Friday, January 3, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात….

वाचक लिहितात….

नमस्कार मंडळी.
माझ्या दूरदर्शन मधील सहकारी,निर्मात्या मीना गोखले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर लिहिलेल्या छोट्याश्या जीवन कथेला वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.आधी या वाचकांच्या प्रतिक्रिया देत आहे. त्यापुढे इतर प्रतिक्रिया देत आहे.
आपला,
देवेंद्र भुजबळ
संपादक


मीनाताई ची मोठी बहिण डॉ नीला पाटील सायन हाँस्पिटल मध्ये माझ्याबरोबर होत्या.
लेख मस्त आहे.
— डॉ दक्षा पंडित. मुंबई


खूप छान मीनाताईंचा जीवन प्रवास,
ताई वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.
— सौ. मेहमूदा शेख गुलपरी. श्रीक्षेत्र देहूगाव पुणे

Meena Gokhle..Good
Memeories, Devendraji.
— Sangita Satoskar. Mumbai.

मॅडम आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
— राजन राऊत. दूरदर्शन, मुंबई.

Dear Meena..
Many Many Happy Returns of the Day👍🌹🌈God Bless You with Healthy ..Wealthy Life Forever 👍🌹🌸🏵️🌷💫
— Ajit Deshpande. DD Newsreader, Pune

सौ मीना गोखले हिस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
— खाडीलकर. दूरदर्शन, मुंबई

Happy birthday Meena ji🎂🍰🎉
— Mohan Patel. DD, Mumbai.

देवेंद्रजी आपण मीना गोखले—पानसरे या आपल्या सहकर्मचारीस आठवणीने, आवर्जून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन एक प्रकारे त्यांच्याबद्दल जिव्हाळा तर व्यक्त केलातच पण त्यासोबत एका सुंदर व्यक्तीमत्वाची ओळख 🌹करुन दिलीत. एक दूरदर्शन प्रेक्षक या नात्याने मीही त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते.
— राधिका भांडारकर. पुणे

Happy Birthday Madam 🎂
— Anil Chalke, Badlapur.
१०
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम.
— शाहीर कृष्णा मुसळे. मुंबई.
११
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा मीना गौखले पानसरे मॅडम.
— प्रमोद मोरे. दूरदर्शन, मुंबई.
१२
Happy birthday मीना गोखले माऊली.
— जयंत ओक. मुंबई.
१३
मॅडम, आपणास वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा 👏🎂
— रामराजे, निवृत्त अभियंता, दूरदर्शन.
१४
Happy birthday to Meena Gokhle 🌹
— Kishor Sonavne, Nagar.
१५
दूरदर्शनच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली सखी मीना गोखले ह्यांना वाढदिवसानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा. 💐
भुजबळ सर, खूप छान परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद .
आजच्या अंकातील सर्व लेख व कविता खूप सुंदर. सर्वांचे हार्दिक अभिनंदन 🙏
— सौ मृदुला राजे, जमशेदपूर
याशिवाय काही प्रतिक्रिया पोर्टल वर कॉमेंट बॉक्स मध्ये आहेत.

आता उर्वरित प्रतिक्रिया वाचू या ..

१६
सर्व प्रथम अलकाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या कार्य कर्तृत्वाला मानाचा मुजरा. 🙏 मनाची दुर्दम्य इच्छाशक्ती असाध्य रोगावरही मात करु शकते आणि जीवनाचा भरभरून आस्वाद आपल्याला हवा तसा घेता येतो हेच तुमच्या उदाहरणावरून दिसून येतं. या लेखामुळे तुमच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेता आली त्याबद्दल लेखिका प्रतिभा पिटके यांनाही धन्यवाद .
— विकास भावे, ठाणे.
१७
जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
‘असे आहे भिलार’ खूप छान माहितीपूर्ण लेख.
तसेच अरुणाताई दुद्दलवार यांचे पत्रकाव्य खूप सुंदर.
— अरुणा गर्जे,नांदेड.
१८
आजच्या अंकातील “पुस्तकांचे गाव भिलार” बद्दल छान सविस्तर माहिती मिळाली..👍
“असा बरसला हायकू” हा मा.मेघना साने यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सविस्तर वृत्तांत खूप आवडला. हायकूबद्दल व्यवस्थित माहिती यातून मिळते.छानच मार्गदर्शन.👌✍️त्यांचे अभिनंदन💐👏
तोरणेसरांचा लेखही खूप छान…सगळा अंक अत्यंत वाचनीय आहे. भुजबळसरांचे मनस्वी आभार.माझीही कविता यात आहे.👍🙏📖
— अरुणा दुद्दलवार. दिग्रस, यवतमाळ
१९
मराठी स अभिजात दर्जा…
प्रा. डाॅ.ठाकूर सरांचे विचार मौलिक आहेत.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ, पुणे.
२०
“ओढ” ही कविता फारच सुंदर आणि भावस्पर्शी आहे.
— अरुणा गर्जे, नांदेड.
२१
छान आहे डॉ किरण ठाकूर यांचा लेख. सारेच मराठी प्रेमी या प्रश्नाचे उत्तर शोधत असतात. त्यांनी दिलेल्या लिंक वर बघायला पाहिजे.
हा लेख मी मित्रांना अग्रेषित करू शकते न ?
प्रा डॉ शिरसाठ यांनी कुशाग्र बुद्धीचा, विश्वासू सल्लागार अशी एक छान ओळख करून दिली आहे हनुमंताची. आवडली.
विद्या बाळ या विदुषी बद्दल संगीताताईंनी व्यवस्थित सांगितले आहे. माझ्या आवडत्या लेखिका आहेत. या सदरात नेहमीच चांगल्या साहित्य तारकांची ओळख घडते. अभिनंदन.
ओढ ..कवितेत डॉ पाटील यांनी माहेर, निसर्ग, परस यांची हृदयस्पर्शी आठवण केली आहे..छान.
— स्वाती वर्तक, मुंबई.
२२
आदरनीय श्री. देवेंद्र भुजबळ साहेब तसेच सौ अलकाताई भुजबळ मॅडम, सामाजिक कार्याचे महामेरू ,अनेक छोटया छोटया संस्थाना उंच शिखरावर पोहचविणारे, प्रसंगी शांत समयी असणारे शिस्तबद्ध सर समाजातील वंचित, अनाथ, निराधार, वयोवृद्ध, अपंग यांचा विकास कसा होईल, त्याचा चांगल्या प्रकारे संगोपन करताना आपल्या शरणपूर वृध्दाश्रमास स्वतः बसने प्रवास करून आम्हांस मार्गदर्शन करणारे सर, कोरोना सारख्या महामारीत वृध्दाश्रमास जीवंत ठेवणारे सर समाज प्रबोधन करून पेपर तसेच पोर्टल वरती प्रसिद्धी देवून एका सर्व साधारण व्यक्तीस संस्था चालवित असताना कोणतेही अडचण आली तर नेहमी मार्गदर्शन करणारे साहेब आज साहेबाच्या अर्धांगिनीचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांना मनःपुर्वक शुभेच्छा. अलकाताई मॅडम बदल खुप काही बोलावसे वाटते परंतु खुपच मोठया मनाच्या मॅडम, कर्करोगावर मात करून हजारो रूग्णांना साथ देणाऱ्या त्याचे प्रबोधन करून आनंदी जीवन जगण्याचा सर्वांना सल्ला देणाऱ्या मॅडम, सरांच्या यशात मोलाची साथ देणाऱ्या मॅडम जगभर फिरणाऱ्या आमच्या मॅडम व सरांचा स्वभावातील देवपण जपणे, त्यांच्या मुखी दोन घास घालणे व शाश्वत जीवन जगण्यासाठी काय हवे, काय नाही या साठी जीवनात कायम झटत राहून लाखो युवक युवतीचे मार्गदर्शन करणारे सामाजिक जाणीव असलेले भुजबळ कुटुंब या कुटुंबातील आज मॅडम चा वाढदिवस मॅडम आपणास समाजाची सेवा करण्यासाठी दिर्घ आयुष्य लाभो .सुख, समाधान,आनंद द्विगुणित होत राहो. देशाची सेवा आपल्या हातून आशीच सदैव घडत राहो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसानिमित्त लाखो लाखो शुभेच्छा.
— आपला विनित रावसाहेब मगर.
संचालक, शरणपूर वृद्धाश्रम, नेवासे
२३
सन्माननीय सुतो…..🙏🙏
“रफ स्केचेस” चे लेखक सुभाष अवचट हे केवळ चित्रकार नव्हे तर शब्द साहित्याचे किमयागार होते.या विधानाची प्रचिती आपण लिहिलेले परीक्षण संपूर्ण वाचल्यावर येते.मुखप्रुष्ठ सोडल्यास एकही रफ स्केच नसतांनाही अनेक थोर साहित्यिक ,कवी,चित्रकार ,साहित्य सहवास या निवासी संकुलातील अनेक लेखक कवी प्राध्पापक कलाकार यांच्या सहवासामुळे व टिळक रोडवर स्षतःचा स्टुडिओ ऊभारण्या पर्यंतच्या सर्व आठवणींचा घेतलेला मागोवा यातूनच सुभाष अवचटांचे बहुआयामी व्षक्तिमत्वाची प्रचिति येते.
समग्र सुभाष अवचट समजण्यासाठी त्यांच्या लेखणीतून प्रकट झालेले रफ स्केचेस व सुधाकरजींनी लिहिलेले समीक्षण सर्व साहित्यप्रेमी रसिकांनी वाचणे आवश्यक आहे.
— अनंत वाणी, नाशिक.

२४
आदरणीय पिटके मॅडम,
नमस्कार.
दैनिक हिंदूस्थान चे मुख्य संपादक तथा अजातशत्रू विलासभाऊ मराठे यांच्या आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सकस लेखणीतून सर्वंकषपणे लिहिलेल्या लेखातील पार्श्वभूमी पाहिल्यावर खरंच विलास भाऊ मराठे यांच्या वडिलांनी पत्रकारिता क्षेत्रात रचलेला पाया अतिशय मेहनतीने पुढे पत्रकारिता आणि सामाजिक विचारांचा वारसा जपत आहेत. ही अतिशय मौलिक कामगिरी बजावत असतांनाच आपला मित्रपरिवाराच्या गोतावळ्यात रममाण होऊन सकारात्मक प्रतिसाद देतात ही अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे असा मित्र दुर्मिळ आहे असे मला वाटते.
सन्माननीय विलासभाऊ मराठे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आरोग्यदायी आयुष्य, सुख, शांती, समृद्धी, समाधान लाभो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आणि शुभेच्छा व्यक्त करतो.
शुभेच्छूक
— राजाराम जाधव
२५
अप्रतिम फुलपाखरे…. खूप सुंदर दिसतात.
— अरुणा दुद्दलवार. दिग्रस, यवतमाळ
२६
मदन लाठी साहेबांची जिल्हा आयकॉन पदावर नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
— अनिल चाळके. सामाजिक कार्यकर्ता, बदलापूर.
२७
आमचे मित्र,निवडणूक आयकॉन मदन लाठी
आवडले.
— माधव अटकोरे. ज्येष्ठ पत्रकार, नांदेड.

— टीम एन एस टी. ☎️ 9869454800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pratibha Saraph on नव वर्ष ..
आशी नाईक on कवी
विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !