पालक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या निव्वळ टक्केवारी मागे न लागता त्यांच्या सर्वांगीण जडणघडणीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. यासाठी शाळेचे नामवंत
माजी विद्यार्थी व शाळेजवळील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सहभाग अवश्य घ्यावा, असे प्रतिपादन निवृत्त माहिती संचालक तथा न्युज स्टोरी टुडे या वेब पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी केले.
श्री छत्रपती शिक्षण मंडळाच्या नवी मुंबईतील सानपाडा येथील विवेकानंद संकुलात आज आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन
कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिक्षण मंडळाचे
अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी होते.
श्री भुजबळ पुढे म्हणाले की, सुमारे ६२ वर्षांपूर्वी ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील आदिवासींच्या आणि अन्य वंचित घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासासाठी राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित होऊन सुरू केलेल्या श्री छत्रपती शिक्षण मंडळाच्या आज ५५ शाखा आणि १८ हजार विद्यार्थी संख्या आहे, ही अत्यंत गौरवाची बाब आहे. संस्थेच्या शाळांतील विविध उपक्रमांचे कौतुक करून संस्थेच्या कार्याचा अधिक विस्तार व्हावा, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
डॉ नंदकुमार जोशी यांनी त्यांच्या भाषणात संस्थेच्या विविध शाळांमधून राबविल्या जाणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. तसेच स्वातंत्र्य दिनाचा खरा अर्थ विद्यार्थ्यांना सांगितला.
याप्रसंगी साप्ताहिक विवेक तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘अखंड भारत का आणि कसा ?’ व ‘फाळणी च्या वेदना एक विस्मृत नरसंहार’ या दोन पुस्तकांचे विमोचन प्रमुख अतिथी श्री देवेंद्र भुजबळ व डॉ. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. श्री शिरीष गुजरकर यांनी साप्ताहिक विवेक तर्फे प्रकाशित पुस्तकांबद्दल माहिती सांगितली
प्रारंभी श्री देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते भारतमाता पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यानी देशभक्तीपर गीत सादर केले.
या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ सँटेलाईट सिटी, वाशी तर्फे शाळेला दोन संगणक भेट देण्यात आले. तसेच शाळेमध्ये इंट्रेक्ट क्लब स्थापन करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवू असे आश्वासन क्लबचे श्री चोपडा यांनी दिले .
शेवटी उपस्थितांचे आभार मानून संपूर्ण वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास संस्थेचे कार्यकारी सदस्य श्री.संजय पालकर, डॉ.अरुंधती जोशी, न्यूज स्टोरी टुडे च्या
सह संपादक सौ.अलका भुजबळ, सर्वश्री आनंद देशमुख, मोहनराव ढवळीकर व इतर निमंत्रित मान्यवर, पालक प्रतिनिधी, माजी विद्यार्थी, संकुलातील सर्व विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
सर्व अप्रतिम असते वाचनीय कविता बातम्या
वाह देवेंद्र साहेब…! खूपच छान..! जय हिन्द…!