कुणीतरी कधीतरी
रोपटे करतो अर्पण
दिसेलं त्या जागेवर
पेरण करतो आपण
दुर्लक्षित तरुसंवर्धन
इव्हेंटसाधतो कृपण
आशिर्वाद निसर्गाचे
वर्धन आपलेआपण
नियोजन नसे काही
कसलेही वृक्षारोपण
वाढहोई अस्ताव्यस्त
झाडांचे होते सरपण
चुकीचीजागा व्याप्त
नंतरकळे शहाणपण
अभ्यास नसे कसला
उसाळू ये अहम् पण
अडवून बसता रस्ता
वसाहतींना चड चण
आता येत न कापता
झाडांची हो अडचण
वृक्ष प्रेमही सळाळते
प्रगती मार्गा दडपण
विचीत्र जागी फसलो
काही नसाधे धडपण
वृक्षसंहिताआवश्यक
विचारे करा संयोजन
दिशादर्शकनागरिका
आराखडा नियोजन

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
