विश्वभरारी फाउंडेशन आणि नॅशनल लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने २४ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत एक दिवसीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री श्री आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न झाले. आमदार श्री पराग अळवणी स्वागताध्यक्ष तर साहित्यिक श्री किरण येळे हे अध्यक्ष होते.
दिवसभर चाललेल्या या संमेलनाचा वृत्तांत सह्याद्री वाहिनीवर प्रसारीत होणार्या “आपली मुंबई” या कार्यक्रमात दाखविण्यात आला. या कार्यक्रमाचे लेखन पूर्वा सावंत यांनी तर सूत्रसंचालन तन्वी बर्वे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे चित्रीकरण धनंजय पवार, ध्वनिमुद्रण संकलन राजु धकिते, निर्मिती सहाय्य संजय झनके. निर्मिती दिपक शर्मा यांनी केली असून श्री राजेश दळवी कार्यकारी निर्माते आहेत. हा वृत्तांत आपण पुढे पाहू शकता.
या संमेलनात लता गुठे यांच्या ‘काहूरवाट’ काव्यसंग्रहाचे, रेखा नार्वेकर लिखित “स्तुतीसुमनांचे झेले” (लेखसंग्रह) व विद्या काळे लिखित ‘मर्मबंध’ (कादंबरी) या भरारी प्रकाशनाच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

संमेलनाचा सविस्तर वृत्तांत आपल्या पोर्टलवर यापूर्वीच प्रकाशित झाला असून आपण तो पुढील लिंक वर क्लिक करून वाचू शकता.
“असे रंगले विश्वभरारी संमेलन”
✒️ देवेंद्र भुजबळ. 👇
https://newsstorytoday.com/असे-रंगले-विश्वभरारी-संम/
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
