नमस्कार मंडळी.
मी लिहिलेल्या – संपादन केलेल्या “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकावर न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन च्या प्रकाशिका तथा आपल्या पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांनी लिहिलेल्या “एक दृष्टिक्षेप यास वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. वेळेअभावी सर्व वाचकांची नावे देणे शक्य नाही. तसेच हे पुस्तक लिहिल्याबद्दल मिशन आयएएस तर्फे माझा सत्कार करण्यात आला. याबद्दल ही अनेक वाचकांनी अभिनंदन केले आहे.
या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.
इतर मजकुरावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
१. लेखिका राधिकाजी भांडारकर यांचा लेख वाचला. निखळ
भावनांचा झरा. सहजसुंदर भाषाशैली. कुठेही क्लिष्टपणाचं लेपन केलेलं नाही. प्रसंगनिष्ठ लेखन.
— प्रियांका शिंदे जगताप, कॅनडा.
२. Jadan Ghadan
Really interesting, radhika. Would like to read further.
— Sharda Paranjpe.
३. राधिका एका वेगळ्याच सहजीवनाचा अनुभव वाचायला मजा
येतेय.
— जयमती दळवी.
४. जडण घडण, वाचताना सर्व डोळ्यांसमोर जसं च्या तसं धोबी
आळीतलं दृष्य उभं राहिलं !
तू लिही आणि आम्हीपण आमचं बालपण परत अनुभवू,
— आरती नचनानी.
५. राधिका, तुझे जडणघडणचे दोन्ही भाग वाचले.. खूप छान,
अतिशय सहज भाषेत तू तुझ्या लहानपणचे वर्णन केले आहेस.. बघता बघता आम्ही सुद्धा तुझ्या त्या ठाण्यातल्या गल्लीमध्ये तुझ्याबरोबर खेळायला, दंगा करायलाच आलो आहोत असे वाटायला लागले.. अतिशय चित्रदर्शी अशी तुझी भाषा आहे !! हे सर्व वाचताना मी सुद्धा नकळत माझ्या नारायण पेठेतल्या वाड्यात गेले आणि आमच्या अंगणात बागडून आले .. श्रावण महिन्यातला अंगणात बहरलेला आणि सडा घातलेला प्राजक्त डोळ्यासमोर आला !! नकळत जुन्या दिवसात मी हरवून गेले…
पुढच्या भागाची वाट बघत आहे….
— सुचेता खेर, पुणे
६. राधिका ताईंची जडण घडण उत्सुकतेने वाचत आहे स्तुत्य
उपक्रम.
— सुलभा गुप्ते.
७. जडणघडण, खुप छान उपक्रम आहे राधिकाताई. अभिनंदन
ताई. छान मेजवानी आहे आम्हाला.
— अस्मिता पंडित. पालघर
८. मा. देवेंद्र सर,
मा.सौ.राधिकाताई भांडारकर यांचे माझी जडणघडण चे दोन्ही भाग वाचले. त्यांचीच प्रस्तावना असलेलं समर्पण हे आत्मचरित्र असंच आहे.
९. मी शास्त्र शाखेचा ,पण जीवनात अश्या काही घटना घडल्या,
आणि समर्पण तयार झालं. वाचल्यावर अनेकांना मार्गदर्शी ठरेल असे मला वाटते. मा. राधिका ताई भांडारकर यांची प्रस्तावना व १० भाग असलेले आत्मचरित्र आपण जरुर वाचावे असेच आहे.
— अरुण पुराणिक. पुणे.
१०. देवेंद्र जी,
मिशन आयएएस तर्फे सत्कार हा खूप मोठा सन्मान आहे. मनःपूर्वक अभिनंदन .
— अशोक जवकर.
निवृत्त उप मुख्य अभियंता, बेस्ट,मुंबई.
११. योग्य पध्दतीने केलेल्या कामाचा आढावा घेऊन योग्य व्यक्तीचा
केलेला सत्कार अभिनंदनीय आहे.
— विलास प्रधान. मुंबई
१२. सर, नमस्कार.
आपलं खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा.
— मदन लाठी, जळगाव.
१३. Saheb, many many congratulations.
— Chandramani Indurkar. Retd.Jail Officer, Pune.
१४. सर, आपले मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदनऽऽऽ !!
— कवी विलास देवळेकर. मुंबई
१५. सर आपले मन:पुर्वक अभिनंदन.
— हिरामण भोईर, पेण.
१६. मनापासून अभिनंदन, देवेंद्र साहेब.
— प्रशांत थोरात, गुरुकुल, पुणे.
१७. आपला सत्कार झाल्याबद्दल अभिनंदन.
— विलास कट्यारे. संपादक, सहस्त्रार्जुन जागृती, नाशिक.
१८. देवेंद्र जी, अतिशय मनापासून अभिनंदन. Really Great Sir..
— नितीन कुळकर्णी. पुणे
१९. अंक माहितीपूर्ण. देवेंद्र आपले अभिनंदन.
— चंद्रकांत बर्वे. निवृत्त दूरदर्शन संचालक, मुंबई.
२०. देवेंद्र जी, हार्दिक अभिनंदन !
— माधव गोगावले, शिकागो, अमेरिका.
२१. 👏🏻👏🏻अरे वा ! क्या बात ! अभिनंदन अभिनंदन सर
— प्रियांका शिंदे जगताप, कॅनडा
२२. खूप खूप अभिनंदन सर, आणि खूप शुभेच्छा .
— सविता कोकीळ. इचलकरंजी.
२३. श्री.भुजबळ साहेब आपले मनापासून अभिनंदन व खुप खुप
हार्दिक शुभेच्छा .
— राजेंद्र रामराजे. निवृत्त अभियंता, दूरदर्शन, मुंबई.
२४. हार्दिक अभिनंदन सर. आपले पुढील वाटचालीसाठी अमापशा
शुभेच्छा .
— शोभा कोठावदे, नवी मुंबई.
२५. ‘आम्ही अधिकारी झालो’ छान..अभिनंदन.
मराठी रसिकांना…सुरेश भटांमुळे कविता कळली…वृत्तांत आवडला
मीना खोंड यांची कविता छान…प्रत्येक तरुणीच्या मनाचे प्रतिनिधीत्व करणारी.
— स्वाती वर्तक, मुंबई.
२६. अतिशय दुर्मिळ कथासंग्रह, त्यातील प्रत्येक कथेचा उत्तम सार
लिहून नवीन पुस्तकाची ओळख करून दिलीस कुडके सर .. मनापासून धन्यवाद, अतिशय सुंदर व मूल्याधिष्ठित कथा.
लिहीत रहा आणि share करत रहा असेच कायम. धन्यवाद !
— श्रीमती वैशाली वीर. शिक्षणाधिकारी (योजना), मुंबई
२७. शेवटची पानवाली कथा आवडली. पुरुषप्रधान समाज
व्यवस्थेची झलक त्यात जाणवते. स्त्री परपुरुषाकडे आकर्षित झाली की ती शील भ्रष्ट. पुरुषाला मात्र 100 गुन्हे माफ.
— श्री भिक्कू महेंद्र कौसल. माजी संचालक (माहिती)
२८. दिलीप गडकरी यांचा अभ्यास पूर्ण लेख आवडला.
प्रतिभा सम्राट गडकरी यांच्या संपूर्ण जीवनातील महत्वाच्या माहितीचा आरसा लेखकाने आपल्या समोर सादर केला आहे.
खूप खूप धन्यवाद….
— माधव अटकोरे. ज्येष्ठ पत्रकार, नांदेड
२९. महाराष्ट्रातील अनेक थोर कवी, नाटककार या मध्ये राम गणेश
गडकरी यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांना मानाचा मुजरा.
— विलास प्रधान, मुंबई.
३०. तोरणे सरांची पुस्तक परिक्षणाची खोली वाढत आहे व
वाचकाला पुस्तकाचे सार थोडक्या शब्दात वाचायला मिळते. श्री तोरणे सर पुस्तकातील लेखकाने लिहिलेल्या विषयांचं मर्म बरोबर शोधून प्रस्तुत करत असतात. श्री तोरणे सरांचे परीक्षण व त्याचे संपादन करणाऱ्या न्युज स्टोरी टुडेचे श्री भुजबळ सरांचे अभिनंदन.
— ओमप्रकाशजी शर्मा, नासिक
— टीम एन एस टी.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800