन महत. व्हिडिओ एडिटर
१२.
खूप छान.
— मधू शिंदे. आयपीएस (निवृत्त)
१३.
सर, भुजबळ सरानी करून दिलेला आपला परिचय योग्यच आहे आणि तो प्रसिध्द होणेही महत्त्वाचे आहे. आम्हाला आपला सार्थ गौरव आहे. धन्यवाद सर 🙏
— प्रा.रमेश झाडे. मुंबई

१४.
“पुत्र व्हावा ऐसा”,
ही मनोज भोयरची कर्तृत्वकथा,खूपच प्रेरणादायी आणि आदर्शवत अशी आहे. मातृपितृभक्त असण्याबरोबरच आपल्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात अनेक उत्तूंग भराऱ्या मारूनही पाय जमिनीवर ठेवणारा मनोज सर्वच युवापिढीसाठी आदर्शवत आहे.
देवेन्द्रजी तुम्ही मनोजची कार्यप्रणाली सविस्तरपणे मांडल्याबद्दल धन्यवाद.👍
— वीणा गावडे. मा. मुख्यमंत्री यांच्या निवृत्त जनसंपर्क अधिकारी. मुंबई

अन्य प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

आदरणीय सरजी खूप खूप सुंदर लेखन. कर्मयोगी आदरणीय श्री. नरेंद्र मोदींजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐 ❤
— सीता राजपूत. अंबेजोगाई

सर्वच लेख सुंदर. अतिशयोक्तीला वाव नाही. अभिनंदन. श्री.मोदीजींना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. दीर्घायूभव व यशस्वीभव अशा शुभकामना.
— ब रा देशपांडे. डोंबिवली

आजचा अंक संपूर्ण पंतप्रधानांच्या वाढदिनाचे औचित्य साधून व्यवस्थित सजविला आहे तुम्ही.
छान. अभिनंदन. — सौ. स्वाती वर्तक. मुंबई

मा. देवेंद्र भुजबळ सर आणि सौ. अलकाताई यांना स. न. वि. वि.
आपले संपूर्ण पोर्टलच अत्यंत मार्गदर्शक, प्रबोधक आणि ज्ञानवर्धक असते. आपण घेतलेली प्रभात चॅरिटेबल ट्रस्टची मुलाखत, मोबाईल बद्दलची सावधानता उद्बोधक वाटली.
विराग मधुमालती यांची कामगिरी पाहून खूप कौतुक अभिमान वाटतो. त्यांना अजून शुभेच्छा !!

खड्डेच खड्डे, अशी ही शाळा, बाकरवडी, खूप आवडली !! एकंदरीत सर्व अंक सुंदर वाचनीय, अनुकरणीय असतात. आपणास अजून खूप खूप शुभेच्छा !
धन्यवाद !!
— अलका रामचंद्र मोहोळकर. पंढरपूर.

नमस्कार, सर.
प्रतिभाताई चांदुरकर यांचा ‘धगधगता युवा’ हा लेख वाचला. खरोखरच आजचा युवक आतल्याआत लाव्हा रसासारखा उकळतो आहे. त्याचा हा असंतोष कधी फुटून बाहेर पडेल सांगता येणार नाही. फक्त एका काडीची गरज आहे. तेव्हा वेळीच सावध होऊन युवकांच्या अंगच्या शक्तीला विधायक वळण देण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यांच्यातल्या क्षमता, कला तसेच त्यांच्या गरजा ओळखून त्यानुसार नियोजन केले पाहिजे.
प्रकाश फासाटे यांची, ‘न पचलेली बाकरवडी’ मस्तच ! अगदी खुसखुशीत !!
— श्रद्धा जोशी. डोंबिवली.

“धगधगता युवा”… उत्तम लेख.
— डॉ गोविंद गुंठे.
लेखक तथा दूरदर्शनचे निवृत्त संचालक नवी दिल्ली
.

हलकी फुलकी असून न पचलेली बाकरवडी, ती ही चितळेंची.. पुण्यातल्या.. वाचताना मजा आली. ☺️
— सौ स्नेहा मुसरीफ. पुणे

अभियंता दिन आणि मी, खूपच सुन्दर लेख🙏🙏👌🏼👌🏼💐💐
– शैला राणे.

गणेश नाईक : नॉट आऊट ७५ …
माझी नवी मुंबईत दिवा, ऐरोली, घणसोली शाळेत २५/२६ वर्षे सेवा झाली.. आम्ही शिक्षक संघटना स्थापन केली होती. कोपरखैरणे ला शाळेत मिटिंग असे. नाईक साहेब तिथेच रहातात.
ते मिटिंग ला आले की आमच्या बरोबर सतरंजी वर खालीच बसत. म्हणत, तुम्ही गुरू आहात.. मी वर बसणार नाही. १९९६ साली त्यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षक म्हणून मला पुरस्कार
प्रदान करण्यात आला होता. तर १९९७ ला नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने त्यावेळचे महापौर संजीव नाईक यांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षक म्हणून सुवर्ण पदक देण्यात आले होते. खरेच ते मनाने मोठे आहेत.
– मंगल मांगले. ठाणे

गणेश नाईक याचे अचाट कार्य बघून अचंबित झाले. कोरोना काळात ही शांत न बसणारे खरे समाजसेवी…छान वाटले वाचून… आमच्या ही शुभेच्छा.
पाटोळेजींचे अभियंता होणे त्यांना अभिमानास्पद वाटते. खरेच आहे .. अभिनंदन.. विश्वेश्वरय्या , बाबासाहेब वगैरे याचसाठी झटले.
सासूबाईबद्दल अतिशय हृद्य लिहिले आहे राधिकाताईंनी. भाकरी थापताना आयुष्याचे ज्ञान त्यांनी दिले हे फार आवडले.
गजाभाऊंची कविता म्हणजे विदारक सत्य ..त्या मोठ मोठ्या खड्ड्यात भरतील एवढा पैसा अशा लोकांकडे जमला असेल. अर्थात अपवाद असतात त्यांची क्षमा मागून.
— सौ स्वाती वर्तक. मुंबई

सर, गणेश नाईक यांनी दैनिक नवनगर १९९० मधे सुरू केले तेव्हा काही काळ मी त्यात कार्टुन देत होतो. ते मंत्री झाल्यानंतर अनेक वेळा त्यांनी माझ्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले होते. त्यांनी पाच, सहा वेळा माझ्या घरी सुद्धा सदिच्छा भेट दिली आहे.
— गणेश नाईक. व्यंगचित्रकार, ठाणे

“काळजाचा तुकडा “कथा ..
छान आहे.👏
— ख्वाजा बागवान. पुणे

राधिका भांडारकर यांच्या “माझी जडणघडण” : ६६ वर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…..

माईंना आम्हीही खूप जवळून पाहिले आहे. त्यांचे ते कुटुंबाविषयी भरभरून बोलणे, तो डोक्यावरचा पदर, अंगावरचे ठसठशीत दागिने, तुझ्या वर्णनाने त्यांचे साक्षात दर्शन झाले. थरथरत्या हाताने मुलाचा मुका घेणार्‍या आईचे वर्णन वाचताना डोळे पाणावले.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका

सुंदर लेख.
— अस्मिता पंडीत. पालघर

ताई, नमस्कार .
आज पाठवलेली पूर्ण कथा वाचण्यात आली. खूप सुंदर लेखन आहे आपले. त्यात आजची कथा सत्य घटनेवर आधारित.
फिर क्या कहने, चार चांद लग गये!_👌🌹👍
— मायाताई यावलकर. वरुड

“सासुबाई” शाळेतील शिक्षण अगदी भरपूर घेतले राधिकाताई तुम्ही. भाग्यवान आहात. नाते कसे असावे, कसे टिकवावे, अगदी कमी शब्दात तुम्ही सांगितले.
छान व्यक्तिचित्रण.
— छाया मठकर. पुणे

मस्त लिहिले आहे.
— मयुरा भांडारकर. रॅले

खरंच, सासूचे नाते आपण ज्या दृष्टिकोनातून बघू, त्याप्रमाणे बदलते असते. त्यामध्ये शिकण्यासारखेही भरपूर असते.. काही वेळा राग येतो, चिडचिड होते पण आता आपणही मोठं झाल्यावर त्या प्रत्येक गोष्टी मागील त्यांचा हेतू आणि प्रेम ही कळते. कुटुंबाविषयी असणारी आस्था त्यांच्यामध्ये अनुभवातून आलेली असते…
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे

अतिशय सुंदर आणि सहज.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव

बिंबा, माई वाचताना भावूक झाले. काय व्यक्तिमत्व होतं त्यांचं! भाकरी थापताना जीवनातील संयम, संतूलन ही स्थानके मनाला फार भावली ! मी त्यांच्याकडून मिरचीचा ठेचा शिकले होते आणि मग साई रसोईत सुरवात केली होती करायला ! विलासदादांवर त्यांचा फार जीव होता. आमचा दादा असा, आमचा दादा तसा, खूप भरभरून बोलायच्या त्या !
— आरती नचनानी. ठाणे

👌🏽👌🏽👍🏻👍🏻 खूपच सुंदर सासूबाईंची कारकीर्द. अगदी बोलक्या भाषेत मांडली आहे. तुमचे लिखाण तर अप्रतिम आहेत मला फारच आवडते.
— मीना वाघमारे. अमरावती
१०
सासु सुने बद्दलचे इतके सुरेख वर्णन क्वचीतच बघावयास मिळते. सासुबाईच्या प्रत्येक अनुभवातुन आलेल्या भावनांचा उलगडा यात आहे. विषेश म्हणजे सासुबाईच्या त्या काळातील चालीरीती नुसार वागण्या बोलण्याच्या सवयी समजुन घेऊन त्यात समरस होण्याची कला आहे.
– श्रीकृष्ण भांडारकर. अमळनेर
११
जडण घडण मुळे तुझ्या सासूबाईं भेटल्या. 🙏
— सुषमा पालकर, पुणे
१२
छान लिहिलं आहेस. सासूबाईंचे व्यक्तिमत्व एकदम ठसठशीत. पूर्वी लग्न लवकर व्हायची. माहेरी स्वयंपाक वगैरे करण्याची फार सवय नसायची. सासरी आल्यावर तिकडची पद्धत सासू कडून शिकली जायची. मला त्यांचा फोटो आवडला.
— अनुपमा. मुंबई
१३
नमस्कार, राधिकाताई. 🙏
‘सासुबाई- अशीही एक शाळा’ अतिशय सुंदर लेख जो जीवनाच्या वाटचालीतील नाती जुळली, टिकली आणि कालांतराने विरली.
सुरुवातीपासूनच आपल्या खास, निराळ्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील ‘माझी जडणघडण’ या लेखन मालिकेतील हा लेख म्हणजे केवळ सासुबाई बद्दल असलेली आपुलकी त्यांच्याबद्दलची प्रेम, विश्वास आणि श्रद्धा यांचा अनमोल रत्नांचा खजिना आपल्या लेखातून वाचायला मिळाला.
लेखात सासूबाई म्हणजेच आईसाहेबांबद्दल आणि त्यांच्याकडून सुनबाई म्हणजे तुमच्याबद्दल जो आदर आपुलकी आणि प्रामाणिक प्रेमळ संबंध सांभाळले.
वाचताना ‘अशी असते आई, अशा सासूबाई, अशा सुनबाई’, असा परिवार डोळ्यासमोर उभा राहत होता.
खरंच आई ही आईच असते आणि ती देवांचा देव असते. आपण लिहिलेले शब्द ‘सगळं संपलं पण त्यांच्यातील आई नव्हती संपली ती कधीच संपणार नव्हती.’ हे वाचताना मी मन भरून रडून घेतलं.
आपली ‘माझी जडणघडण’ यामधील आत्तापर्यंतचे मी सर्व लेख वाचले आहेत.
ताई अजून काय लिहू ?
— पांडुरंगशास्त्री कुळकर्णी. मुंबई

आपल्या पोर्टल वर दर गुरुवारी “स्नेहाची रेसिपी” हे सदर प्रसिद्ध होत असते.
या सदराच्या लेखिका सौ स्नेहा मुसरीफ यांच्याविषयी त्यांच्या सखीने पुढील गोड शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

!! सौ.स्नेहा हेमंत मुसरीफ यांचं अभिनंदन. !!

सौ.स्नेहा हेमंत मुसरीफ यांच्या विविध प्रकारच्या रेसीपीज गेल्या दोन दशकांपासून आमच्या परिवारांनी विविध मराठी चॅनेल वरुन पाहिलेल्या आहेत. मी सौ. नयन सुधीर कोर्टीकर तर सौ. स्नेहाच्या रेसिपीजची मोठी फॅन झालेली आहे. स्नेहाच्या रेसिपीज तर उत्कृष्ट असतातच त्यासाठी त्यांचं कौतुक करायला माझे शब्दही अपुरे आहेत असंच मला वाटतं.

त्याच बरोबर स्नेहाच्या रेसिपीजचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या रेसिपीज बनविण्याची पद्धत अतिशय सोप्या पद्धतीने सांगतात त्यामुळे माझ्या सारख्या सामान्य गृहिणींना त्या बनविता येतात.मग आपणही अगदी स्नेहाताई सारखं ते पक्वान्न .. विविध प्रकारचे पदार्थ चविष्ट बनवू शकलो हा आनंद खऱ्या अर्थानं शब्दातीतच आहे असं मला नेहमीच वाटतं.

माझ्या मिस्टरांच्या पानांत वेगळा चवदार..झणकेदार पदार्थ नव्याने वाढला गेला की…आज स्नेहाताईची भेट झाली का वॉटसॉपवर …? असे सुसंवाद होतातच …! आमचं जेवण इतकं स्वादिष्ट.. रुचकर होवून जातं… अर्थात याचं संपूर्ण श्रेय सौ.स्नेहा हेमंत मुसरीफ यांना देताना मला मोठा आनंद नी अभिमान वाटतो,हे सांगायला हवंच .

पुन्हा एकदा स्नेहाताईचं मनापासून खूप खूप अभिनंदन नी धन्यवाद देखील… आपल्या सगळ्या रेसिपीजवर अर्थात आपल्या परिवारांवर अगदी मनापासून खूप खूप प्रेम करणारी तुमचीच एक जिव्हाळ्याची मैत्रीण …
— सौ.नयन सुधीर कोर्टीकर. छ. संभाजीनगर

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप