नमस्कार, मंडळी.🙏
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निवृत्त मुख्याध्यापक श्री सतिश्चंद्र टिपणीस यांनी लिहिलेल्या आठवणी खूप भावपूर्ण आहेत. त्यास व समाजभूषण पुस्तकाच्या आणि ईतर मजकुराविषयी मिळालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
समाजभूषण तळागाळात पोहचून, समाजातील खरे हिरे शोधणे, ही देवेंद्र सरांची सखोल अभ्यासक वृत्ती, सर्व वाचकांसाठी एक प्रेरणादायी शिकवण आहे.
“समाजभूषण” पुस्तक, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचो !
– शुभेच्छुक -सौ. वर्षा भाबल.
समाजभूषण पुस्तकाचे सुंदर परीक्षण. देवेंद्रजींनी सर्व लहान मोठ्यांना बहुमोल सल्ला दिला आहे हे जाणवले. पुस्तक प्रकाशनाबद्दल देवेंद्रजींचे हार्दिक अभिनंदन व लेखाबद्दल राधिकाताईंचे आभार.
चला, पुन्हा लहान होऊ या !
खूप छान ! एकदम समर्पक लेख !
– नीता भिसे
अगदी योग्य शब्दात लिहीले आहे. नविन पिढीचे बालपण, निरागसता फार लवकर, लहान वयांत संपते असे जाणवते. 👌👌
फारच छान! बालपण, त्याच्या आठवणी v तुमचा लेख ही बालपणा सारखाच मस्त !
– वासंती गंभीर
खूपच छान, चित्र पण सुंदर आणि चपखल!!
– श्रीलेखा जोशी
अप्रतिम परंबिकूलम
छान, मैसूर ते उटी मार्गात सुद्धा हत्तीचे कलप मृग सांबर दिसतात
– डॉ जी आर जोशी
आठवणीतील इश्चुरी आयलँड
मेधा फार सुंदर वर्णन केलं आहेस फोटो पण खूप छान, त्यामुळे लेखाला अधिकच उठाव आलेला आहे. लिहित रहा, अनेक शुभेच्छा.
– सुनंदा पानसे
वाह,फारच सुंदर लिखाण!! इश्चुरी आयलँड ची सफर करून आले असं वाटलं हा लेख वाचून.😊
– Gautami Karmarkar
ओठावरलं गाणं
बालगीत जरी असलं तरी आपल्याला सुद्धा आठवड्यातून तीन रविवार येतील कां असं वाटायचं. भोलानाथ गाणं खूप सुंदर रितीने उलगडून दाखविले आहे. धन्यवाद.
– निलाक्षी पिसोळकर
लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात रेंगाळणार असं हे मंगेश पाडगावकर यांचं लोकप्रिय गीत. बालकांच मनोविज्ञान👌 उलगडणार! तितकंच सुंदर मीना खडीकर यांचं संगीत ! खूप छान शब्दांत रसग्रहण केलं आहे. अभिनंदन !! 👌👌
– रवींद्र खासनीस
सुरेख रसग्रहण. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे गाणं आवडतं. मीना खाडीलकर यांनी चालही सुंदर लावली आहे.
– विवेक भावे
त्याकाळात हे गाणं फार प्रसिद्ध होतं. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योति इतके सुंदर शब्द ओठांवर घोळत असायचे. मायेने ओथंबलेले हे सूर अजूनही हृदयाला स्पर्श करून जातात. अशा आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद…
– सुनंदा पानसे
सुंदर विश्लेषण. या सदरात श्री विकास भावे (जे स्वत: एक उत्तम कवी आहेत) सातत्याने मान्यवर कवींच्या कवितांचे सुंदर विश्लेषण करून ते रसिकांपर्यंत पोहोचवतात. बऱ्याच वेळा एखादा शब्द कवीने का निवडला असावा असा प्रश्न रसिकांच्या मनात निर्माण होतो तो ओळखून त्या अनुषंगाने ते विश्लेषण करतात आणि कवितेतील भावार्थ रसिकांपर्यंत पोहोचवतात. कधीकधी तर तीच एखादी कविता भावे सरांचं विश्लेषण वाचलं की जास्त आवडू लागतात. धन्यवाद 🙏
– गिरीश विश्वनाथ पाठक
पूज्य बाबासाहेब…
संक्षिप्त स्वरूपात सौ. राधिका भांडारकर यांनी शिवशाहीर बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व वाचकांपुढे उभे केले आहे. आदराने मान झुकते.
बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– अरूणा मुल्हेरकर, अमेरिका
तरुणांना प्रेरणा देणाऱ्या एका ऐतिहासिक पर्वाचा अस्त झाला. बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
– प्रीति परदेशी
पण वाट कोण पाहील ?
खुपच छान वाचनीय ,विचार करायला लावणारा लेख .
धन्यवाद ओघवते लिखाणाबद्दल.
– सोमनाथ साखरे
पण वाट कोण पाहिल ?
खरंय, वाट बघायला लागणारी चिकाटी आता दिसेनाशी होत चालली आहे. छान, विचारप्रवर्तक लेख. धन्यवाद
– सौ लीना फाटक, युनायटेड किंगडम
very meaningful, really we should also start thinking and practicing this method.
– kavita londhe
आठवणीतील बाबासाहेब
भारतरत्न महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी खूप छान सांगितल्या आहेत.. वाचताना मन हेलावून गेले… मा.सतीशचंद्र टिपणीस सर आपण भाग्यवान आहात… खूप खूप अभिनंदन आणि आभार सर….
मा.भुजबळ साहेब आपले ही हार्दिक हार्दिक धन्यवाद….!!!!
– श्री. अंकुशराव तानाजी
धन्यवाद साहेब,
आठवणीतील बाबासाहेब आपण
आपल्या बालपणीच्या आठवणी अतिशय हृद्य आहेत.
धन्यवाद साहेब.
– अशोक केरू गोरे
नवी सुरवात..सुरेख आशादायी सकारात्मक कविता
मनातली कविता…सुधीर मोघे यांच्या कविता,गीतांचा अभ्यासपूर्ण आढावा…
कविता गीत गजरा हार आणि धागा
यांचे नाते सुरेख..
गौरीताईंनी या लेखात टिपलेल्या कविता ,गीते सुरेखच…
वाचताना खूप रमले..
– राधिका भांडारकर, पुणे
कुटुंब रंगलय काव्यात
अतिशय सुंदर कार्यक्रम
मी बर्याच वर्षांपूर्वी पाहिलेला आहे
पण अजूनही लक्षात आहे
– श्रीकांत पाटकर, मुंबई
राधिका भांडारकर यांचा लेख अप्रतिम 🙏🏼
– प्रकाश कथले, जेष्ठ पत्रकार, वर्धा