नमस्कार मंडळी.
गुगल च्या काही तांत्रिक कारणांमुळे आपले पोर्टल गेले चार दिवस बंद होते. त्यामुळे दिलगीर आहे.
गेल्या काही दिवसात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
गतिमंद महिलांसाठी आयुष्य वेचणारे डाॅक्टर राजेंद्र धामणे आणि डॉक्टर सुचेता धामणे योगीच आहेत. आणि “अनाथांचे माउली” आहेत. शेवगावला रोटरीच्या कार्यक्रमास आले होते.
- — राजीव रसाळ. शेवगाव
२
तालुकापातळीवर संमेलने व्हावीत ही आपली सूचना खूपच छान आहे. - –– प्रा. डाॅ.सतीश शिरसाठ, पुणे.
३
मनोहर जोशी सरांबरोबर संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना त्यांचा मला बराच फायदा झाला. नगरसेवक ते आमदार खासदार त्या आठवणी अजून जाग्या आहेत.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- — विलास प्रधान. मुंबई.
४
नमस्कार मॅडम. खूपच वास्तव्य मांडणारा तुमचा सायबर गुन्हे आणि बालक हा लेख आहे .कशा प्रकारे मुलींना फसवतात याचं हे एक उदाहरण आहे. समाजातील काही समाकंटक असतात जे हे असे गुन्हे करत असतात.पण जनजागृती करण्यासाठी असे लिखाण नियमीतपणे किशोरवयीन मुलांना , मुलींना वाचायला दिले पाहिजे. शाळेत या बद्दल बोलले पाहिजे . घरात पालकांनी आपल्या मुलांना हि माहिती दिली पाहिजे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी जेवढी जनजागृती करता येईल तेवढी करूच. तुमच्या दोघींचे मनापासून आभार ,महत्वपूर्ण मार्गदर्शन केले त्याबद्दल. तुमचे मनःपूर्वक धन्यवाद 💐😊🙏
— सौ. नीता महादेव तुपारे. पुणे
५
लेख आवडला सेन्सिटिव्ह विषय खुप सुंदर पद्धतीने मांडला आहे. It gives idea to identify the changes in child and about how to help such children👏👏👏💐
— Manisha Desai. Asst. Director at Balgram
६
Devendraji, Namaste, 🙏.Read your article, Saranchya Aathavani. Khupach Chhan. Praise your work.
–– Pro Dr D V Kasar. Pune.
७
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीचे विचार आणि कविता फार छान आहेत.
- — प्रा सुनिता पाठक. छ. संभाजीनगर
८
नमस्कार, सर. आपले साने गुरुजींवरचे भाषण खूप आवडले. - — डॉ अंजुषा पाटील. ठाणे
९
साने गुरुजींबद्दल वाचून बालपण आठवते ..त्यांची एकूण एक पुस्तके आमच्या घरात होती. श्री धनसरे यांनी आपल्या भाषणाचा गोषवारा छान मांडलाय
श्री ठाकूर जींनी सांगितलेली जोशी सरांची घटना त्यांच्या सरळ सज्जन मुख्यमंत्री असल्याचीच ग्वाही देते. सौम्य टीका वगैरे आता सर्व संपले आहे वाटते
पौर्णिमाजींनी सांगितलेला सल्ला योग्य च आहे
शुद्ध मराठी कधी बोलणार आपण ? एक दिवस भाषेचा गौरव दिन ठेवून चालत नाही . तिचे जतन, संवर्धन करणे आपलेच कर्तव्य आहे
साहित्य तारका मध्ये शकुंतला गोगटे यांच्याबद्दल संगीताजींनी व्यवस्थित सांगितले आहे, आवडले
स्मिता धारूरकर, कोठावदे, काळे, नलावडे, कोकीळ सर्व कविता वाचनीय.
- –– स्वाती वर्तक. मुंबई.
- १०
- पूर्णिमा शेंडे यांच्या पूर्णिमानंद या काव्यसंग्रहा बद्दल आलेल्या प्रतिक्रिया –
- पूर्णिमा, तुला तुझ्या पूर्णिमानंद काव्यसंग्रहाबद्दल हार्दिक शुभेच्छा !!
- आज पासून तुझा खरा “वाढ” दिवस सुरू झाला आहे.
- तुझ्या काव्य संग्रहात वाढ,
- वेगवेगळ्या कथा,
- कादंबऱ्या मध्ये वाढ,
- इतर अनेक सृजनशील कलाकृतीत वाढ !
- या सगळ्या बाबतीत वाढ होणार हे नक्की !
- तुझ्या साहित्य समृद्धीची वाढ झालीच आहे! आता ती अनेक पटींनी वाढणार आहे ! तू तयार रहा! सदैव तुझ्या बरोबर असणार तुझा काका !🖐️
- पूर्णिमा ! तुला खुप खुप शुभेच्छा ! तुझी साहित्यिक कलेत अशीच खुप भरभराट होऊ दे ..हीच श्रीस्वामी चरणी इच्छा !
- –– सुषमा गणेश हबीब. हुबळी, कर्नाटक
- हाय पूर्णिमा कालचा पूर्णिमानंद प्रकाशन सोहळा अतिशय देखणा आणि सुंदरच झाला.सर्वांची भाषणे खुपच मस्त, खुसखुशीत जणुकाही साहित्याची मेजवानीच. त्यांनी केलेले तुझ्या भावपूर्ण कवितांचे वाचन अन् केलेले कौतुक ऐकून मन तर भरुन आलेच पण एवढी हुशार आणि संवेदनाशील आपली मैत्रीण आहे याचा खुप खुप अभिमान वाटला. पुस्तक घेतले आहेच, वाचुन अभिप्राय देईनच. अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो आणि तुझ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे साक्षीदार व्हायला खुप आवडेल.
- Heartests congratulations my dear.
- ❤️❤️❤️🌹🌹🌹
- — स्वाती चिद्दरवार
- ‘Purnimanand’ book release function was very nicely organised.
- Congratulations
- Purnima Well done👏🏻👏🏻
- — Rama Madam
- पूर्णिमा, ‘पूर्णिमानंद’ काव्यसंग्रह खूपच छान. तुझ्याबद्दल अभिमान वाटतो. तू माझी मैत्रीण असल्याचा…
- –– सुधा शेणाॅय
- खरंच खूप छान तुझे मनापासून अभिनंदन. अशीच तुझी प्रगती होऊन अजून तुझे नवीन काव्यसंग्रह होऊ दे.
- 👍
- — सुनिता महाबळेश्वरकर
- Purnima Mam, heartiest congratulations for one of the achievement of your talent, which blossom in the form of ‘POORNIMANAND’. May almighty be always expressed his beauty through your poetic talent. 💐💐..
- – Gajanan Wadkar.
- स्वामी समर्थाच्या कृपेने पुणिंमा शेंडे…..’पूर्णिमानंद’ काव्यसंग्रह प्रकाशन होत आहे.आज तुझं स्वप्न पुर्ण होत आहे.
- सगळ्याचा आशिर्वाद आहे.
- या पुढे ही उत्तरोत्तर अश्याच कविता लिहीत रहा.
- तुझे खुप खुप अभिनंदन.🌹
- — माला कृष्णा हबीब (हूबळी)
- खूप छान लेख! सगळ्यांच्या तोंडात इंग्रजाळलेली मराठी सहज बसलेली आहे. चुकीचे बोलतोय हे त्यांच्या गावी ही नसते. फक्त 27 फेब्रुवारीला मराठी भाषेचा शुभेच्छा संदेश देण्यापेक्षा शुध्द मराठीत बोलण्याचा प्रयत्न करायला हवा. मराठी माणसाशी मराठीतच बोलावे. मराठीत बोलावे, मराठीत विचार करावा.मराठीचा आग्रह धरावा एवढे तरी करावे.
- पूर्णिमा, खुप छान मस्त लिहिलंय
- अमृतातेही पैजा जिंके…..,.
- – चंद्रकांत कोल्हापूरे
- पूर्णिमा हार्दिक अभिनंदन !!
- उतरोत्तर असाच नवनवीन पुस्तक प्रकाशनाचा योग येवो.
- मुखपृष्ठ आणि नावही खूप छान आहे.👌
- — मुग्धा मोडक.
- Dear Pornima madam,
- I wanted to extend my heartfelt congratulations on the publication of your first book ‘PORNIMANAD’ of fantastic poems. What an incredible achievement! Your talent and dedication have truly shone through, and I couldn’t be happier for you.
- Moreover, I wanted to express my gratitude for inviting us to the occasion celebrating your book launch. It was an absolute delight to be a part of such a fantastic program. The event was wonderfully organized, and your poems resonated deeply with everyone present.
- Once again, congratulations on this significant milestone in your writing journey. I have no doubt that your book will touch the hearts of many and inspire countless readers. Wishing you continued success and fulfillment in all your future endeavors. Thanks,
- — सीमा दूबेवार
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800