Thursday, June 19, 2025
Homeलेखव्रतस्थ डॉक्टर पती

व्रतस्थ डॉक्टर पती

जीवन म्हणजे जन्म अन मरण. जीवन म्हणजे सुःख नी दुःख. उन्ह आणि पाऊस अशा असंख्य चढ उतरांनी भरलेला आलेख होय. या जीवनरूपी आलेखाचा लेखा जोखा पाहणारा म्हणजे तो देव. अशी ही माझी, माझीच नाही तर सर्व मानव जातीची धारणा.

माझ्या या धारणेला अजून एक वाट फुटते ती डॉक्टर या नावाने. आपण नेहमीच अनुभवतो की डॉक्टर एक देव, डॉक्टरांनी जीवदान दिले अशा एक ना अनेक गोष्टी आपण डॉक्टरांबद्दल अनुभवतो.
पण या कोरोनाच्या महामारीत मात्र अनुभवयास मिळालेले भगवंताचे दुसरे रूप म्हणजे डॉक्टर होय.

असे म्हटले जाते की डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याच्या दोन बाजू. समाजातील गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा कुठलाही दूजाभाव न बाळगता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, केवळ अन् केवळ जनतेसाठी स्वत:ला झोकून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे देवरुपी डॉक्टर या कोरोनाच्या काळात पहावयास मिळाले. अशा या देव रुपी डॉक्टरांना १ जुलै या डॉक्टर दिनी माझ्या शुभेच्छा.

असेच एक देव रुपी डॉक्टर म्हणजेच माझे पती डॉ श्री व्यंकटेश हरिभाऊ डुब्बे, भगवती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड. मी माझे परम भाग्य समजते की भगवंतांनी मला अशा देव माणसाची पत्नी होण्याचे सौभाग्य दिले.

कोरोनाच्या काळात जेंव्हा कोरोना रुग्णांचा कहर झाला होता, लोक कोरोना रूग्णांच्या जवळ जाण्यास ही घाबरत होते, प्रत्येक जण आपला जीव मुठीत धरून वावरत होते त्यावेळी मात्र डॉक्टरांनी स्वत:च्या जीवाची व स्वत:च्या कुटुंबाचीही पर्वा न करता अहोरात्र कोरोना रुग्णांची सेवा केली. अनेक अत्यवस्थ जीव वाचवले. असंख्य नातेवाईक व इतर सर्व समाजातील लोकांना कोरोनामुक्त करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. समाजातील प्रत्येक स्तरावरील लोकांसाठी त्यांनी प्रयत्न केले. बऱ्याचदा अशी परिस्थिती आली की मयत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील त्यांचे नातेवाईक तयार नव्हते. अशा वेळी अशा रुग्णांचे अंत्यसंस्कार करण्यास देखील त्यांनी अग्रभागी राहून प्रयत्न केले.

कोरोना काळात त्यांची दिनचर्या तर इतकी भयावह होती की दिवस व रात्र त्यांच्यासाठी एकच होती. सतत रूग्णांच्या नातेवाईकांचे फोन, बेडच्या उपलब्धतेसाठी विचारणा, रुग्णांना बरे करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या सर्व गोष्टींमधून त्यांना स्वतःचा असा एक क्षणही विसाव्याचा मिळत नसे.

पण इतकी व्यस्त दिनचर्या असूनही मी त्यांना कधी कुठल्या व्यक्तीवर, रुग्णावर, नातेवाईकांवर चिडलेले पाहिले नाही. त्यांचा असलेला संयम, रुग्ण सेवेवरील, वैद्यकिय पेशावरील त्यांची निष्ठा पाहून मला त्यांचा अभिमान वाटतो.

या काळात त्यांच्या वैद्यकिय सेवेतला त्यांच्यावर असलेला ताण त्यांनी कधीही कुटुंबावर येऊ दिला नाही. त्यांनी प्रत्येक प्रसंग हिंमतीने व जबाबदारीने, अत्यंत शांतपणाने पार पाडला.

अशा या देव रुपी, जीवन रक्षक असलेल्या डॉ व्यंकटेश डुब्बे यांना व समाजातील सर्व डॉक्टरांना माझ्याकडून डॉक्टर दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा…..

– लेखन : सौ. संपदा व्यंकटेश डुब्बे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments