दरवर्षी मुलांची किलबिल…
दरवर्षी नवी नवलाई…
असाच असायचा शाळेचा पहिला दिवस…
पण…
सलग दुसरे वर्ष…
तो चिवचिवाट नाही,
ती लगबग नाही,
शाळेच्या स्वच्छ नीटनेटक्या गणवेशातील
मुलांची ती ओळ नाही…
आणि…
त्यात…
नेमका पाऊस आला तर रंगीबेरंगी रेनकोट घालून बागडणारी रिमझिम नाही…
आईचे बोट पकडून मैदानात पाऊल ठेवताच मोठ्याने रडणे ऐकायचे आहे पुन्हा…
पाटीवर पेन्सिलने रेघोट्या ओढणारे चिमुकले हात पाहायचे आहेत पुन्हा…
पुन्हा पहायचं आहे तुम्हाला मैदानात खेळताना…
कधी हळू कधी जोरात पुढे मागे पळताना..
खोटं खोटं रुसत रुसत मोठ्याने हसताना…
लिहिण्यापुरतं का होईना बाकावर बसताना…
बाई तुम्ही छान दिसता असं हळूच म्हणताना…
गोड गोड आवाजात छान गाणं गाताना…
तुम्हाला शाळा आठवते…
आम्हाला तुम्ही…
जाणवते आहे शाळेत…
तुमचीच कमी…
– रचना : स्मिता धारूरकर.
अगदी कालानुरूप समर्पक अप्रतिम कविता!