Home बातम्या वीर बाल स्मृतिदिन : काव्यमय श्रध्दांजली !

वीर बाल स्मृतिदिन : काव्यमय श्रध्दांजली !

0

शिखांचे 10 वे धर्मगुरू गोविंदसिंह यांच्या चार मुलांना बहुभाषिक काव्यसंमेलनातून नुकतीच पुणे येथे भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी गुरुद्वारा गुरुनानक दरबार, कॅम्प संस्थेचे अध्यक्ष साहनी चरणजीत सिंग यांनी, वीर बालांविषयी विशेष माहिती दिली. “ज्ञानाची पुजा करा” हा गुरुनानक यांनी दिलेला संदेश सर्वांनी आचरणात आणावा असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले.

साहित्यिक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनीही वीर बालांच्या साहसी स्मृतींना उजाळा दिला.

इंदापूरकर, संतसिंह मौक्हा यांचीही याप्रसंगी भाषणे झाली.

बाबा ठाकूर, स्वाती दिवाण, सागर वाघमारे, दीपिका कत्रे, सरला भिरुड, राजश्री वाणी, मुकुंद सहस्त्रबुद्धे आदि 30 कवी कवयित्रिंनी बहुभाषिक काव्यसंमेलन गाजवले. या सर्व सहभागी कवी कवयित्रींना मान्यवरांच्या शुभहस्ते काव्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रिया प्रमोद दामले यांनी प्रास्ताविक केले. वर्ल्ड क्वीन बीज संस्थेच्या अध्यक्ष सारिका सासवडे यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश बडदे यांनी आभार मानले.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version