नमस्कार मंडळी.
एकीकडे इस्रायल आणि इराणचे युद्ध सुरू आहे. ते कधी एकदा संपेल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे पुरोगामी समजल्या जाणार्या महाराष्ट्रात नाशिक येथील अशोक खरात या भोंदूबाबाच्या एकेक भानगडी जसजशा पुढे येत आहे, ते पाहून सर्व सामान्यांची मती गुंग होत आहे ! अशाही परिस्थितीत आपण जीवन जगत आहोतच. पण महत्वाचे आहे, ते म्हणजे आपले मन विचलित होऊ न देता, आपले दैनंदिन जीवन जगत रहाणे हे होय.
मागच्या आठवड्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे, लेखिका चित्रा मेहेंदळे यांनी आपल्या पोर्टल वर लिहिलेल्या “अमेरिकेतील नवदुर्गा” आणि “जिचं तिचं आकाश” ह्या दोन लेखमाला, “जिचं तिचं आकाश” ह्या पुस्तक रुपाने एका शानदार समारंभात प्रकाशित झाल्या आहेत. याबद्दल चित्राताईंचे मनःपूर्वक अभिनंदन. नवीन आर्थिक वर्ष आपणास भरभराटीचे जावो ह्या हार्दिक शुभेच्छा.
आता पाहू या, प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया..
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
“जिचं तिचं आकाश” ह्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी, आपल्या पोर्टलच्या विविध लेखक, लेखिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्या पुढे देत आहे. विशेष म्हणजे ह्या सर्व शुभेच्छा प्रत्यक्ष कार्यक्रमात वाचून दाखविण्यात आल्या. या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
1
अमेरिकेतून शिल्पा कुलकर्णी लिहितात,
नमस्कार !
चित्राताईंनी विविध क्षेत्रातील यशस्वी स्त्रियांची निवड करून लिहिलेले लेख म्हणजे स्त्री कर्तृत्वाचा चढता आलेखच म्हणता येईल. प्रत्येक स्त्री चा प्रवास जाणून घेताना वाचकांना नवी उभारी मिळेल, नवीन कल्पना सुचतील, काहीतरी करण्याची उर्मी निर्माण होईल. मला वाटते हेच त्यांच्या पुस्तकाचे खरे यश आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा !
— शिल्पा कुलकर्णी.
ह्या बरोबरच अमेरिकेतूनच जेष्ठ लेखिका स्मिता भागवत, मुंबई दूरदर्शनच्या लोकप्रिय निर्मात्या विजया जोगळेकर धुमाळे ,कोल्हापूर हून निवृत्त प्राचार्या रेखा दीक्षित, पुणे येथून प्राचार्य सूर्यकांत वैद्य, मराठी साहित्य परिषद तेलंगण राज्य हैदराबाद च्या अध्यक्षा विद्या देवधर,- जमशेदपुर हून मृदुला राजे आणि अन्य अनेक जणांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
ज्येष्ठांनी लुटला कॅरम, बुद्धिबळ स्पर्धांचा आनंद.. या वृत्तांतावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…
1
खूपच आनंदाची बातमी ! 👏
सानपाडा ज्येष्ठ नागरिक केंद्राचा हा उपक्रम खरंच प्रेरणादायी आहे.सर्व विजेत्यांचे अभिनंदन 💐 आणि आयोजकांचे मनापासून कौतुक !
अशा स्पर्धांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते. 🌟अशाच सुंदर उपक्रमांची पुढेही अपेक्षा! बातमी साठी आभार 🙏
— उत्तम व्हावळ.
2
सानपाडा विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्रात झालेल्या डबल्स कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात आणि आनंदात पार पडल्या. 🎉
चार दिवसांच्या या स्पर्धांनी सर्व सदस्यांना एकत्र आणून मैत्री, आनंद आणि स्पर्धात्मकता यांचा सुंदर संगम घडवला.
सर्व विजेते व उपविजेते यांचे हार्दिक अभिनंदन 💐
तसेच उत्कृष्ट नियोजनासाठी आयोजकांचे विशेष कौतुक!
अशा कार्यक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सक्रिय, आनंदी आणि प्रेरणादायी बनते. 🙌
Keep up the great spirit ! 🌟Thanks Newsstory for covering news.
— सुभाष बारवाल.
3
न्यूज स्टोरी टुडे मधील आमची बातमी वाचली. कौतुकाने कुटुंबीयांना दाखविली. नवी मुंबईतील सानपाडा विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्रात नुकत्याच आयोजित केलेल्या डबल्स कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडल्या. 👏 चार दिवस चाललेल्या या स्पर्धांना सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ही खरोखरच अभिमानाची बाब आहे.
सर्व विजेते व उपविजेते यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐
अशा उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह, मैत्रीभाव आणि मानसिक ताजेपणा कायम राहतो.
— राजेश मांडेवाल
4
शतरंज खेळ हा आमच्या ज्येष्ठ नागरिक क्लबचा आत्मा आहे. आमचे सदस्य सकाळी आणि संध्याकाळी शतरंज आणि कॅरमच्या दैनंदिन संपर्कात तरुण दिसतात आणि वाटतात. क्लब हे आमचे दुसरे घर आहे. या खेळांच्या संपर्कात आनंदाचे वर्तुळ पूर्ण होते 💐
इव्हेंट कव्हरेजसाठी न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टलचे आभार.
— मनीष जुयाल. शतरंज चॅम्पियन.
5
स्पर्धा झाली सानपाडा विरंगुळा जेष्ठ नागरिक केंद्राची,
स्फूर्ती चढली दुहेरी कॅरम व बुद्धिबळ खेळण्याची ।
सुचवली कल्पना राजेश यांनी,
नियोजन केले लोखंडे, हराले, राजेश, बापू आणि घोलप यांनी।
होत होता कोणाचा विजय तर कोणाचा पराजय,
उत्साहात आणि आनंदात स्पर्धक होते तन्मय।
करतो मनापासून अभिनंदन साऱ्या विजेत्यांचे,
करतो मनापासून कौतुक साऱ्या नियोजकांचे ।
आभारी आहे वास्कर साहेबांचा आणि आमच्या अध्यक्षांचा,
लुटला दुहेरी आनंद आम्ही मैत्री आणि स्पर्धात्मकतेचा ।
— संतोष जोशी
1
जिचं तिचं आकाश… पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अभिनंदन.मी येऊ शकले नाही याची खंत सदैव राहील.
थोरवेजी म्हणतात,
त्या प्रमाणे ..बघू या थोडी वाट बघू या. संयम राखून या कठीण परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत बाळगू या.. हे पटते
नंदिनी यांचे आकाश बघून स्तिमित होते.या वयात ही नवी शिकण्याची जिद्द, मोत्यांचे डिजाइन स्वतः करणे खूप कौतुकास्पद आणि प्रेरणास्पद आहे.
प्रा पांढरीपांडे यांच्या प्रश्नाने व्यथित झाले आहे ..कोणी शिकवले असेल त्यांना ? स्वतः च्या अहंकारासाठी जगाला वेठीस धरणारे हे वयोवृद्ध कोणत्या मुशीत घडले असावेत ?
गुढी पाडव्याच्या कविता छान आहेत. युद्ध संपावे,बुद्धाची शांती यावी असे स्वर कानी पडावे ..किती सार्थ इच्छा आहे आवडली सुनीलजींची कविता ..कुमठेकर यांचीही कविता सुरेख आहे ..
सर्वच कविता वाचनीय.
मीनाजींचा गुढी पाडव्याच्या लेख छान आहे. विशेष माहिती मिळाली.
— स्वाती वर्तक. मुंबई
2
नमस्कार.
आपण प्रकाशित केलेले ‘जिचं तिचं आकाश’ या मुलखावेगळ्या स्त्रियांच्या समग्र जीवनावर प्रकाश झोत टाकणाऱ्या अनोख्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. आनंद झाला. कथा नायिका + लेखिका + प्रकाशिका या सर्वांचे हार्दिक अभिनंदन 🌹
— नंदकुमार रोपळेकर. मुंबई.
3
नमस्कार सर.
दहा मार्चच्या न्यूज स्टोरी टुडेमधील “थोर कवी प्रा. अशोक बागवे” हा आपला लेख वाचला. बागवे सरांचा एकूण साहित्य संसारच आपण उलगडून दाखवला आहे. बागवे सरांच्या विषयी खूपच छान आणि सविस्तर माहिती मिळाली.
आजपर्यंत मला कधी बागवे सरांना प्रत्यक्ष पाहण्याचा, भेटण्याचा किंवा त्यांच्या कविता ऐकण्याचा योग आला नाही. परंतु आपल्या लेखामुळे मला त्यांच्या जवळ गेल्यासारखे वाटले.
खूप धन्यवाद.
— उद्धव भयवाळ. छ. संभाजीनगर
4
जिचं तिचं आकाश पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमासाठी मन: पूर्वक शुभेच्छा! News story channel चे पुढचे दमदार पाऊल ठरेल.👍🏻
— प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ.
5
न्युज स्टोरी टूडे ची आजची सगळी सदरे खूप छान 👌🏻
विनोदी कविता, हसवून गेल्या.
घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.
चित्रा मेहेंदळे यांचे पुस्तक प्रकाशित होणार…
सारं सारं छान छान.
— लेखिका, कवयित्री आशा दळवी. सातारा
6
प्रा डॉ विजय पांढरीपांडे यांचा “आपण सावध राहू या” हा लेख अतिशय उत्तम, सांप्रत परिस्थितीत गरजेचा , योग्य शब्दात, झणझणीत अंजन घालणारा आहे. माझ्याच मनातील विचार…असे सुस्पष्टपणे उतरवलेले बघून खूप आनंद झाला ..खरे आहे पदव्या मिळवून माणूस सुसंस्कृत होत नाही ..हा विकास, हे तंत्र ज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता सर्व काय कामाचे ? जर आपण शेजारच्या व्यक्ती वर विश्वास, दया, करूणा दाखवू शकत नाही … आज त्याची फार गरज आहे.
वेदवतीताईंचा कट चांगलाच शिजलाय…सुगंध घरभर पसरलाय..नक्की करून बघणार.
बाईचा जन्म कविता आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई
7
बागवे सरांची ओळख नव्याने व सविस्तर झाली. त्याची भेट ठाणे येथील संमेलनात झाली होती.
— मुबारक उमराणी. सांगली
8
नमस्कार.
आपण मा.श्री. अशोकजी बागवे सरांचे शब्दचित्र खरोखरच वास्तववादी असं रेखाटले आहे. कवीवर्य अशोकजी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन व शुभेच्छासह त्यांच्या समस्त परिवारास निरोगी निरामय आयुष्य लाभो हीच साहित्य शारदादेवी जवळ मनापासून प्रार्थना शुभ रात्री 🌹🌃🕉️🙏🎉🚩👍.
— नंदकुमार रोपळेकर. मुंबई
9
सर नमस्कार,
थोर कवी प्राध्यापक अशोक बागवे यांच्यावरील आपला लेख वाचला खरोखरच खूप सुंदर लेख आहे. बागवे सरांचं पसायदानावरील प्रवचनटी ऐकण्याचा योग हल्लीच दोन-चार दिवसांपूर्वी आला होता. अतिशय सुंदर वक्तृत्व, विषयांवरची पकड, सखोल ज्ञान याचा याचा पुरेपूर पडताळा सर्व प्रेक्षकांना आला. त्यांचं प्रवचन ऐकताना ते संपूच नये असे सर्वांना वाटत राहिले. प्राध्यापक अशोक बागवे सर म्हणजे चालता बोलता ज्ञानकोशच आहे.
उल्कापातामुळे निर्माण झालेल्या लोणार सरोवराची इत्थंभूत माहिती डॉक्टर चंद्रकांत हालगे यांनी दिली आहे. खरंच फार सुंदर माहिती मिळाली.
— श्रद्धा जोशी, डोंबिवली
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
