नमस्कार, मंडळी.
सुख म्हणजे काय असतं ? हा डॉ सुलोचना गवांदे, अमेरिका यांनी लिहिलेला लेख खूपच विचार प्रवर्तक आहे. प्राप्त झालेल्या प्रतिक्रियांवरूनही ते दिसून येते.
तसेच वृद्धांची समस्या कशी बिकट होत चाललेली आहे, हे श्री विकास पाटील यांनी मार्मिकपणे मांडले आहे.
जेष्ठ पत्रकार श्री शेषराव वानखेडे यांनी आपल्या पोर्टलविषयी भरभरून कौतुक केले आहे. या यशात आपणा सर्वांचा वाटा आहे. आपलं प्रेम, विश्वास असाच वृद्धिंगत होत राहो, ही विनंती.
आपला,
देवेंद्र भुजबळ, संपादक.
सुख म्हणजे नक्की काय असते ?
हा अप्रतिम लेख आहे. सुख आणि आनंद यातला नेमका फरक, त्याचं क्षणिक/चिरंतन असणं ह्याचं विश्लेषण अतिशय सुंदर आहे. खरंच, किमान अपेक्षा असलेली माणसे आतून समाधानी असतात आणि इतकेच नव्हे तर त्या कामगार वस्तीतील स्त्री चे उत्तर डोळ्यांत अंजन घालणारे आहे. प्रतिष्ठेच्या, सुखाच्या आपल्या व्याख्या पुन्हा तपासायला लावणारे आहे.
इतक्या सुंदर लेखाबद्दल मनापासून आभार.
– डॉ गौरी जोशी कंसारा, न्यू जर्सी, अमेरिका.
खरचं सुख हे मानण्यावर असत. पण मला वाटतं सुख हे सीमांत उपयोगिता सिद्धांताप्रमाणे असत. जसजस मिळत जात तसतशी त्याची सुख मिळण्याची जाणीव कमी कमी होत जाते. पण दुर्दैवाने दुःखाच तस नसत. इथे उलटा सिद्धांत लागू होतो. छान लेख आहे सुलोचना मँडम आपला.
– वर्षा फाटक, पुणे.
” सुख म्हणजे नक्की काय असते ?.👌 खुपच सोप्या सरळ व ओघवते लिखाण. त्रिवार धन्यवाद सर.💐
– सोमनाथ साखरे, निवृत्त उपमहासंचालक, एमटीएनएल
डॉ अंजुषा पाटील यांनी मुलांना वाढवताना पालकांनी कसं वागावं हे छान विशद करून सांगितलं आहे …आत्ताची पिढी स्मार्ट ही गोष्ट तर खरीच….धन्यवाद
– विकास मधुसूदन भावे
माणिक वर्मा यांच्या गोड आवाजातले गाणं मनाला भावून जाते. पण लेखकाचे रसग्रहण तर अति सुंदर.
अभिनंदन
– माधुरी खेडेकर
माझं एक आवडतं गाणं. माणिक वर्मा यांच्या गोड गळ्यातून उतरलेले. कवी व संगीतकार यांची नावे आपल्या परिक्षणामुळे कळली. सुरेख परिक्षण. अभिनंदन.
– विवेक भावे
आई वडिलांनी करायचे काय ॽ विकास पाटिल यांनी वास्तववादी लिखान केले आहे. प्रत्येक वार्डावार्डात, गावागावात अशी परिस्थिती आहे. एक कुटूंब एक मुल हे धोरण आता सोडावे लागेल. किमान एकतरी अपत्य वृद्धापकाळात सोबत असावे. सर आपण उत्कृष्ट संपादन केले आहे.
– सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी
श्री. पाटील यांनी मांडलेली संकल्पना खरंच सुंदर आहे. “मित्राश्रम” हया शब्दातच आपुलकीचा जिव्हाळा जाणवतो. प्रत्येक जेष्ठ व्यक्तीची व्यथा तुम्ही शब्दात मांडलीत. भारतात शिकून परदेशात मुलांनी स्वतःची हुशारी वापरायची ! ही अगदी माझ्या मनातील खदखद, तुमच्या लेखातून वाचनात आणलीत, धन्यवाद ! साहेब. भुजबळ सरांनी तो प्रकाशात आणला.
मोल्सवर्थ यांच्या मराठी-इंग्लीश शब्दकोश लिंकची माहिती मिळाली. धन्यवाद सर ! मराठी शब्दांचा संग्रह मिळवण्यासाठी मोल्सवर्थ, (ज्या ठिकाणांची नावे तुम्ही दिलीत, त्या नावांवरून त्यांना आलेल्या अडचणी लक्षात येतात.) यांचे अगदी समर्पक मोजक्या शब्दातील ओळखवर्णन, तुमच्या लेखात नेहमीच उमजते. उपयुक्त व नेहमीच लागणारा शब्दकोश आमच्या पर्यंत पोहचला. धन्यवाद ! डॉ. ठाकूर. धन्यवाद ! भुजबळ सर
– सौ. वर्षा महेंद्र भाबल, नवी मुंबई.
नमस्कार,
शाहीर विठ्ठल उमप या लोकमान्य कलावंताचा जीवन प्रवास फारच छान पद्धतीत लेखांकन केले आहे. त्यांची कला क्षेत्रातील वैविधता फारच वाखाणण्याजोगी होती सर्वमान्य शाहीर होते.
‘हे दादा आवर ये’ ह्या गाण्यातील ठेका, चाल, लयबद्धता आणि टिपिकल कोळी भाषेचा वापर गाण ऐकताना मन तल्लीन होऊन जाते, हे गाणं दादांनी प्रत्यक्ष गाताना मी लहानपणी ऐकल होतं आणि तेव्हापासून त्यांच्या कोळीगीतांचा मी चाहता झालो. तसे तर त्यांची सगळीच गीत ही वेगळ्या ठेवणीतली आणि एक वेगळा ठसा उमटवणारी आहेत. बहुआयामी कलावंत आणि कलेचा बादशहा त्यांच्या ह्या आठवणी हा खेडलेकरांचा लेख वाचताना जागवल्या.
– सुधीर थोरवे, पर्यावरण तज्ञ, नवी मुंबई.
विट्ठल उमप यांचेवरील माहितीपूर्ण सुंदर लेख
– भि म कौशल, निवृत्त माहिती संचालक, नागपूर
केरळ मधील पालघाट गावाविषयी मनीषा पाटील यांनी खूपच छान लिहिले आहे. छायाचित्रे पण छान आहेत. तिथे मराठी संमेलन घेण्याबाबत जरूर विचार करावा.
– विलास कुलकर्णी, मीरा रोड
नमस्कार,
इंदिरा संतावरील लेख सुंदर झाला आहे.
डॉ गौरी जोशी कंसारा यांनी देवतेच्या लेखनावर टाकलेला प्रकाशझोत माहितीपूर्ण.
निला सत्यनारायण वरील देवेंद्र भुजबळ यांचा लेख खूप आवडला, त्यांचं जाणं खूप चटका लावून गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.
– प्रा वृषाली मगदूम, नवी मुंबई
डॉक्टर विशेषांक वाचनिय होता
लगे रहो…! राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्यातून संचालक पदावरून सेवानिवृत्त झालेले श्री. देवेंद्र भुजबळ ‘न्युज स्टोरीटुडे‘ हे वेब पोर्टल समर्थपणे चालवित आहेत. यात त्यांच्या पत्नी अलका भुजबळ आणि मुलगी देवश्री यांचीही चांगली साथ मिळत आहे.
आज कोरोनाच्या काळात वृत्तपत्रे काही अंशी मागे पडली. त्यामुळे अनेकजण मोबाईलवरून, युट्यूब चॅनेल अथवा वेब पोर्टल चालवित आहेत. भले त्याला जाहिराती मिळाल्या नाही तरी चालतील पण ते चालवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यात विविध प्रकारच्या बातम्यांचा भडिमारच अधिक असतो. कोरोनाच्या बातम्यांचा भडिमार नको आणि मनात नकारात्मक विचार येऊ नयेत म्हणून अनेकजण आज टीव्ही देखील पाहत नाहीत. मोबाईलच आता सर्व काही झाला आहे.
श्री. भुजबळ नेटाने ‘न्युज स्टोरी टुडे ‘ हे वेब पोर्टल चालवित आहेत. भुजबळ यांनी त्यांच्या पोर्टलचे वेगळेपण जपले आहे. गुन्हेगारी, बलात्कार, कुणाची बदनामी होईल, अशाप्रकारचा मजकूर ते प्रसिद्ध करीत नाहीत. न्युज स्टोरी टुडे मधून अनेक चांगले विषय त्यांनी हाताळले आहेत आणि हाताळत आहेत.
1 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त त्यांनी डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करणारा ‘डाॅक्टर विशेषांक‘ त्यांनी प्रसिद्ध केला. डॉक्टर कसा देवमाणूस आहे, रुग्णांची नाडी ओळखून त्यांना आजारातून उठून उभे करणारे डॉक्टर कसे मसिहा आहेत, अशा विविध अंगांनी अनेकांनी या पोर्टलवर लेख लिहिलेत, डाॅक्टरांबद्दलचे आपले अनुभव सांगितले. विशेषतःकोरोनाच्या काळात डॉक्टरांनी अहोरात्र रुग्णांना सेवा देऊन जीवनदान मिळवून दिले आहे, हे खरेच ! यांनी विशेषांकात, अलका भुजबळ यांनी इम्युनिटी बुस्टर, वर्षा महेंद्र भाबल यांनी मानवरुपी देव, अर्चना शंभरकर यांनी फॅमिली डॉक्टर, डॉ. स्वाती व डाॅ.अविनाश तुपे – देवदूत- नितीन सप्रे नवी दिल्ली यांनी डॉक्टर म्हणजे देवच तर कुणी माणसातला देव असे डाॅक्टरांबद्दलचे अनेकांनी आपले अनुभव कथन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे हा विशेषांक वाचनिय ठरला आहे. या आधी राजर्षी शाहू महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भुजबळ यांनी लिहिलेले लेख उत्तम आणि वाचनिय होते.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यावरील जयप्रकाश दगडे यांनी लिहिलेला लेख चांगला होता. एकुणच चांगले विषय हाताळण्यात भुजबळ यांचा हातखंडा आहे.
न्युज स्टोरी टुडे वर देश-विदेशातून अनेक लेखक दर्जेदार लेखन करीत असल्यामुळे या पोर्टलची ख्याती वाढत आहे़. लगे रहो…! असे म्हणण्यावाचून मला तरी थांबवत नाही.
– शेषराव वानखेडे, जेष्ठ पत्रकार.