मन धांवे सैरावैरा, ना कशाचा त्यांस निवारा
कसलेहि ना त्याला बंधन, सदैव चाले विचारमंथन ।।१।।
विचार, विचार, विचार, अखंडीत प्रवाही विचार
थांबविताहि नाही थांबत, विचार-मालिका जाते लांबत ।।२।।
स्वत:बद्दल रोजच विचार, जवळीकांचाहि चाले विचार
स्वकीय-परकीयांचा विचार, जगांचाहि सतत विचार ।।३।।
सामाजिक समस्या अन् राजकारण, शैक्षणिक जिवन व अर्थकारण
अपधात, रोगराई आणि देव-धर्म, नियतीचा खेळ की मानवी कर्म ।।४।।
भूतकाळी कधि मन रमते, भविष्यांत कधि झेपावते
वर्तमानी मात्र सदा गोंधळते, चंचल मन हे ना स्थिरावते ।।५।।
विचारांचा नित हिंदोळा, अंत:र्बाह्य मनीचा झुला
वरती-खाली उंच झोके, भोवळ आणती मनांस फुके ।।६।।
असे, विचारशक्ति वरदान मानवा, नाहि थांबत हा हिंदोळा
अति विचारे व्याप-ताप, वरदान असे की हा शाप ! ।।७।।
– रचना : सौ. लीना फाटक, इंग्लंड
विचारांना नाही कसलेही ब्रेक…
छान आहे कविता…
मन:पूर्वक धन्यवाद पूर्णिमाताई. सौ लीना फाटक