मूळ मुंबईकर पण गेली काही वर्षे सिंगापूर येथे स्थायिक झालेल्या लेखिका नीला बर्वे यांच्या, “कोवळं ऊन” या कथासंग्रहाचे प्रकाशन येत्या शनिवारी, दि.२३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वा. गोखले सभागृह, लोकमान्य सेवा संघ, टिळक मंदिर, राममंदिर रस्ता, विले पार्ले (पूर्व), मुंबई ५७ येथे होत आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन श्री निळकंठ श्रीखंडे यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्री सुकृत खांडेकर, मुकुंद चितळे, सोनाली जगताप उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री राजीव श्रीखंडे हे भूषविणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्मिता जोशी या करणार आहेत.

या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, अशी विनंती लेखिका नीला बर्वे आणि न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स च्या सौ अलका भुजबळ यांनी केली आहे.