नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात… सदरात आपले स्वागत आहे. पाहू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया..
आपला स्नेहांकित,
देवेंद्र भुजबळ.
“झेप” सदरात श्री अनिल शाह यांच्या प्रेरणादायी जीवन कहाणीवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
1
अनिल शाह यांच्या छायाचित्रांसह त्यांची माहिती देणारा लेख मनापासून आवडला.सुंदर, कल्पक छायाचित्रं आवडली.
— सौ स्वाती वर्तक. मुंबई
2
अनिलजी शाह..🙏
उत्तम माहिती .👌
खुप खुप धन्यवाद .👏
— दीपक पापडेजा. नगर
3
अनिल, फारच भारी!
तूझा करिअर ग्राफच मांडला आहे सगळाc!
सगळे वाचले ! छान लिहिले आहे.
— राजु इनामदार.
4
फारच छान लेख लिहिला आहे 👌👌अभिनंदन 💪
— सुनील शाह. अमेरिका
5
खुप सुंदर लेख लिहिला आहे.
— अमोल भांबरकर.. विहप. पश्चिम विभाग प्रसिद्धी प्रमुख.
6
अनिल…मस्त जीवन प्रवास…अभिनंदन🙏💪
— श्रीराम जोशी. संपादक दैनिक. नगर टाईम्स.
7
“सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे” या राजहंसाने गृपमध्ये मिसळावे,गृपबरोबर फोटो नाही तर कमीत कमी एक सेल्फी काढावा एवढीच वर्गमित्रमैत्रिणींची अपेक्षा,🙏👍❤️
— राम आणेकर. वर्ग मित्र
8
Congratulations Dear Anil.
I know you since long time n you are more than what has written at above article n really you deserve most I am most fortunate to enjoy your fathers company as well as your brother Pramod bhais company All your brothers n their next generation are doing good job in photography Nehrus photo I think was presented by Vinod bhai if I am not wrong
Any way you all brothers are doing best photography in our district n keeping your old tradition photography at topmost high level
All the best for future n your son Yash is doing award winning job in Badminton He will be best player of Maharashtra n going to keep your families name like star in the sky Thanks for sharing nice article written by Mr Devendra Bhujbal
— Amrut Mutha.
9
अनिल आणि मी नवामराठा या पेपर साठी 1997 ते 2000 मध्ये फोटो ग्राफी करायचो.
— गणेश डांगरे. नगर
10
वाह,खूप छान आणि खूप खूप अभिनंदन. तुमच्याविषयी छान माहिती मिळाली. तुमचा प्रवास कळाला. तुम्हा तिघांनाही
खूप खूप शुभेच्छा.
— स्वप्नील मांडे. नगर
11
आपल्या सिद्धहस्त लेखणीच्या माध्यमातून, मित्रवर्य श्री देवेन्द्रजी भुजबळ यांनी आपल्या परिवारातील प्रसन्न व्यक्तिमत्व श्री.
अनिलभाई यांची करून दिलेली ओळख खूपच मनस्वी आणि प्रेरणादायी अशी आहे.
श्री.देवेन्द्रजी भुजबळ यांच्या प्रती सस्नेह कृतज्ञता व्यक्त करतो आणि श्री. अनिल भाई यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनोभावे शुभकामना देतो!
💐💐💐
— प्रमोद शाह. दिल्ली
12
छान लेख… छान यशोगाथा
- राजेंद्र नाईकवाडी. सिनिअर ऑफीसर..
स्नायडर कंपनी, अहिल्यानगर
13
You are the best Anil bhai,As a press photographer and creative person.👍
— Lazarus Aalhat. Photographer, Pune.
14
Great journey and achievement !
Best wishes for days to come !
— Sandip Mahajan. Nagar.
14
Anil proud of you..
— Kanchan Kankriya. Artist, Nagar.
(जिचे तिचे आकाश लेखनाविषयी) ;
‘स्काय इज द लिमिट’ अशी म्हण आहे. पण, प्रत्येकाचं असं एक आकाश असतं. ते प्रत्येकानं ओळखून ते अधिकाधिक भव्य कसं होईल हे पहावं. डाॅ.अब्दुल कलाम सर म्हणतात तसं, डोळे उघडे ठेवून स्वप्नं पाहावीत. ती वास्तवात नक्कीच येतात. अशी सत्त्यात उतरली या सत्यकथेतून.
— प्रा डॉ सतीश शिरसाट. पुणे
अनुश्री ताईंबद्दल वाचून आनंद झाला .. खरोखर चित्राताई उत्तम उत्तम …आकाश…शोधून आणत आहेत
सोमय्या मध्ये पहिलीच्या मुलाने सुरुवात केली वाचले, कौतुक वाटले ..
सुरेखा ताईंना आमच्या ही शुभेच्छा आणि अभिनंदन
अभिलाषा कविता खूप अर्थवाही आहे. आवडली.
प्रा पांढरीपांडे यांचा लेख चांगला आहे .. साहिर लुधीयानवी यांच्या गीताचा उपयोग चपखल आहे ..
जे आपल्या हातात नाही ते सोडून दुसरी वाट घेणे इष्ट च आहे.
वसंतोत्सव खूप सुंदर ..
खरेच या दिवसात होणारी फुलांची ही उधळण वेड लावते. फोटो उत्तम आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर या दिवसांत बसंत राणी फुलते. आम्ही दरवर्षी मुद्दाम ती दोनशे झाडे बघायला जातो.आपण मुंबईत आहोत हे क्षण काळ विसरायला होतं. पण नुकतीच बातमी वाचली ती सर्व झाडे कापली जाणार आहेत.
हे शेवटचे वर्ष ! मनास अतीव वेदना झाल्यात.आता फक्त फोटोत
अनुराधाताईंची कविता आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई
प्रत्येक समस्येवर उपाय असतोच हे अभियांत्रिकी तत्व नात्यांच्या पातळीवर पांढरीपांडे सरांनी सोदाहरण स्पष्ट केले आहे.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे
रश्मी हेडे ह्यांच्या ‘आयुष्य क्षण भंगुर आहे’ या कवितेला मिळालेल्या प्रतिक्रिया….
१) रश्मीताई,
आयुष्य क्षणभंगुर आहे ही कविता वाचली.खूप छान कविता सादर केली आहे. तसेच जीवनाबद्दल सकारात्मक विचार करायला लावणारी आहे. खरे आहे आयुष्य क्षणभंगुरच आहे, आपल्या कवित्यांमधील प्रत्यक्ष शब्द विचार करायला लावणार आहे.पुन्हा एक वेळ अभिनंदन.
— मदन कोकीळ. कराड
२) खूप छान शब्द आणि अगदी अर्थपूर्ण खूप सुंदर, साधी पण मनाला भिडणारी कविता आहे ही ♥️ जीवनाचं तत्वज्ञान अगदी सोप्या शब्दात सांगितलंय.
Superb 👌
३) मस्त 👌एवढी वर्षे मुलांचे शिक्षण, करियर, मध्ये गेली, आता मोकळेपणा, निवांतपणा मिळालाय तर जे राहून गेले आहे ते शिकायचे, अनुभवायचे आणि enjoy करायचे 🎊
— नेहा वडके. सातारा
४) खूप छान अप्रतिम कविता जणू मनातील भावनांच शब्दांत मांडल्या आहेत. खरच रश्मीताई तुमचे लेखन हे नव्याने जीवनाकडे बघायला शिकवते.👌👌❤️🌹
— मनीषा हेडे.
५) रश्मी खूप छान लिहिलं आहेस आयुष्य आहे तोपर्यंत ते आनंदाने कसे जगले पाहिजे.🌹
खरंय आयुष्य क्षणभंगुर झालेल आहे कधी काय होईल सांगता येत नाही.
— उर्मिला पालकर. सातारा
६) खूप छान कविता रश्मी.. कवितेमध्ये आणि लेखनामध्ये एकदम तयार.. ग्रेट 👍
खूप खूप अभिनंदन 🌹
— सुरेखा गाडेकर. पुणे
७) मॅडम छानच शब्दांकन केले आहे . चालू जीवना मध्ये हे सर्व घेण्या सारखे विचार आहेत त्याचे अवलोकन झाले पाहिजे तरच जीवन जगण्यात मजा आहे नाहीतर सर्वकाही व्यर्थ . अभिनंदन
— प्रकाश सर. सातारा
८) 👌 अतिशय सुंदर कविता..सुरेख काव्य रचना👏👏… पुढील वाटचालीसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा 💐💐
— दिपक गोरे, मुंबई
९) खुप सुंदर कविता लिहली आहे.रश्मी 💐👍
— पुष्पा टांकसाळे.
१०) Khupach Chhan, Poem.Liked it.Kindly keep it up. 💐🌹👌😀
— Pro Dr DVKasar. Pune
११) 🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप सुंदर वास्तव लिहिले आहे .खरोखरच जीवन क्षणभंगुर आहे म्हणून अगदी आनंदाने प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला पाहिजे
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन रश्मीताई🌹🙏
— ज्योती यंदे. पुणे
१२) खूप सुंदर कविता 👌🏻
— होरणे ताई, पुणे
१३) 👍खुप छान कविता वाचली खरच आयुष्य क्षण भंगुर आहे मला खूप आवडली.
— माणिक तंटक, पुणे
१४) खुप छान आयुष्याचा सार मोजक्या शब्दात व्यक्त केला आहे 👌👌👍👍
— संगीता सासवडे. पुणे
१५) खूप छान.
जगावे कसे हे तुझ्या कवितांन मधून लेखांन मधून खूप सोप्या शब्दात सांगतेस.
— संगीता पालकर. पुणे
१६) अतिशय सुंदर 👌
— विशाखा खुटाळे. सातारा
१७) खरं आहे. 👍🏻 आनंदाने जगून घेऊ. छान कविता 🌹
— सोनाली, कराड
१८) 👌👌 खूप छान 👍
— वैशाली मंगरुळे. सातारा
१९) खूप छान 👍
— नंदकुमार कोळपकर. नाशिक
२०) Too good 👌👌
— ममता कुंदप. सातारा
२१) खरं आहे 🥰
— ज्योती मुरुडकर. सातारा
२२) Wah …mastch didi ….
— Sneha Devi.
२३) खूपच छान कविता 👌🏻
— सविता हेडे. सातारा
२४) खूप मस्त आहे👌🏻
— दिपा धामणिकर. पुणे
२५) अप्रतिम 👌
— हर्षल रांगोळे. सातारा
२६) खूपच 👌👌👏🏻
— तृप्ती ढवण. नाशिक
२७) वाह,छान 👌
— सौ जाधव, सातारा
२८) अप्रतिम
— ज्योती कासार. सातारा
२९) खूप सुंदर रश्मी एकच नंबर
— भाग्यश्री कुंदप.
३०) अप्रतिम
— भारत वनकुद्रे. कोल्हापूर
३१) सुंदर कविता 👍
— सुहास इंदूरकर. अमरावती
३२) 👌👌 छान आहे कविता
— वर्षा रांगोळे. सातारा .
३३) खरंच खूप सुंदर👌🏻👌🏻
— प्रियंका झुटिंग. सातारा
३४) खूप छान
— वैशाली रांगोळे.
३५) खूप सुंदर
— स्वाती मांजरकर. सातारा
३६ ) Superb
— स्वाती कासार. नाशिक
३७) कविता खूपच छान
— नंदा ताई झुटिंग. सातारा
३८) स्पर्श बोलतात…
खूप हृदयस्पर्शी आहे.
— श्रीमती देशपांडे. नागपूर
मी शिल्पा … या लेखिकेच्या दैदीप्यमान जीवन प्रवासाचा आढावा घेतलेल्या पुस्तकाचे परिक्षण अप्रतिम.
मनःपूर्वक अभिनंदन !
— सुहास पटवर्धन. बदलापूर
छ.शिवाजी महाराजांची युगधुरंदर पत्रे लेखावर प्रतिक्रिया…
1
रयतेचा राजा असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे दर्शन त्यांच्या विविध पत्रांतून दिसते. हा नविन मुद्दा या लेखातून सोदाहरण स्पष्ट केला आहे.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे.
आदरणीय संपादक देवेंद्र भुजबळ साहेब यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी युगधुरधंर पत्रे हा लेख संग्रहीत ठेवावा असा वाचनीय आहे.
शिवजयंती निमित्ताने दोन्ही कविता उत्तम. 💐👍🤝💐🤝
— गोविंद पाटील. जळगाव
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
