Home बातम्या शानिल चं शानदार यश

शानिल चं शानदार यश

0

महाराष्ट्र स्टेट अमेच्युअर अक्वाटिक असोसिएशन (महाराट्र ऑलंपिक असो. संलग्न) संस्थेतर्फे आयोजित जलतरण स्पर्धेमधे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील कुमार शानिल केदार चिटणीस, वय वर्षे १४ याने नुकतेच धरमतर खाडी – संकरॉक लाईट हाऊस पाईंट ते गेट वे ऑफ इंडिया हे पाच किलो मीटरचे अंतर नियोजित वेळेपूर्वीच म्हणजेच एक तास दोन सेकंदात पुर्ण करून या स्पर्धेत पदक प्राप्त केले आहे.

ही स्पर्धा संपल्यानंतर के आर कामा ओरिएंटल हॉल, लायन गेट, मुंबई येथे लगेचच बक्षिस समारंभ संपन्न झाला.

शानिल दिल्ली पब्लिक स्कूल – पनवेलचा विद्यार्थी असून प्रिन्सिपल श्रीमती अनिता दुवा व स्कूलच्या सर्व स्टाफ मेंबर्सनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

वयाच्या तेरा वर्षापर्यंत शानिलने वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या कराटे चँपियन स्पर्धेत बारा पदके मिळवली आहेत. आता जलतरण स्पर्धेत पदक प्राप्त करून आणखी एका पदकाचे मोरपीस आपल्या शिरी खोवले आहे. आई वडीलांचे प्रोत्साहन व त्याची जिद्द यामुळे तो जलतरण स्पर्धा यशस्वीपणे पुर्ण करू शकला.

जलतरण प्रशिक्षक श्री दिनेश मुंगेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून ही सोनेरी कामगिरी त्याने यशस्वी केली.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version